4 ऑगस्ट 1821 रोजी फ्रान्सच्या एन्केमध्ये लुई विटॉन यांचा जन्म झाला. त्यांचे वंशज सुतारकाम, पिठाची गिरणी चालवत असे. लुईस यांचे वडील शेतकरी होते तर आई पिठ-मसाल्याची गिरणी चालवायची. ते दहा वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. यानंतर गरिबीने आणि सावत्र आईच्या त्रासामुळे लुईस यांनी पॅरिसला जाण्याचा निर्णय घेतला. पण पैसे नव्हते. वयाच्या 13 व्या वर्षी पायी चालत दोन वर्षात त्यांनी पॅरिस गाठले.
1837 मध्ये पॅरिसमध्ये आल्यानंतर बॉक्सची बांधणी आणि पॅकेज करण्याची प्रशिक्षणार्थी बनले. त्या दिवसांमध्ये बॅगेतील सामान पाहून प्रवाशांचा स्थिती कळून येत असे. पॅकिंग आणि मेकिंग तेव्हा प्रतिष्ठित व्यवसाय मानला जातो. हळुहळू लुईसने या कामात नैपुण्य मिळवले. 1953 मध्ये नेपोलियन बोनापार्टच्या पत्नी आणि फ्रान्सची साम्राज्ञींने त्यांना आपला खासगी बॉक्स मेकर अॅण्ड पॅकर म्हणून नियुक्ती केली. लुईस राणीचे सुंदर अशी वस्त्र पॅकिंग्स महालातून समुद्रकिना-यावरील रेस्तरॉंपर्यंत पोहोचवू लागला. याबरोबरच त्यांचा श्रीमंत ग्राहकांशी संपर्क येऊ लागला आणि यातून जन्माला आले लक्झरी ब्रँड लुईस विटॉन.
जगातील श्रीमंतांचा आवडीचा लक्झरी ब्रँड लुईस विटॉनचे जन्मदात्याजवळ कधीच रेल्वे आणि बसने प्रवासासाठी पैसे नव्हते. अनेक वर्षांपूर्वी आपल्या शहरापासून 260 किलोमीटर पायी जात असताना लुईस हे जे काम मिळेल ते करायचे आणि दोन वर्षांत पॅरिसला पोहोचले. येथे त्या जगप्रसिध्द ब्रँडचा पाया घातला गेला.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या नेपोलियन बोनापार्टनेही केला होता लुईस विटॉनचा सन्मान..