आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jee Mains Will Be Conducted On 3 Aprail Apply From 1st December

जेईई-मेन्सची परीक्षा 3 एप्रिलला होणार, एक डिसेंबरपासून ऑनलाइन अर्ज करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2016 मध्‍ये होणा-या जेईई मेन परीक्षा 3 एप्रिल रोजी होणार आहे. यासाठी ए‍क डिसेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात होईल. इंजिनिअरिंगमध्‍ये करिअर करु इच्छूणारे विद्यार्थी हा अर्ज ऑनलाइन भरु शकतात. जेईई मेनमध्‍ये उत्तीर्ण होणा-या उमेदवारांनी एनआयटी, आयआयआयटी आणि केंद्रीय निधीद्वारा संचालित टेक्निकल संस्थांमध्‍ये प्रवेश घेऊ शकतात.
जेईईमध्‍ये आता गुजरात, मध्‍य प्रदेश, उत्तराखंड, नागालँड आणि ओडिशा आदी राज्ये सामील झाली आहेत. सविस्तर माहिती संकेतस्थळावर अपलोड केली आहे. 2016 मध्‍ये होणा-या जेईई मेन परीक्षेची विद्यार्थी तयारी करीत आहेत. मेनमध्‍ये उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी एनआयटी, आयआयआयटी आणि इतर सरकारी संस्थांमध्‍ये प्रवेश घेऊ शकतात.
या संस्थांमधील प्रवेश गुणवत्ता यादीनुसार होणार आहे. यात 40 टक्के शालांत परीक्षेतील गुण आणि 60 टक्के जेईईतील गुण ग्राह्य धरले जाते. आता राज्य पातळीवरील महाविद्यालयांतील प्रवेशासाठी जेईई मेन्स 2016 मध्‍ये सामील व्हावे लागेल. जेईई मेन 2016 मध्‍ये दोन पेपर असतील. कोणताही विद्यार्थी तीन वेळा परीक्षा देऊ शकतो. परीक्षेची माहिती आणि अर्ज भरण्‍याचे टप्पे पीडीएफच्या रुपात संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. विद्यार्थी ते डाऊनलोड करुन अभ्‍यास करु शकतात.
पेपर्स
पेपर्स आणि प्रकार
पहिला पेपर : (बीई/बीटेक)
विषय : फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ
प्रश्‍नांचे स्वरुप : वस्तूनिष्‍ठ प्रश्‍न,
मोड ऑफ एग्झाम : पेन आणि पेपर बेस्ड/ संगणकावर आधारित
दुसरा पेपर : बी. आर्क/बी. प्लानिंग
विषय : मॅथ्स पार्ट - 01, अॅप्टिट्यूड टेस्ट आणि ड्रॉईंग
प्रश्‍नांचे प्रकार : वस्तूनिष्‍ठ
मोड ऑफ एग्झाम : पेन आणि पेपर बेस्ड
नोट : बीई बीटेकसाठी ऑनलाइन परीक्षा होईल. फक्त पहिल्या पेपरसाठी.

> वय : ओपन संवर्गातील विद्यार्थ्‍यांसाठी 1 ऑक्टोबर 1991 नंतरचा जन्म असावा.
* एससी, एसटी आणि अपंग विद्यार्थ्‍यांसाठी 1 ऑक्टोबर 1986 नंतरच जन्म असावा.
परीक्षेची तारीख : 3 एप्रिल 2016. पेपर - 01 (बीई/बीटेक). वेळ - 9.30 ते 12.30 एएम - 3 तास.
3 एप्रिल 2016 - पेपर 2 ( बी आर्क/बी.प्लॅनिंग). वेळ - 2 ते 5 वाजेपर्यंत = 3 तास.
वेबसाइटवर अपलोड झालीय सर्व माहिती
विद्यार्थी www.jeemain.nic.in या वेबसाइटवरुन परीक्षा, सिलॅबस, पात्रता, परीक्षा शुल्क, वय आणि त्याच्याशी संबंधित माहिती पाहू शकतात.