आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयआयटीच्या मॅनेजमेंट : कोर्सेसमध्ये प्रवेश, कॅट स्कोअरच्या आधारावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयआयटी दिल्ली, मुंबई, खरगपूर, चेन्नई, कानपूर आणि रुरकीच्या मॅनेजमेंट कोर्सेसमध्ये प्रवेशासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व संस्थांमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि जागांची संख्या वेगवेगळी आहे. मात्र, प्रवेश कॅट स्कोअरच्या आधारावर मिळेल. कॅटच्या पर्सेंटाइल स्कोअरच्या आधारे त्यांना वैयक्तिक मुलाखत आणि ग्रुप डिस्कक्शनसाठी निवडले जाईल. प्रवेशासाठी प्रत्येक संस्थेचे आपापले नियम आहेत. गुणवत्ता यादी त्यानुसार तयार केली जाईल.

पात्रता
कानपूर

65 % गुणांसह बीई/बीटेक/बी आर्कची पदवी. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये 65 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असावेत. याबरोबर कॅट 2013 मध्ये 85 पर्सेंटाइलपेक्षा जास्त स्कोअर असावा.

दिल्ली
60 % गुणांसह बीई/बीटेक/बी आर्क/बीफार्मा किंवा बीएसस्सीची(अ‍ॅग्रिकल्चर इंजिनिअरिंग) पदवी किंवा फिजिकल/मेथॅमेटिकल/केमिकल सायन्सेस/ इकॉनॉमिक्स/ कॉमर्समध्ये मास्टर डिग्री.

चेन्नई
60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेची पदवी. याबरोबर व्हॅलिड कॅट स्कोअर. आयआयटी ग्रॅज्युएट, ज्यांनी 10च्या स्केलवर 8 सीजीपीए प्राप्त केले आहे त्यांना कॅट स्कोअरची आवश्यकता नाही.

मुंबई
60 टक्क्यांसह अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेची पदवी किंवा विज्ञानात पदव्युत्तर पदवी. पात्रता परीक्षेच्या प्रत्येक सेमिस्टरमध्ये 60 टक्के गुण असावेत.

खरगपूर
60 टक्क्यांसह अभियांत्रिकी किंवा टेक्नॉलॉजीच्या कोणत्याही शाखेतून पदवी किंवा सायन्स सब्जेक्ट्स/ इकोनॉमिक्स/कॉमर्समध्ये मास्टर डिग्री. प्रवेशात अर्जाच्या रेटिंगलाही महत्त्व.

रुरकी
60 % गुणांसह अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानात पदवी किंवा कोणत्याही शाखेतून पदव्युत्तर पदवी. 65 % महत्त्व कॅट स्कोअर, 20 % मुलाखत, 10 % ग्रुप डिस्कशन, 5 % अनुभवास.

शुल्क
मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि रुरकीमध्ये एमबीए कोर्सची एकूण ट्यूशन फीस 4 लाख रुपये आहे. खरगपूरमध्ये 6 लाख रुपये. देशाच्या आयआयएम संस्थांमध्ये एमबीए कोर्सची फीस 6 ते 17 लाख रुपयांदरम्यान आहे.

एमबीए प्रवेश परीक्षांमध्ये कॅट सर्वाधिक लोकप्रिय, दिल्ली सर्वाधिक पसंतीचे ठिकाण
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट संस्थांच्या मॅनेजमेंट कोर्समध्ये प्रवेशासाठी होणारी सामायिक प्रवेश परीक्षा (कॅट) एमबीए प्रवेश परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक लोकप्रिय आहे. एका ताज्या सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली. सर्वेक्षणानुसार, जॅट कॅटनंतर विद्यार्थ्यांची ही सर्वाधिक आवडीची एमबीए परीक्षा आहे. एनमॅट आणि स्नॅप तिसर्‍या व चौथ्या क्रमांकावर आहेत. यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडसाठी होणार्‍या प्रवेश परीक्षेचा समावेश आहे. एमबीएचे शिक्षण कोठून घेऊ इच्छिता, असा प्रश्न विद्यार्थ्यांना सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. त्याच्या उत्तरात सर्वाधिक 27 टक्के विद्यार्थ्यांनी दिल्लीस पसंती दिली. बंगळुरू (25.4%), मुंबई (18.3%) आणि अहमदाबाद(11.3%) दुसरे, तिसरे आणि चौथे सर्वात आवडीचे ठिकाण आहे. विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणात हेही सांगितले की, मॅनेजमेंट प्रवेश परीक्षांची प्रक्रिया लांब आणि क्लिष्ट असते.

बंगळुरूत देशाची पहिली ट्रान्स-डिसिप्लिनरी हेल्थ युनिव्हर्सिटी
भारतातील पहिल्या ट्रान्स-डिसिप्लिनरी हेल्थ युनिव्हर्सिटी- इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्स-डिसिप्लिनरी हेल्थ सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीची (आयएचएसटी) सुरुवात बंगळुरूमध्ये झाली आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील कोर्सेसमध्ये मेडिसिन आणि हेल्थ सायन्सेसच्या आधुनिक तंत्रासोबत शास्त्रात लिहिलेल्या गोष्टींसोबत दिली जाईल. आयएचएसटी आतापर्यंत एका फाउंडेशनच्या रूपात काम करत होते. मात्र, संस्थेची चांगली कामगिरी पाहता कर्नाटक सरकारने त्यास विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.