आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National Scolarship For Education: School Scholarship And Award

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती: शालेय शिष्यवृत्ती व पुरस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काल आपण केंद्र सरकारकडून दिल्या जाणा-या काही शैक्षणिक व अन्य काही संस्थांच्या शिष्यवृत्तीसंदर्भात माहिती वाचली. शालेय विद्यार्थ्यांना मिळणा-या सरकारी शिष्यवृत्ती व अन्य पुरस्कारांची माहिती आज वाचा.

विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांसोबत काम करण्याची संधी मिळते
विद्यार्थ्यांना संशोधनामध्ये आवड निर्माण व्हावी, तसेच विज्ञानात चांगले गुण घेणा-या विद्यार्थ्यांची ओळख प्राथमिक स्तरावर व्हावी यासाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना व पुरस्कार दिले जातात. याचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना मोठमोठ्या संस्थांमध्ये व शास्त्रज्ञांसोबत काम करण्याची संधी मिळते. याबरोबर शालेय स्तरावरील बुद्धीवंत विद्यार्थ्यांना ओळख मिळते.


प्रोत्साहनपर कार्यक्रम
इनोव्हेशन ऑफ सायन्स पर्स्यूट फॉर इंस्पायर्ड रिसर्च(इंस्पायर). स्कीम फॉर अर्ली अ‍ॅट्रॅक्शन ऑफ टॅलेंट्स फॉर सायन्स(सीट्स) हा त्याचा एक भाग आहे. 10 ते 15 वयोगटातील विद्यार्थ्यांची विज्ञानामध्ये आवड निर्माण करण्यासाठी ही योजना आहे. दरवर्षी दहा लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते. गुणवत्ता यादीत येणा-या 50 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी 100 वेगवेगळ्या ठिकाणी उन्हाळी-पावसाळी शिबीर होतात.


पात्रता : सहावी ते दहावीपर्यंत शिकणारे विद्यार्थी
निवड : प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची निवड करतात.
रक्कम : विद्यार्थ्यांना एक प्रोजेक्ट तयार करण्यासाठी 5 हजार रुपयांपर्यंतचा निधी दिला जातो आणि प्रोजेक्ट प्रझेंटेशनसाठी एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात जाण्यासाठी प्रवास खर्च.


बालसंशोधक प्रोत्साहन योजना
मुलभूत विज्ञानात रस असणा-या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. शिष्यवृत्तीची संख्या निश्चित नाही. तीन श्रेणीमध्ये त्याचे विभाजन होते : शाखा एसए (अकरावी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी), एसएक्स (बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी), एसबी (पदवीमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी). तीनही श्रेणीसाठी अर्हता वेगवेगळी आहे.
निवड : अ‍ॅप्टिट्यूड चाचणी द्वारे. चाचणीमध्ये उत्तीर्ण होणा-या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.
कालावधी व मूल्य : विद्यार्थ्यांना पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळते. त्यात पदवीच्या काळात तीन हजार रुपये प्रती महिना 5 हजार रूपये आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी दर महिन्याला 7 हजार रुपये.


एनटीएसइ
दहावीच्या विद्यार्थ्यांमधील सर्वाधिक चांगले प्रदर्शन करणा-या विद्यार्थ्यांसाठी. त्यासाठी नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम शिष्यवृत्ती घेतली होती. दरवर्षी सुमारे दीड लाख विद्यार्थी ही परीक्षा देतात. परंतु केवळ 1000 विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती मिळते. डॉक्टरोल पातळीपर्यंत फायदा.


पात्रता : 10 वीच्या विद्यार्थ्यांना एनटीएसइ परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्ती दिली जाते.
निवड : एनटीएसइ परीक्षा दोन टप्प्यात होते. दुस-या टप्पा पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलवले जाते. त्यानंतर निवड होते.
कालावधी व मूल्य : डॉक्टरेट पातळीवरील शिष्यवृत्ती. 11 वी नंतर 500 रुपये व पदवी, पदव्यूत्तर व डॉक्टरेटपर्यंत यूजीसीच्या नियमानुसार शिष्यवृत्ती.


सीएसआयआर इनोव्हेशन अवॉर्ड्स
विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक संपदेविषयी आवड निर्माण करण्यासाठी. दरवर्षी 30 पुरस्कार मिळतात. पहिला पुरस्कार 1 लाख रुपयांचा आहे. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआयआर) कडून दिले जाते.
पात्रता : देशातील कोणत्याही शाळेत शिक्षण घेणारा विद्यार्थी. 18 वर्षांपर्यंतची वयोमर्यादा.
निवड : विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या कल्पक प्रकल्पाच्या आधारावर केली जाते.
महत्वाची तारीख : विद्यार्थी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात.


Did You Know?
Everyday Latin phrases
Ibid
Ibid. is an abbreviation for the Latin word ibidem meaning "in the same place." The phrase is useful for citations and bibliographies to refer to a source cited in a previous entry, possibly appearing in a citations page as:
[1] Cicero, M.T. Latin 101 (Rome: Academic, 21 BCE), p. 4.
[2] Ibid.
Ibid. is always followed by a period, is capitalized only at the beginning of a sentence or citation, and may be italicized depending on the writer's preference.
Et.al
Et al. is an abbreviation of the Latin phrase et alii meaning "and others." The term references groups of people (not things). Et al. is useful for citations and referring to a group by a few of its members, as in: "The city often relied on superheroes: Captain Planet, Wonder Woman, Batman et al." The term is only capitalized at the beginning of a sentence, and it always takes a period. However you can decide whether or not to put a comma before it.
Etc.
This common abbreviation etc. represents the Latin phrase et cetera meaning "and so forth" or literally "and the rest." Etc. abbreviates lists of things (not people) in which unlisted items can be deduced from the existing list and listing them would be truly unnecessary. For example: "He could see dragons in every type of cloud (stratus, nimbus, cumulous, etc.)." Etc. is always followed by a period. At the end of a list, it is preceded by a comma, as though it were simply the next term in line.


प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या क्रमांकावर किंवा इ-मेल करा education@dainikbhaskargroup.com