आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थोरांची शिकवण: ज्याला अपेक्षा कमी, तोच जगात सर्वात आनंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डायोजिनी ऑफ सिनोपे
४१२बीसी- ३२३ बीसी

डायोजिनी ऑफ सिनोपे ग्रीक तत्त्वज्ञ होते. त्यांचे पूर्ण जीवन वादातीलच राहिले. त्यांनी म्हटले होते की, जे चांगले आहे, ते पुस्तक किंवा थेअरीपर्यंत मर्यादित ठेवू नका. त्याला परिस्थितीत उतरवा. सिनोपे अथेन्सच्या रस्त्यावर राहून भिकाऱ्यासारखे जीवन जगले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली; परंतु त्यांचे कोणतेही काम आज उपलब्ध नाही.

>जे अाहे त्यात समाधानी राहण्याची कला असणाऱ्या व्यक्तीकडेच सर्व काही असते.
>पृथ्वीवरील सर्व प्राण्यांमध्ये मानव हाच सर्वात मूर्ख प्राणी अाहे.
>जेव्हा विद्यार्थी खोड्या करताे, तेव्हा शिक्षकांनी त्यास रागवले पाहिजे.
>काेणी दुसरा दु:ख देऊ शकत नाही. अापण स्वत:च स्वत:ला दु:ख देतो.
>चांगल्या व्यक्तीची ओळख एक चांगला व्यक्तीच करू शकतो.
>ईश्वर अाहे किंवा नाही, हे कोणाला माहीत नाही; परंतु ईश्वर असायलाच हवा.
>सूर्य उगवतो, मावळतो, परंतु त्याच्यावर कोणी डाग लावू शकत नाही.
>ईश्वर कोणत्याही वस्तूची अपेक्षा करत नाही आणि ईश्वरास मानणाऱ्या व्यक्ती थोड्याशा वस्तूंमध्येदेखील आनंदी राहतात.
>कोणताही व्यक्ती कधी मूर्ख असू शकत नाही. फरक इतकाच असतो की दोघांची विचार करण्याची पद्धत वेगळी असते.
>गरिबी काय असते, हे तुम्ही स्वत:लाच शिकवू शकतात.
>डॉग आणि फिलॉसॉफर सर्वात चांगले काम करतात; परंतु या दोघांच्या कामांची ओळख खूपच कमी असते.
>स्वत:ला कधी एका देशाचा किंवा एका शहराचा नागरिक समजू नये, तर स्वत:ला जगाचा नागरिकच समजावे.
>जे लोक दुसऱ्यांमध्ये कमतरता शोधतात, त्यांच्यात सर्वात जास्त कमतरता असते.