आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केव्हीपीवाय-2013 : किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेंतर्गत फेलोशिप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेसिक सायन्सची आवड असणारे विद्यार्थी सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटच्या ‘किशोर वैज्ञानिक योजना ’ (केव्हीपीवाय)साठी 2 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. 27 ऑक्टोबरला त्यासाठी परीक्षा होईल. यासाठीच्या फेलोशीपची संख्या निश्चित नसते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या सर्व विद्यार्थ्यांना ही फेलोशीप दिली जाते.


पात्रता
एस ए शाखा : अकरावी सायन्समध्ये शिक्षण घेणा-या आणि दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये गणित व विज्ञान या विषयांत किमान 80 टक्के गुण मिळवणे आवश्यक. एससी, एसटीसाठी 70 टक्के गुण आवश्यक
एसएक्स शाखा : 2013-14 मध्ये बारावीत प्रवेश घेतलेल्या आणि दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये गणित व विज्ञान या विषयांत किमान 80 टक्के गुण मिळवणे आवश्यक. एससी, एसटीसाठी 70 टक्के
एसबी शाखा : 2013-14 मध्ये बेसिक सायन्सचे विषय (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स) च्या पदवीपूर्व कोर्समध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये गणित व विज्ञान या विषयांत किमान 60 टक्के गुण आवश्यक. एससी, एसटीसाठी 60 टक्के


निवडीनंतरही पात्रता पूर्ण करावी लागणार
एसए अणि एसएक्स शाखांसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना गणित व
विज्ञान विषयासह किमान 60 टक्के गुण मिळवून परीक्षा उत्तीर्ण करून बेसिक सायन्सच्या पदवीपूर्व कोर्समध्ये प्रवेश मिळवावा लागेल. एसबी शाखेसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांना पदवीपूर्व कोर्समध्ये किमान 60 टक्के गुण
मिळवणे अनिवार्य असेल.


निवड प्रक्रिया
निवडीसाठी भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू येथील समितीची नियुक्ती केली जाते. ही समिती अर्ज छाननी करते. परीक्षेच्या आधारावर विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. दोन्हींच्या आधारावर अंतिम निवड होते.


निकाल : डिसेंबर 2013


मासिक 5 ते 7 हजार विद्यावेतन
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पदवीच्या तीन वर्षांसाठी मासिक 5 हजार रुपये आणि वार्षिक 20 हजार रुपयांचे विद्यावेतन मिळते. तर पदव्युत्तर शिक्षण घेणा-यांना मासिक 7 हजार आणि वार्षिक 28 हजार रुपये मिळतात.


फेलोशिपसाठी सातत्य गरजेचे
दरवर्षी फेलोशिपला मान्यता मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामगिरीत सातत्य ठेवावे लागले. प्रत्येक सत्रात त्यांना किमान 60 टक्के गुण मिळवावे लागतील. जर एखाद्या वर्षी कमी गुण मिळाले तर फेलोशिप बंद पडते. तसेच पुन्हा कामगिरी सुधारली आणि संपूर्ण कोर्समध्ये 60 टक्के प्राप्त केले तर पुन्हा लाभ मिळू शकतो.


1999 मध्ये सुरुवात
केंद्र सरकारने 1999 मध्ये केव्हीपीवायची सुरुवात केली होती. विद्यार्थ्यांना विज्ञानामध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देणे व त्यासाठी त्यांची मदत करणे हा त्यामागचा प्रमुख उद्देश होता. त्याअंतर्गत अकरावी, बारावी आणि प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची निवड केली जाते. फेलोशिप अंतर्गत मिळणारी रक्कम व इतर सुविधा प्री पीएचडी पर्यंत मिळतात.


खास विद्यार्थ्यांसाठी एमएस
ऑफिस 365 युनिव्हर्सिटी लाँच

दैनंदन प्रोजेक्ट, संशोधन कार्य आणि ऑफिस वर्कसाठी वापरले जाणारे मायक्रोसॉफ्ट ऑफिस विद्यार्थ्यांना केवळ 87 रुपये प्रति महिना दराने 4 वर्षांसाठी विकत घेता येईल. एमएस ऑफिस 365 युनिव्हर्सिटी नावाचे हे सॉफ्टवेअर विद्यार्थ्यांना केवळ 4199 रुपयांत दिले जाईल. जर संस्थांना हे डाऊनलोड करायचे असेल तर त्यासाठी दरमहा 900 रुपये लागतील.


34 हजार महाविद्यालये,563 विद्यापीठे संलग्न
मायक्रोसॉफ्टने यासाठी देशातील 55 प्रमुख शैक्षणिक संस्था, 563 विद्यापीठे आणि 34 हजार महाविद्यालयांशी टाय अप करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एमएस वर्ल्ड, पॉवरपॉइंट, एक्सेल, वन नोट, आऊटलूक, पब्लिशर आणि एक्सेस सारखे ऑफिस प्रॉडक्टस वापरता येईल. एक यूझर दोन संगणकांवरही ऑफिस 365 इन्स्टॉल करू शकेल. विद्यार्थ्यांना वेब बेस्ड ऑफिस ऑन डिमांड सुविधेचाही वापर करता येईल. सॉफ्टवेअरमध्ये 20 जीबीपर्यंत स्काय ड्राईव्ह स्टोरेजची सुविधा आहे.
पूर्णवेळ आणि अर्धवेळ अभ्यासक्रमासाठी प्रवेश असणारे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात.


किंमत : 4199 रुपये वैधता : 4 वर्षे
अर्ज कुठे करावा : www.office.com/verify

इंटरेस्टिंग कोट
“The goal of science and engineering is to build better mousetraps. The goal of nature is to build better mice.” -Anonymous
विज्ञान आणि अभियांत्रिकीचे लक्ष्य उंदरांचा अधिकाधिक उत्कृष्ट पिंजरा बनवणे आहे, तर निसर्गाचे उत्कृष्ट उंदीर बनवणे हे आहे.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या क्रमांकावर किंवा इ-मेल कराeducation@dainikbhaskargroup.com