आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेएनव्हीएसटी-2014 : जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी परीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरातील जवाहर नवोदय विद्यालयाच्या सहाव्या वर्गातील प्रवेशासाठी विद्यार्थी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात. त्यासाठी निवड चाचणी (जेएनव्हीएसटी) 8 फेब्रुवारी, 2014 ला होईल.
पात्रता
2013-14 मध्ये पाचव्या वर्गात शिकणारे, ज्यांचा जन्म 1 मे 2001 किंवा 30 एप्रिल 2005 नंतर झाला आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पाचव्या वर्गात उत्तीर्ण झाल्यानंतरच सहाव्या वर्गात नवोदयसाठी प्रवेश दिला जाईल. पहिल्यांदा जेएनव्हीएसटीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना त्यासाठी पुन्हा अर्ज करता येणार नाही.
परीक्षा पद्धती
दोन तासांच्या परीक्षेत 100 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. त्यात बौद्धिक क्षमतेचे 50, गणित 25, भाषा-25 प्रश्न विचारले जातील. बौद्धिक विभागासाठी विद्यार्थ्यांना 60 मिनिटांचा वेळ दिला जाईल. गणित, भाषा विभागाचे प्रश्न 30-30 मिनिटांत सोडवले जातील.
शुल्क
जवाहर नवोदय विद्यालयाच्या सहावी ते आठवी इयत्तेमधील विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. त्यांना वसतिगृह, खाण्याची सोय, युनिफॉर्म व पुस्तके मोफत दिली जातात. नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला 200 रुपये शुल्क भरावे लागते.
निकाल : मे 2014
उत्तर प्रदेशात सर्वाधिक नवोदय विद्यालये
नवोदय विद्यालय योजनेच्या अंतर्गत देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक विद्यालय सुरू होणार आहे. सध्या देशात 595 नवोदय विद्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक 70 नवोदय विद्यालये सुरू आहेत. दुसºया स्थानी मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेशात 50 विद्यालये आहेत.
न्यूज
चार शहरांतील संस्थांच्या संयुक्त
प्रयत्नातून मेटा विद्यापीठ
दिल्ली विद्यापीठ व जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाने एकत्र येऊन ‘मेटा विद्यापीठ’ अशी संकल्पना मांडली होती. त्याच धर्तीवर आता कोलकाता, हैदराबाद, पुणे व चंदिगडच्या आघाडीच्या शिक्षण संस्था एकत्र येणार आहेत. आयआयटी-रोपड, आयआयटी-हैदराबाद, आयआयएम कोलकाता, इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेज विद्यापीठ व इंडियन स्कूल ऑफ बिझनेस-हैदराबादसारख्या संस्था त्यात सहभागी आहेत. चार शहरांतील विद्यार्थी व शिक्षकांना समान सुविधा देणे व त्या सेवांचे आदान-प्रदान करणे, असे त्यामागील उद्दिष्ट आहे. या चार शहरांत सर्वाधिक विद्यार्थी शिकतात. त्यामुळे मेटा विद्यापीठासाठी या शहरांची निवड करण्यात आल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.
उद्योग विश्लेषणाचे
शिक्षण आयएसबीमध्ये
देशातील आघाडीच्या बिझनेस स्कूलमध्ये उद्योग विश्लेषण अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. इंडियन स्कूल ऑफ बिझनेस (आयएसबी) संस्थेकडून तो सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून वर्गातील अध्ययनाबरोबरच वेबवर आधारित शिक्षण तंत्रज्ञानाचेही शिक्षण घेणे शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांना डेटा मॅनेजमेंट संशोधक म्हणून घडवण्यासाठी त्यातून प्रयत्न केला जाणार आहे. बायोफार्मास्युटिकल कंपनी बायोकॉन त्यासाठी सहकार्य करण्यास पुढे आली आहे. हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम असेल. आयएसबीचे उपविभागप्रमुख दीपक चंद्रा यांच्या म्हणण्यानुसार 1 वर्षाच्या काळात अभ्यासक्रमाचे शुल्क 5 लाख रुपये होईल. त्याची पहिली बॅच सप्टेंबरपासून 104 विद्यार्थ्यांसह सुरू होईल.
डिजिटल मार्केटिंगमध्ये आता पूर्णवेळ कोर्स
डिजिटल मार्केटिंग विषयात विद्यार्थ्यांना पूर्णवेळ अभ्यास करता येणार आहे. व्यावसायिक शिक्षणाशी जोडलेली संस्था ईएमडीआय-इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनने हा अभ्यासक्रम देशात पहिल्यांदा लाँच केला. डिजिटल मार्केटिंग अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदविकेचा कालावधी एक वर्षाचा असेल. या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुगल अ‍ॅडवर्ड्स प्रोफेशनलसारखे प्रशिक्षण दिले जाईल. डिजिटल व इंटिग्रेटेड मार्केटिंग संवाद क्षेत्रात विद्यार्थ्यांना व्यावसायिक पातळीवर तयार करणे, असा त्यामागील हेतू आहे. ईएमडीआय प्रोफेशनल्ससाठी अभ्यासक्रमदेखील सुरू करण्यात येईल. हा तीन महिन्यांचा कोर्स असेल.
अचिव्हमेंट
आयआयटी दिल्ली सीआयएमए ग्लोबल बिझनेस चॅलेंज 2013 च्या फायनलमध्ये
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्लीचे चार विद्यार्थी साहेबजित सिंग अरोरा, दीपांशू अग्रवाल, वैभव यादव, सुरभि यादव सीआयएमए ग्लोबल बिझनेस चॅलेंज 2013 च्या अंतिममध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले. सीआयएमए ग्लोबल बिझनेस चॅलेंज आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारी एक स्पर्धा आहे. भविष्यातील बिझनेस लीडर्सची ओळख पटवणे, असा त्यामागील हेतू आहे. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये झालेल्या स्पर्धेत 24 देशांतील 96 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात दिल्ली आयआयटीचा चमू सहाव्या स्थानी राहिला. या स्पर्धेत अंतिम फेरीत दाखल होण्याची ही भारताची पहिलीच वेळ आहे.
शब्द word
> वारसदार - जां नशीनी - succession
> संस्कृती - सिकाफत - culture
> Contentment - संतुष्ट - खुरसंदी
प्रश्न आणि सूचनेसाठी एसएमएस करा
9200001174 या क्रमांकावर किंवा ई-मेल करा
education@dainikbhaskargroup.com