आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्युटी प्रोडक्ट्स बनवणा-या प्रसिध्‍द लॉ\'रियल कंपनीची Inspirational Story

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉ'रियलची एक जहिरात - Divya Marathi
लॉ'रियलची एक जहिरात
सौंदर्यासाठी जेव्हा एका औषधविक्रेत्याने जगातील पहिला केमिकल हेअर डाय बनवला, तेव्हा कोणालाही वाटले नसेल, की तो 40 हजार लाख रुपयांची मालमत्ता सोडून जाईल. 24 अब्ज डॉलर वार्षिक व्यवसाय असलेल्या या समूहात सध्‍या 75 हजारापेक्षा जास्त लोकांना प्रत्यक्ष रोजगार देत आहे. शंभरपेक्षा जास्त वर्षांपूर्वी 1909 मध्‍ये केमिकल हेअर डायसह जन्माला आलेला लॉ'रियल आज जगातील सर्वात प्रतिष्ठित कॉस्मेटिक ब्युटी ब्रँड आहे. लॉ'रियल समुह सध्‍या 500 पेक्षा जास्त सौंदर्यप्रसाधनांचे उत्पादन घेत आहे. हेयर कलर, स्किन केअर , सन प्रोटेक्शन, मेकअप, परफ्यूम, हेअर केअर ही प्रमुख उत्पादने आहेत. त्वचाशास्त्र(डर्मेटॉलॉजी), विषशास्त्र(टॅक्सीकॉलॉजी), टिश्‍यू इंजिनिअरिंग आणि फार्मास्युटिकल रिसर्चसाठीही प्रसिध्‍द आहे. लॉ'रियलला अमेरिकेत सर्वाधिक नॅनो टेक्नॉलॉजी पेटंट मिळाले आहे.

शुलरची सौंदर्यासाठी शोध
लॉ'रिलयचे संस्थापक युजिन पॉल लुई शुलर यांचा 20 मार्च, 1981 मध्‍ये फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे जन्म झाला.रसायनशास्त्रच्या नॅशनल स्कूलमधून ( आजचे चिमी पॅरिस टेक) 1904 मध्‍ये त्यांनी केमिस्ट या पदाची डिग्री घेतली. रसायन शास्त्रज्ञ असल्याने त्यांना नोकरी मिळणे शक्य नव्हते. पण त्यांची महत्त्वाकांक्षा होती स्वत:चा व्यवसाय. 1907 मध्‍ये आपल्या किचन सिंकमध्‍ये त्यांनी जगातील पहिला केमिकल हेअर डाय बनवला. या क्रांतिकारी ब्युटी प्रोडक्टला 'ऑरेल' असे नाव दिले आणि ते पॅरिसच्या हेअर ड्रेसर्सला विकले. ऑरेलला चांगला प्रतिसाद मिळाल्यावर शुलर यांनी 1909 मध्‍ये 'सेफ हेअर डाय कंपनी पॅरिस' ही एक कंपनी सुरु केली. नंतर जगात तिला 'लॉ'रियल' या नावाने ओळखले जाऊ लागले. शुलर यांचा व्यवसाय मंत्र होता, 'सौंदर्यासाठी शोध'. याच मंत्रावर लॉ'रियलने आपल्या शंभरपेक्षा जास्त असलेल्या इतिहासात लग्झरी ब्युटी प्रोडक्ट्स किंवा हाय एंड कॉस्मेटिक्स उत्पादने बनवली आहेत. लॉ'रियल समुहाच्या इतर व्यवसायांमध्‍ये फाइन केमिकल्स, हेल्थ फायनान्स, डिझाइन, जाहीराती आणि इन्श्‍युरन्सचा समावेश आहे.
लॉ'रियलची कथा पुढील स्लाइड्सवर पाहा...