आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IIPS 2013 : International Institute For Population Scienes Masters Entrance

आयआयपीएस-2013: इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेसच्या मास्टर्स प्रवेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेसच्या मास्टर्स आणि शिष्यवृत्ती अभ्यासक्रमासाठी प्रवेश
मुंबई येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेसच्या पाच अभ्यासक्रम आणि शिष्यवृत्तीसाठी जुलैपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. यातील तीन अभ्यासक्रमांसाठी परीक्षा होईल आणि अन्य दोन अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांची निवड कामाचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रतेवरून केली जाईल.
अभ्यासक्रम, परीक्षा आणि जागा
एम.फिल. : 11 व 12 जुलैला परीक्षा, 50 जागा.
एमपीएस कार्यक्रम : 18 व 19 जुलै, 50 जागा
फुलटाइम पीएचडी : लेखी परीक्षेवर आधारित निवड, 21 जागा.
डीपीएस : कामाच्या अनुभवावर निवड, 60 जागा.
मास्टर ऑफ पॉप्युलेशन स्टडीज : निवड समितीकडून निवड, 100 जागा.
पात्रता
एक ते चार वर्षे कालावधीचे हे अभ्यासक्रम आहेत. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी पात्रतेचे वेगवेगळे निकष आहेत. एम.फिल. कार्यक्रमासाठी पॉप्युलेशन स्टडीजमध्ये एम.ए. किंवा एम. एस्सीमध्ये 55 टक्के गुण आवश्यक. एमपीएससाठी गणित, अर्थशास्त्र, समाजसेवा, सांख्यिकी, मानसशास्त्र, भूगोल, मानववंशशास्त्र या पैकी विषयात पदव्युत्तर पदवी. पूर्णवेळ पीएच.डीसाठी पॉप्युलेशन स्टडीजमध्ये एम.ए. किंवा एम.फिल. हवे. लोकसंख्या पदविकेसाठी कोणत्याही विषयात पदवीधर. मास्टर ऑफ पॉप्युलेशनसाठी कोणत्याही सामाजिक शास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी अनिवार्य.
शिष्यवृत्ती आणि शुल्क
निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला सरकारकडून शिष्यवृत्ती देण्यात येते. वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी विविध प्रकारच्या फेलोशिपचे अनुदान निश्चित करण्यात आलेले आहे. त्यात 5 हजार ते 18 हजार रुपये प्रतिमहिना फेलोशिपचा समावेश आहे. त्याचबरोबर 6 ते 10 हजार रुपयांपर्यंतचे प्रासंगिक अनुदानही दिले जाते. लोकसंख्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी 10 हजार रुपये आणि पदविकेसाठी 4 हजार रुपये शैक्षणिक शुल्क आहे.
संयुक्त राष्ट्र आणि भारत सरकारची सुरुवात
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेसची सुरुवात 1956 मध्ये झाली. भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्र , दोराबजी टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही संस्था सुरू झाली होती. त्या वेळी संस्थेचे नाव डेमोग्राफिक ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर असे होते. 1970 मध्ये त्याचे नाव बदलून इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन स्टडीज आणि नंतर 1985 मध्ये इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस असे ठेवण्यात आले. त्याच वर्षी संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला होता. या संस्थेत अभ्यासक्रम पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना यूएन, युनेस्कोसारख्या आंतरराष्ट्रीय संस्था, सरकारी विभाग आणि खासगी संस्थांमध्ये नोकरीची संधी मिळते.
ज्ञान
अर्थशास्त्रात जनगणनेचे विश्लेषण
भारतात इसवी सन पूर्व 800 पासून जनगणनेला सुरुवात झाली होती. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात एखाद्या करासाठी लोकांची संख्या मोजली जात असल्याचा उल्लेख सापडतो. अकबराच्या काळात लोकसंख्या, उद्योग आणि संपत्तीसंबंधीची माहिती दिली जात होती. याचा उल्लेख ऐने अकबरीमध्ये दिसून येतो. जनगणनेचे आधुनिक स्वरूप 1872 मध्ये झाले. परंतु 1881 मध्ये झालेल्या जनगणनेला भारताची पहिली अधिकृत जनगणना म्हटली जाते. त्यानंतर प्रत्येक दहा वर्षाने जनगणना केली जाते. 2011 मध्ये देशातील पंधरावी जनगणना झाली. ही गणना करण्यासाठी सुमारे 20 लाखाहून अधिक गणकांची मदत घेण्यात आली होती. भारतीय जनगणनेला जगातील सर्वात मोठी प्रशासकीय सेवा मानले जाते.
निम्म्यावर आली होती मेक्सिकोची लोकसंख्या
सोळाव्या शतकात मेक्सिकोला मोठ्या संकटातून जावे लागले होते. सन 1519 मध्ये मेक्सिकोची लोकसंख्या 1.5 ते 3 कोटी एवढी होती, परंतु 1600 मध्ये केवळ 20 लाख लोक वाचले होते. लोकसंख्येत मोठी घट झाली होती. त्यामागे महामारीसारखे काही आजार आणि युद्धे कारणीभूत होती. 81 वर्षांत देशाची लोकसंख्या निम्म्याहून कमी झाली होती. या मुद्द्यावर गोळा करण्यात आलेल्या डाटावरून 60 ते 70 टक्के नागरिकांचा मृत्यू ब्रेन हॅमरेजच्या कारणाने झाल्याचे निष्पन्न झाले.
रंजक
13 वर्षांत 1 अब्जाने वाढली जगाची लोकसंख्या
संपूर्ण जगाच्या लोकसंख्येने एक अब्जाचा आकडा पहिल्यांदाच सन 1800 मध्ये पार केला होता. 1999 मध्ये हा आकडा 6 अब्जांवर जाऊन पोहोचला आणि त्याच्या 13 वर्षांनी लोकसंख्या आणखी एक अब्जाने वाढली. एका अंदाजानुसार जगाची लोकसंख्या दरवर्षी 8 कोटींनी वाढते.
इंटरेस्टिंग कोट
"The sum of intelligence on the planet is constant, but the population is growing" - Unknown
जगाच्या लोकसंख्येत सातत्याने वाढ होत आहे, परंतु तशी बुद्धीमध्ये होताना दिसत नाही.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 यावर
किंवा मेल करा education@dainikbhaskargroup.com