आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदाच भारतीय विद्यापीठाने जागतिक क्रमवारीत मिळवला 5 वा क्रमांक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ सायन्स(आयआयएस) बंगळूर ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रीका)देशांच्या 404 विद्यापीठांच्या क्रमवारीत 5 व्या क्रमांकावर आहे. पहिल्यांदाच एका भारतीय शैक्षणिक संस्थेने पहिल्या 10 मध्‍ये येण्‍यात यश मिळवले आहे. ही क्रमवारी लंडन येथील क्वॅवेरीली सायमंड्स (क्यूएस) यांनी प्रसिध्‍द केले आहे. आयआयएसने प्रथमच आपली माहिती क्यूएसला दिले होते. ब्रिक्स राष्‍टांतील विद्यापीठांची क्रमवारी दिल्लीत बुधवारी(ता.आठ) प्रसिध्‍द केले. चीनचे सिंघुआ विद्यापीठ, पेकिंग विद्यापीठ आणि फुडान विद्यापीठ ही अनुक्रमे एक, दोन आणि तीन क्रमांकावर आहेत. रशियाचे लोमोनोसोव्ह मॉस्को स्टेट विद्यापीठ पाचव्या क्रमांकावर आहे. 400 क्रमवारीत चिनी 110 विद्यापीठांचा समावेश आहे.