आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाईसाठी खूष खबर, अॅप इंडस्ट्री नोकऱ्यांचा नवा राजमार्ग दाखणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मायक्रोसॉफ्ट, गुगल, नोकिया यांच्यासह जगभरातील प्रमुख कंपन्या खास प्रशिक्षण देऊन कल्पक अॅप डेव्हलपर्स तयार करण्यात गुंतल्या आहेत. उत्पादनांचा दर्जा अत्युच्च असावा यासाठी या कंपन्या प्रचंड गुंतवणूकही करत आहेत. याच कारणांमुळे सध्याचा काळ अॅप इंडस्ट्रीसाठी विस्तारण्याचा ठरणार आहे. नवनवीन अॅप्समुळे व्यवसाय वृद्धीसाठी करावयाच्या उपाययोजनांचे परिमाण बदलले असून यासोबत देशातील तरुणांना नोकऱ्यांची संधीही उपलब्ध झाली आहे. ही इंडस्ट्री देशातील युवकांसह प्रोफेशनल्सना आकर्षक करिअरही देत आहे. आयएएमएआय आणि आयसी आरआयईआरचा नवीन अहवालही हेच सांगतो. या अहवालानुसार सन २०१६ पर्यंत या इंडस्ट्रीत थेट करिअर संधीचा आकडा १,५१,२३० ते १,५९,०१०च्या दरम्यान असेल. एवढेच नव्हे, तर पुढील वर्षापर्यंत ही इंडस्ट्री सहा लाखांपेक्षा जास्त नोकऱ्या उपलब्ध करून देईल. सध्या अॅप सेक्टर ७५ हजार नोकऱ्या देत आहे.

काय आहे कारण ?
मोबाइलअॅप्लिकेशनच्या विक्रीची बाजारपेठ विस्तारत आहे. बहुतांश कंपन्या आपला व्यवसाय वाढवण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानात गुंतवणूक करत आहे. आईएएमएआई, केपीएमजीच्या रिपोर्टनुसार सन २०१६-१७ पर्यंत भारतात क्रमश: २३ कोटी ६० लाख आणि ३१ कोटी ४० लाख मोबाइल इंटरनेट युजर असतील. यासह डाऊनलोड केल्या जाणाऱ्या अॅप्सच्या संख्येतही प्रचंड वाढ होईल. मोबाइल इंटरनेटची वाढती बाजारपेठ अॅप तयार करू शकणाऱ्या कल्पक तरुणांसाठी पायघड्या अंथरत आहे.

नोकऱ्यांसह अप्रत्यक्ष रोजगार संधी
अॅपनिर्मितीमध्येमहत्त्वाची भूमिका पार पाडणारे साॅफ्टवेअर इंजिनिअर्स, युजर इंटरफेस डेव्हलपर्स, डिझायनर्स आणि इतर आयटी प्रोफेशनल्स यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. सेल्स आणि मार्केटिंग, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, फायनान्स, अकाउंट्स आदींद्वारे अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील.

ई-कॉमर्समुळे मागणीत वाढ
२०१४मध्ये २२०० कोटी डॉलरची कॉमर्स इंडस्ट्री २०१८ पर्यंत ८६०० कोटी डॉलरची होईल. या वाढीचे श्रेय मोबाइल अॅप्लिकेशन्सलाही असेल. विशेष म्हणजे २०१४ मध्ये मोबाइलद्वारे होणारी ई-कॉमर्स विक्री ४१ टक्के आहे. त्यामुळेच भविष्यात अॅप निर्मितीमध्ये गुंतलेल्या तरुणांना यशाचा राजमार्गच खुला होणार आहे.
पुढे क्लिक करा आणि वाचा, खुले होणार सुवर्णसंधीचे दालन