आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Managament Funda: Second Forme Of Three Idiots Mean Honesty

थ्री इडियट‌्सचे दुसरे रूप म्हणजे प्रामाणिकपणा, जाणून घ्‍या कसे?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेटवर एक छाेटीशी गाेष्ट सुरू अाहे की, कशाप्रकारे एका यशस्वी उद्याेजकाने अापले संचालक किंवा मुलं यातून उत्तराधिकारी म्हणून काेणाला निवडायचे, या स्थितीत एका तरुण एक्झिक्युटिव्हला ही जबाबदारी दिली. गाेष्ट अशी अाहे की, बैठकीत ते म्हणाले, ‘मी तुम्हाला प्रत्येकाला एक-एक बी देताे, जी अत्यंत विशेष अाहे. तुम्ही ही बी लावा, नियमित तिला पाणी द्या अाणि एक वर्षाने पुन्हा येथेच या. पण, येताना या बीपासून मिळणाऱ्या वस्तूला घेऊन तुम्ही यावे, असे मला वाटते. त्यानुसार, मी सीईअाे घाेषित करेल. अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे एक्झिक्युटिव्ह जिमलादेखील बी देण्यात अाली. त्याने घरी जाऊन बायकाेला सर्व गाेष्ट सांगितली. तिने एक कुंडी, चांगली माती अाणि खत अाणून त्याची मदत केली. ते अत्यंत प्रामाणिकपणे त्याला पाणी देऊ लागले अाणि राेप वाढण्याची वाट बघू लागले. तीन अाठवड्यांनंतर काही एक्झिक्युटिव्हजनी अापण लावलेल्या राेपट्याच्या वाढीबद्दल चर्चा सुरू केली. जिम सातत्याने राेपट्याकडे लक्ष ठेवून हाेते. पण, काहीच हाेत नव्हते. दिवस, अाठवडे, महिने निघून गेले अाणि सगळेच राेपट्याबाबत बाेलू लागले, शिवाय जिमच्या. कारण त्यांचे बी अजून राेप नव्हते बनले. ते अपयशी ठरत असल्याचे त्यांना वाटत हाेते. सहा महिन्यांनंतर जिम यांच्या कुंडीत राेप अालेले नव्हते. त्यांना माहिती हाेते की, त्यांनी राेपट्याची हत्या केली अाहे. बाकी सगळ्यांकडे राेपटे अाहे अाणि त्यांच्याचकडे काही नाही. जिम या गाेष्टीसंदर्भात कुणाशीच काही बाेलत नव्हते. तरीदेखील ते राेज त्या कुंडीत पाणी टाकून मातीला पाेषक बनवण्याचा प्रयत्न करत हाेते. त्यांना वाटायचे की, बाॅसने मागितल्यावर त्यांना दाखवायला त्यांच्याकडे काही अंकुर तरी असावे. एक वर्षाने सीईअाेंना निरीक्षण करण्याची वेळ अाली. जिमने त्यांच्या पत्नीला सांगितले की, ते रिकामी कुंडी घेऊन जाणार नाही, पण पत्नी म्हणाली की, काहीही झाले तरी तुम्ही प्रामाणिक राहा. जिमला वाईट वाटत हाेते अाणि त्यांना माहीत हाेते की, हा त्यांच्या अायुष्यातील सर्वात लाजिरवाणा क्षण असावा. परंतु, त्यांना हेदेखील ठाऊक हाेते की, त्यांची पत्नी बराेबर अाहे.

ते रिकामीच कुंडी घेऊन बाेर्ड रूममध्ये पाेहाेचले. जिम हे पाहून थक्क झाले की, इतर एक्झिक्युटिव्हजच्या राेपांचे प्रकार वेगवेगळे हाेते. वेगवेगळ्या अाकार अाणि प्रकारांची राेपे अत्यंत सुंदर हाेती. जिमने अापली रिकामी कुंडी जमिनीवर ठेवली. कित्येकांनी त्यांची खिल्ली उडवली. काहींनी त्यांचे सांत्वन केले. बाेर्ड रूममध्ये वेगवेगळ्या प्रकारांची राेपे पाहून सीईअाेंची नजर रिकाम्या कुंडीकडे गेली. जिम घाबरलेले हाेते. त्यांना वाटले, सीईअाे अापल्या अपयशामुळे नाेकरीवरून काढून टाकतील. जिमच्या अपयशाची कथा एेकल्यावर सीईअाेंनी शांततापूर्वक सांगितले की, ‘पुढील सीईअाे जिम अाहे.’ ते सांगू लागले की, मागील वर्षी मी तुम्हा सर्वांना अाजच्याच दिवशी उकडलेल्या बिया दिल्या हाेत्या. त्या मृत हाेत्या, त्यामुळे त्यांचे राेपट्यात रूपांतर हाेणे शक्य नव्हते. जिम वगळता तुम्ही सर्वांनीच मला वेगवेगळे अाकर्षक राेपटे अाणून दिले. कारण जेव्हा तुम्हाला कळाले, तेव्हा तुम्ही दुसरे बी अाणून राेपटे उगवले. फक्त जिम हे साहसी अाणि प्रामाणिक अाहेत, ज्यांनी मी दिलेली बी लावलेली कुंडी इथे अाणली.

पुढे वाचा... सुंदर पिचाई यांनीदेखील गुगलचे सीईअाे बनण्यासाठी असेच केले