आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युथ कट्टा: सरकारी उद्योगांमध्‍ये 70 हजार नोक-यांची संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औद्योगिक क्षेत्रातील आकडेवारीनुसार यंदा सुमारे ६ हजार उमेदवारांना गेट-२०१५ च्या गुणाक्रमानुसार ३४ पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्जमध्ये (पीएसयू) नोकरी मिळतील. तज्ज्ञांच्या मते, देशातील आघाडीच्या सार्वजनिक उपक्रमांमध्ये सध्या नवोदित अभियांत्रिकी पदवीधरांसाठी २ ते ३ हजार जागा आहेत. इतकेच नव्हे तर मागच्या सहा महिन्यांत यात ७० हजारांपेक्षा जास्त नोकर भरती निघाली आहे. यात अभियांत्रिकीच्या सर्वाधिक जागा आहेत. नोकरीच्या वाढत्या आकडेवारीसोबत चांगल्या वेतनाचे पॅकेजही असून अभियांत्रिकी पदवीधरांना चांगल्या भविष्याची उत्तम संधी आहे.

गेट बनले एंट्री कार्ड
पूर्वी गेटचा गुणानुक्रम उच्च शिक्षण संस्थांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे माध्यम होते. मागच्या वर्षी सार्वजनिक उपक्रमांमध्ये गेटच्या गुणानुक्रमानुसार प्रारंभिक स्तराच्या पदांवर नियुक्तीचा ट्रेंड सुरू होताच याकडे विद्यार्थ्यांचे आकर्षण वाढले आणि यामाध्यमातून पीएसयूच्या भरतीलाही चालना मिळाली.
पायाभूत शाखेतील विद्यार्थ्यांना मागणी
उत्तम तांत्रिक ज्ञानासोबतच कोअर इंजिनिअरिंग फंडामेंटल्सचेही ज्ञान असलेल्या उमेदवारांची देशभरातील पीएसयूंना गरज आहे. यानुसार पीएसयूमध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्फर्मेशन अँड टेक्नालॉजी, केमिकल, काॅम्प्युटर सायन्स, पेट्रोलियम, ऑटोमोबाइल अभियंतांची नियुक्ती केली जात आहे. आकडेवारीनुसार, सिव्हिल, मॅकेनिकल व इलेक्ट्रिकल या पायाभूत शाखांच्या उमेदवारांची मागणी आहे.
खासगी क्षेत्राला स्पर्धा
आकर्षक वेतन पॅकेज उपलब्ध करून देत असल्यामुळे पीएसयू आता अव्वल खासगी कंपन्यांना तीव्र स्पर्धा देत आहे. बहुतांश पीएसयू ९ ते ११ लाखांचे वेतन पॅकेज सुरुवातीला देत आहेत. खासगी क्षेत्राच्या ७-८ लाखांच्या पॅकेजच्या तुलनेत हे जास्त आहे. सोबतच निवृत्ती लाभ, पेन्शन योजनांसह अन्य भत्तेही दिले जात आहेत.

अव्वल पीएसयू
नोकरीसाठी ओएनजीसी, बीपीसीएल, एसबीआय बँक या सरकारी क्षेत्रांमध्ये सध्या नोकरीसाठी सर्वाधिक पसंती दिली जात आहे. बीएचईएल, एचपीसीएल, काँन्कोर, गेल, बीईएल, डीडीए, नाल्को, एनएचपीसी आणि एमईसी भरतीसाठी स्वत: कटऑफ निश्चित करतात. त्यानुसार प्रक्रियेअंती भरती केली जाते.

नॉन गेट सिलेक्शन
गेट परीक्षांचा आधार न घेणाऱ्या काही कंपन्या स्वत: अशा परीक्षांचे आयोजन करत असतात. ही परीक्षा प्रत्यक्ष लेखी किंवा ऑनलाइन असू शकते. पीएसयूची परीक्षा ही नेहमी तांत्रिक व अतांत्रिक विभागांत विभागलेली असते. तांत्रिक विभागात संबंधित शाखेतील स्पेशलायझेशनवर फोकस असतो. तर अतांत्रिकमध्ये सामान्य ज्ञान, बुद्धिमता चाचणी, इंग्रजीचा समावेश असतो. निवड झालेल्या उमेदवारांना समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलावले जाते.
पुढे वाचा...गेट २०१५ च्या आधारे नियुक्त करणारे काही पीएसयू