आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inspired Award: Application Deadline Still 28 February

इन्स्पायर अवॉर्ड : संशोधनात करिअर करण्याच्या संधी, 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे संचालित (इनोव्हेशन इन सायन्स परस्यूट फॉर इनोव्हेटिव्ह रिसर्च) फॅकल्टी अवॉर्ड्स स्किम, 2014 साठी 15 जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात. या माध्यमातून त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात स्वतंत्रपणे संशोधन करण्याची संधी मिळू शकेल. दरवर्षी जास्तीत जास्त एक हजार विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती पाच वर्षांसाठी दिली जाते.
पात्रता
सायन्स, मॅथ्स, इंजिनिअरिंग, फार्मसी, मेडिसिन किंवा अ‍ॅग्रिकल्चरशी संबंधित कोणत्याही विषयात पीएचडी केलेले विद्यार्थी. ज्या विद्यार्थ्यांनी शोधनिबंध जमा केले आहेत, मात्र पदवी मिळाली नाही, तेही अर्ज करू शकतात. वयोमर्यादा : 1 जानेवारी 2014 रोजी 27 ते 32 वर्षांदरम्यान असावे.
अर्जाची पद्धत
इन्स्पायर फॅकल्टी अवॉर्ड्ससाठी अर्ज करण्याच्या तीन पद्धती आहेत. डायरेक्ट मोडमध्ये विद्यार्थी थेट पद्धतीने अर्ज करू शकतात. इन्स्टिट्यूशन मोडमध्ये संस्था आपल्या विद्यार्थ्यांच्या नावाची शिफारस करेल. नॉमिनेशन मोडमध्ये शैक्षणिक किंवा संशोधन संस्थांचे कुलगुरू/संचालक किंवा शास्त्रज्ञांची शिफारस बंधनकारक असेल.
निवड प्रक्रिया
वेगवेगळ्या विषयांची तज्ज्ञ समिती अर्जदार विद्यार्थ्यांच्या मुलाखतीची यादी तयार करेल. मुलाखतीनंतर उच्चस्तरीय समितीकडून विद्यार्थ्यांच्या स्कोअरचा आढावा घेतला जाईल. निवडलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार होईल. यावर फॅकल्टी अवॉर्ड कौन्सिलचा अंतिम निर्णय होईल.
आयआयटीच्या असिस्टंट प्रोफेसरच्या सॅलरीसमान फेलोशिप
इन्स्पायर फॅकल्टी अवॉर्ड्ससाठी निवडलेल्या नव्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाईल. हे वेतन आयआयटीच्या असिस्टंट प्रोफेसरच्या वेतनासमान असेल. याव्यतिरिक्त त्यांना वार्षिक 7 लाख रुपये रिसर्च ग्रँट दिला जाईल.
मुलांनाही मिळतो इन्स्पायर अवॉर्ड
इन्स्पायर फॅकल्टी अवॉर्डची सुरुवात 2008 मध्ये झाली होती. विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे हा त्यामागचा उद्देश होता. सरकार याव्यतिरिक्त शाळकरी मुलांनाही इन्स्पायर अवॉर्ड देते. सहावी ते दहावीपर्यंतच्या जवळपास दोन लाख विद्यार्थ्यांची दरवर्षी यासाठी निवड होते.
नॉलेज
प्रयोग एका गोष्टीसाठी, संशोधनातून निघाले तिसरेच!
आपल्या रोजच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान प्राप्त केलेल्या अनेक गोष्टींचे जगात संशोधन झाले आहे. मात्र, हे संशोधन अनवधानाने, चुकीतून झाले ही यातील रंजक बाब आहे. एखाद्या गोष्टीचे संशोधन करत असताना अचानक त्यांना दुसरी गोष्ट शोधण्यात यश मिळाले. या काही संशोधनाची माहिती घेऊया....
टेफलॉन संशोधक - रॉय प्लंकेट
प्लंकेट एक चांगला रेफ्रिरजेटर बनवण्यासाठी हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिडसोबत एका विशिष्ट वायूचे मिश्रण घेऊन प्रयोग करत होते. त्यांनी कॅनिस्टरममध्ये दोन्ही वायूंचे मिश्रण रात्रभर कूलिंगसाठी ठेवले. मात्र, सकाळी पाहिले तर वायू नाहीसा झाला होता. तो एक नव्या पद्धतीचा पॉलिमर होता हे नंतर दिसून आले. त्याला टेफलॉन नाव देण्यात आले.
कॉर्न फ्लेक
संशोधक - जॉन केलॉग
ब्रेडला पर्याय ठरू शकेल आणि लवकर पचणा-या पदार्थाच्या संशोधनासाठी केलॉग भाऊ विल्यमसोबत प्रयोग करत होते. त्यांनी गहू गरम पाण्यात उकळण्यासाठी टाकला. मात्र, चुकून तो जास्त वेळ उकळत राहिला. बाहेर काढल्यानंतर तो फ्लेकच्या आकाराचा झाला. शिजवल्यानंतर त्याची चव चांगली लागली. त्यांनी असाच प्रयोग कॉर्नबरोबर केला. यातूनच कॉर्न फ्लेकचा शोध लागला.
मायक्रोवेव्ह ओव्हन
संशोधक - पर्सी स्पेन्सर
दुस-या महायुद्धाच्या काळात स्पेन्सर एका नव्या पद्धतीच्या मॅग्नेट्रॉनवर (व्हॅक्यूम ट्यूब जी रडार उपकरणास ऊर्जा देते) संशोधन करत होते. युद्ध संपल्यानंतर त्यांनी एके दिवशी काम करताना पाहिले तर खिशात ठेवलेला चॉकलेट बार वितळू लागला. त्यांनी पहिल्यांदा चॉकलेट आणि पुन्हा अन्य
खाद्यपदार्थाबरोबर प्रयोग केला तेव्हा या उपकरणात ते उष्ण होत असल्याचे दिसले. यातून मायक्रोवेव्ह ओव्हनचा जन्म झाला.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा