आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हैसूर विद्यापीठ प्रवेश परीक्षा: विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी परीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्हैसूर विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा 17 ते 23 जुलैपर्यंत असेल. याद्वारे विद्यार्थी विद्यापीठाच्या विभागात व इतर महाविद्यालयांत 66 पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतील. या परीक्षेतून विद्यार्थी मानसगंगोत्री कॅम्पस, मांड्या, हसन व चामराजनगरातील पदव्युत्तर पदवी केंद्रात प्रवेश घेतील.


स्पर्धा
66 अभ्यासक्रम (वेगवेगळ्या जागा)
22 हजार अर्जदार (सुमारे)


पात्रता
ज्या अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी अर्ज करणार आहात, त्या विषयातील पदवी. जे विद्यार्थी पदवीच्या तिस-या वर्षात शिकत आहेत, तेदेखील परीक्षा देऊ शकतात.
निकाल : 31 जुलै


परीक्षा पद्धती
एका तासाच्या पेपरमध्ये प्रत्येक विषयासाठी पदवी पातळीवरील प्रश्न विचारले जातील. त्यात 50 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. मायनस मार्किंग नसेल. परीक्षेनंतर योग्य उत्तराची यादी 25 जुलैला विद्यापीठाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात येईल.


शुल्क
विद्यापीठात वेगवेगळ्या योजनेअंतर्गत अभ्यासक्रम विभाजित करण्यात आले आहेत. प्रत्येक अभ्यासक्रमाचे शुल्क वेगळे आहे. योजना-‘ए’मध्ये येणा-या एमबीएचे अध्यापन शुल्क 50 हजार रुपये आहे, परंतु एम.एड.ची केवळ 4 हजार रुपये आहे. योजना-‘बी’मधील एमएस्सी बायोटेकचे अध्यापन शुल्क 77 हजार रुपये आहे; परंतु एमटेक इन अर्बन अँड रिजनल प्लॅनिंगचे शुल्क 28 हजार रुपये आहे. क्राइस्ट विद्यापीठात एमबीएचे शुल्क सुमारे दीड लाख रुपये आणि आयआयएम-अहमदाबादमध्ये एमबीएचे शुल्क 2015 पासून सुमारे 17 लाख रुपये होईल.
ब्रिटिशांच्या कार्यकक्षेबाहेर राहिलेले


पहिले विद्यापीठ
27 जुलै 1916 रोजी म्हैसूर विद्यापीठाची स्थापना झाली. इंग्रजांच्या कार्यकक्षेबाहेर राहिलेले हे देशातील पहिलेच विद्यापीठ होते. हे देशातील सहावे आणि कर्नाटकातील पहिलेच विद्यापीठ होते. आजघडीला या विद्यापीठांतर्गत 200 महाविद्यालये येतात.


गुगलच्या सहकार्याने बनवली डिजिटल लायब्ररी
म्हैसूर विद्यापीठाच्या ग्रंथालयाचा देशातील सर्वात मोठ्या ग्रंथालयांमध्ये समावेश होतो. प्रारंभी या ग्रंथालयात 2,311 पुस्तके होती आज तेथे सुमारे 7.5 लाख दस्तऐवज डिजिटल फॉर्मेटच्या स्वरूपात आहेत. या ग्रंथालयात अनेक दुर्मिळ पुस्तके आहेत. त्या सर्व पुस्तकांचे डिजिटायझेशन गुगलच्या मदतीने करण्यात आले आहे. त्यात म्हैसूरच्या इतिहासाच्या पुस्तकांपासून 1 लाख ताम्रपत्रांचाही समावेश आहे. ते सर्व आठव्या शतकात झाडांच्या पानांवर लिहिण्यात आले आहेत. या ताम्रपत्रांमध्ये गणित, आयुर्वेद, चिकित्सा आणि विज्ञान या विषयांचा समावेश आहे.


ज्ञान
1971 मधील ‘अमेरिकी स्वातंत्र्याचा जाहीरनामा’ पहिले ई-बुक
अमेरिकी लेखक मायकल एस. हार्ट यांनी 1971 मध्ये संगणकावर अमेरिकी स्वातंत्र्याचा जाहीरनामा (यूएस डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स) संगणकावर टाइप केला होता. जगातील पहिले इलेक्ट्रॉनिक बुक म्हणून त्याला मान्यता मिळाली. त्यानंतर त्यांनी गटनबर्ग प्रकल्पाची सुरुवात केली आणि अमेरिकी स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याच्या अनेक ई-प्रती तयार केल्या. त्यानंतर 1985 मध्ये व्होएजर कंपनीने सीडी रोमवर ई-बुक्स तयार करण्यास प्रारंभ केला. 1995 मध्ये सर्वात मोठी ई-शॉपिंग वेबसाइट अमेझॉनने मुद्रित स्वरूपातील पुस्तके इंटरनेटवर विकण्यास प्रारंभ केला. 2000 नंतर मायक्रोसॉफ्टने रीडर, सोनीने सोनी लिब्री आणि अमेझॉनने किंडल ई-बुक सादर केले. प्रत्येक 100 मुद्रित पुस्तकांच्या तुलनेत इंटरनेट वापरकर्ते 114 ई-बुक्स डाउनलोड करत आहेत, असा दावा अमेझॉनने 2012 मध्ये केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे केला आहे.


रंजक
दाताच्या डॉक्टरने तयार केले बुढ्ढीचे बाल
यात्रेमध्ये मिळणारी गुलाबी रंगाचे जाळीदार बुढ्ढीचे बाल (कॉटन कँडी) दातांसाठी हानीकारक मानले जातात. त्याचा शोध एका दाताच्या डॉक्टरने लावला होता. विल्यम मॉरिसन या दंत चिकित्सकाने आपल्या मित्राच्या सहकार्याने साखर झटपट विरघळवून त्याचे धागे तयार करणारे यंत्र तयार केले. ते यंत्र त्यांनी एका यात्रेत सादर केले. तेव्हापासून बुढ्ढीचे बाल जगभर प्रसिद्ध झाले. अन्य एक दंतचिकित्सक जोसेफ लसकॉक्स यांनी तर आपल्या दवाखान्यातच बुढ्ढीचे बाल विकायला सुरुवात केली होती.


इंटरेस्टिंग कोट
"The production of too many useful things results in too many useless people."― Karl Marx
उपयुक्त वस्तूंचे भरमसाट उत्पादन करण्यात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक निरुपयोगी होत चालले आहेत. -कार्ल मार्क्स
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा 9200001174 यावर
किंवा मेल करा education@dainikbhaskargroup.com