आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रुरकी येथील मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ आर्किटेक्चर आणि मास्टर ऑफ अर्बन प्लॅनिंग (एमयूआरपी) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया 31 मार्चपासून सुरू झाली आहे. 21 एप्रिलपर्यंत विद्यार्थी त्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. गेटच्या वैध स्कोअरवर प्रवेश आधारित असेल. त्याशिवाय काही अभ्यासक्रमांसाठी लेखी चाचणी किंवा मुलाखती दोन्ही घेतले जाऊ शकते.
स्पर्धा
एकूण जागा 700
25 हजार अर्ज
2 वर्षे कालावधी
पात्रता
एमटेकसाठी अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान विषयातील पदवीधर. काही विद्याशाखांत विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवीधारक विद्यार्थीदेखील अर्ज करू शकतात. एमआर्क आणि एमयूआरपीसाठी आर्किटेक्चरमध्ये पदवीधर. त्याचबरोबर गेटचे वैध स्कोअर. यंदाच्या पात्र पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणारे विद्यार्थीदेखील अर्ज करू शकतात. परंतु त्यासाठी 30 सप्टेंबर 2014 पूर्वी पदवी संपादन केलेली असावी.
शुल्क आणि शिष्यवृत्ती
आयआयटी, रुरकीमध्ये एमटेक अभ्यासक्रमासाठी शुल्क सुमारे 5 हजार रुपये आहे. प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांना एकूण 24 हजार 980 रुपये शुल्क द्यावे लागते. त्याशिवाय विद्यार्थ्यांना दर महिन्याला 8 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते. आयआयटी कानपूरमध्ये एमटेक कोर्सच्या प्रति सेमिस्टर अध्ययनासाठी सुमारे 16 हजार 500 रुपये एवढे शुल्क आहे.
गुवाहाटी डिझाइन सायन्स मास्टरमध्ये प्रवेश
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, गुवाहाटी येथील एमटेक, एमडेस आणि एमए (डेव्हलपमेंट स्टडीज) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया 19 मार्चपासून सुरू झाली आहे. त्यासाठी विद्यार्थी 23 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. गेट आणि सीईईडीचा वैध स्कोअर गरजेचा. कालावधी : 2 वर्षे . अर्ज : चार हजार अपेक्षित, शुल्क : प्रति सेमिस्टर पाच हजार.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.