आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअर कॉर्नर : अभियांत्रिकी सोडून फोटोग्राफीत करिअर करणारा अवलिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आमिर खानच्या ‘थ्री इडियट’ चित्रपटातील वेगळी वाट निवडणारा फरहान सर्वांचा लक्षात आहे. त्या कथेची साधर्म्य असणारा अवलिया जळगावात आहे. छंदालाच करिअर म्हणून निवडण्यासाठी अभियांत्रिकीचे शिक्षण सोडून ‘वाइल्ड लाइफ फोटोग्राफी’त जितेंद्र मराठे रमला आहे. मूळचा साकळी (ता.यावल) येथील रहिवासी असलेल्या जितेंद्र मनोहर मराठे याने सन २०१०मध्ये पुण्याच्या पार्वताबाई गेनबा मोझे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता; पण आवड मात्र फोटोग्राफीची होती. लहानपणी कॅमेरा नसल्यामुळे तो फोटोग्राफी करू शकला नाही. महाविद्यालयात असताना मिळालेल्या मोबाइलमुळे त्याच्या फोटोग्राफीच्या छंदाला चालना मिळाली. सुटीच्या दिवशी परिसरातील पक्ष्यांचे फोटो टिपण्याचा छंद त्याने जोपासला.

त्यानंतरवर्षभरातच थेट अभियांत्रिकीचे शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्याच्या निर्णयाला अनेकांनी विरोध केला. मात्र, ‘थ्री इडियट’ चित्रपटात दाखवल्याप्रमाणे जितेंद्रने ‘वाइल्ड लाइफ फोटोग्राफी’ हेच आपले करिअर, असा ठाम निश्चय केला. २०११मध्ये त्याने अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला असताना शिक्षण सोडले.

मू.जे.तून सुरू केला प्रवास...
पुणे सोडल्यानंतर जितेंद्रने मू.जे.महाविद्यालयात प्राणीशास्त्र विषय घेऊन विज्ञान शाखेत पदवी शिक्षणाला प्रवेश घेतला. प्राणीशास्त्र याच विषयात ‘मॅक्रोफोटोग्राफी’ हा त्याचा छंद होता. एकदा महाविद्यालयात रांची येथील डॉ.राजीब बंदोपाध्याय यांचे व्याख्यान झाले. जितेंद्रने त्यांची भेट घेऊन आपला अल्बम दाखवला. त्याच्या कामावर खुश होऊन डॉ.बंदोपाध्याय यांनी जितेंद्रला रांचीला बोलावले. तेथून नंतर हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश अशा अनेक ठिकाणी जितेंद्रने फोटोग्राफीवर व्याख्याने दिली. तसेच त्याच्या छायाचित्रांचे प्रदर्शनही भरवले गेले.

निवडणुकांचे काम करून जमवले पैसे
जितेंद्रकडेकॅमेरा घेण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे त्याने स्थानिक निवडणुकांमध्ये प्रचारासंदर्भातील विविध कामे करून पैसे गोळा केले. स्वत:चा मोबाइल विकला आणि ७५ हजार रुपयांचा कॅमेरा घेतला. जळगावातील शिवाजी उद्यान भागात सतत तीन महिने दिवसभर थांबून त्याने फुलपाखरू, पक्ष्यांच्या मॅक्रो छायाचित्रांचा संग्रह केला.

केंद्र शासनाच्या प्रकल्पात मिळाली नोकरी
जितेंद्रची‘मॅक्रोफोटोग्राफी’ अत्यंत सुबक, आहे. त्याच्या कामाची दखल घेत त्याला पुण्यातील झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेच्या प्रकल्पात नोकरी मिळाली आहे. ही संस्था भारत सरकारच्या पर्यावरण विभागाशी संलग्नित आहे. त्याला नॅशनल जिऑग्राफी, डिस्कव्हरी चॅनल यासारख्या ठिकाणी काम करायचे आहे.

पुढे वाचा.. आवडीमुळे रुळलो