प्रत्येक पालक आपल्या मुलांना चांगल्या सुविधा असलेल्या शाळेत प्रवेश मिळून देण्यासाठी प्रयत्न करत असतो. परंतु जगाचा भूगोल असा आहे जिथे माणसाच्या इच्छेला स्थान नसते. यामुळे जगभरातील दुर्गम भागात मुले धोकादायक रस्त्यांवरुनही चालत जाऊन शाळते जातात. आज जागतिक साक्षरता दिवसानिमित्त divyamarathi.com तुम्हाला काही अशी छायाचित्रे दाखवणार आहे. ज्यात त्या शाळकरी मुलांचे धाडस आणि शिक्षणाची तीव्र इच्छा शक्ती पाहून तुम्ही त्यांना सलाम कराल. यांपैकी काही रस्ते असे आहेत त्यावरुन तुम्ही कधीच जाण्याचा विचार करु शकणार नाही. मात्र त्याच रस्त्यांवरुन ही मुले दररोज शाळेत जातात.
प्रत्येक समस्या कुटनीतीने सोडवणारा चीन असो किंवा जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणारा भारत येथील शाळकरी मुलांना ता-यांवरचे कसरत करुन शाळेत जावे लागते. बहुतेक देशांमध्ये दुर्गम भागातील या समस्येवर अद्यापही उपाय सापडलेला नाही. जगात अशा शाळा आहेत जिथे पोहोचणे खूपच जोखीमपूर्ण आहे. गाड्यांचा येथे विचार करुही नका. पायी चालणे या रस्त्यांने अवघड आहे. हजारो फुट उंचावर असलेल्या या भयानक रस्त्यांवरुन दररोज शाळकरी मुले जातात. जगातील अनेक रस्ते इतके भयावह आहेत जिथे मुलांच्या जीवाला धोका असूनही ती नदी आणि ओढे ओलांडून शाळेला जातात.
पुढील स्लाइड्सवर पाहा अशी छायाचित्रे ज्यांना पाहून तुम्ही या मुलांच्या शिक्षणाच्या आवडीला सलाम कराल...