Home »Edubhaskar »Others »Exams» NDA-2014 : National Defence Acadamy- Nevy Acadamy Entrance Examination

एनडीए-2014 : राष्ट्रीय संरक्षण अकादमी-नौदल अकादमीमध्ये प्रवेशासाठी परीक्षा

दिव्य मराठी | Sep 13, 2013, 21:18 PM IST

  • एनडीए-2014 : राष्ट्रीय संरक्षण अकादमी-नौदल अकादमीमध्ये प्रवेशासाठी परीक्षा

राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या लष्करी, हवाई तसेच नौदल अकादमीमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी सध्या अर्ज करू शकतात. अर्जाची शेवटची तारीख 20 जानेवारी 2014 आहे. लोकसेवा आयोगाकडून ही परीक्षा 20 एप्रिलला
घेतली जाते.


स्पर्धा
७९९ एकूण जागा/
3 लाख अर्जदार
एनडीएच्या लष्करी तुकडीसाठी 195 ,नौदलात 39 व हवाई विभागात 66 जागांचा त्यात समावेश. इंडियन नौदल अकादमीमध्ये 55 जागा आहेत.


पात्रता
एनडीएच्या लष्करी विंगसाठी : कोणत्याही शाखेतील बारावी परीक्षा उत्तीर्ण.
हवाई दल तथा नौदल अकादमीसाठी : भौतिकशास्त्र व गणितासह बारावीची परीक्षा उत्तीर्ण.
वयोमर्यादा : 16 वर्षे 5 महिने ते 19 वर्षे.


परीक्षा पद्धती
प्रवेश परीक्षेसाठी दोन पेपर असतात. 300 गुणांचा पहिला पेपर गणिताचा असतो. दुसरा सामान्य क्षमता चाचणीचा. त्यात 600 गुणांसाठी प्रश्न विचारले जातील. सर्व प्रश्न बहुपर्यायी असतील. चुकीच्या उत्तरासाठी मायनस मार्किंग असेल.


निवड प्रक्रिया
प्रवेश परीक्षेच्या आधारे विद्यार्थ्यांना एसएसबी चाचणी / मुलाखतीसाठी निवडले जाईल. ही प्रक्रिया दोन टप्प्यात होईल. पहिला टप्पा पूर्ण करणारे दुस-या टप्प्यात सहभागी होऊ शकतील.


दिव्य मराठी पॅनल
कर्नल राजेश भुकर, अतिर‍िक्त संचालक, सैनिक कल्याण बोर्ड, जयपूर. माजी टॉपर, एनडीए प्रवेश परीक्षा
इतर परीक्षांहून वेगळी
एनडीए प्रवेश परीक्षा
बारावीनंतर होणा-या इतर प्रवेश परीक्षांमध्ये कोणत्याही एखाद्या शाखेबद्दल प्रश्न विचारले जातात. जसे पीसीएम किंवा पीसीबी संबंधित प्रश्न असतील. एनडीए मात्र यापेक्षा खूप वेगळी आहे. कारण यात गणित, इंग्लिश, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, सामान्यज्ञान इत्यादीविषयी प्रश्न विचारले जातात. प्रश्न अधिक कठीण नसतात. सामान्य कुवत असलेले विद्यार्थीदेखील ते सोडवू शकतात. विद्यार्थ्यांना सर्वाधिक भर गणित, इंग्लिशवर द्यावा लागतो. परीक्षेची तयारी जनरल असली पाहिजे. संशोधनावर आधारित अभ्यास करण्याची गरज नाही. निवडीनंतर एनडीए विद्यार्थ्यांना संपूर्णपणे बदलून टाकतो. त्यांना प्रत्येक गोष्ट शिकवली जाते.- युद्धाच्या काळात करण्यात येणा-या कामांबरोबरच दैनंदिन जीवनातील घडामोडींपर्यंत.


न्यूज
जेईई-मेन्समध्ये मिळू शकते दुसरी संधी
सन 2013 मध्ये आयआयटी प्रवेश परीक्षेच्या पद्धतीमध्ये बदल करण्यात आल्यानंतर जेईई-मेन्स व त्यानंतर जेईई-अ‍ॅडव्हान्स आयोजित करण्यात आले होते. सीबीएसइने यंदा जेईई-मेन्सच्या दोन परीक्षा आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थी तणावामध्ये असल्याचे दिसून आले आहे, असे त्यात सांगण्यात आले. त्यामुळे ते आपल्यातील सर्वाेत्तम देऊ शकत नाहीत. त्यामुळे दोन परीक्षा झाल्या तर त्यांचा तणाव हलका होईल. दोन्ही परीक्षा फेब्रुवारी व एप्रिलमध्ये होतील. ज्या परीक्षेत विद्यार्थ्यांना जास्त स्कोअर मिळतील. ते वैध समजले जातील. या प्रस्तावावरील अंतिम निर्णय 17 सप्टेंबरला होणा-या बैठकीत अपेक्षित आहे.


विद्यार्थ्यांनी बनवले सायबर सेक्युरिटी डिव्हाइस
केरळमधील अमृता विद्यापीठातील सायबर सुरक्षा विभागाच्या विद्यार्थ्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी एक अदृश्य उपकरण तयार केले आहे. हे उपकरण अगदी कानातल्या बाळीपेक्षाही लहान आहे. म्हणून त्याला इयर रिंग किंवा अंगठीमध्येदेखील लपवून ठेवता येऊ शकते. त्याला अमृता पर्सनल सेक्युरिटी सिस्टिम असे नाव देण्यात आले आहे. त्यात सर्व संभाषण नोंदवले जाऊ शकते. काही विपरीत घडल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात, रुग्णालयात किंवा अग्निशमन केंद्राला त्याचा आपोआप अलर्ट मिळू शकेल. तूर्त याची किंमत ठरलेली नाही.


गुगल बनवणार ऑनलाइन शिक्षणाचे व्यासपीठ
गुगल एमओओसी डॉट ओआरजी नावाने एक नवीन ऑनलाइन शिक्षणाचे व्यासपीठ तयार करू लागले आहे. इडीएक्सच्या मदतीने तयार करण्यात येणा-या या पोर्टलचे संपूर्ण नाव मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्सेस असे आहे. त्याला सप्टेंबर 2014 मध्ये लाँच करण्यात येणार आहे. या व्यासपीठावर अभ्यासक्रमाशिवाय शैक्षणिक संस्थांचे अभ्यास साहित्यदेखील उपलब्ध करून दिले जाणार आहे. भविष्यात ऑनलाइन शिक्षणाला यूट्यूबच्या रूपात विकसित करणे, असा त्यामागील उद्देश आहे.


शिकवण
समानार्थी व विरुद्ध शब्द
शब्द समानार्थी विरुद्ध
समाधानी संतुष्‍ट असंतुष्‍ट
सर्जन सर्जनशीलता विध्‍वंस
विख्यात प्रसिध्‍द कुख्यात
दिवाळखोर कंगाल श्रीमंत


शब्द - लफ्ज - word
> गायरान - चमन जार - meadow
> खास्सा - निसर्ग - nature
> Sagacious - न‍िपुण - निष्णात


प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या क्रमांकावर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com

Next Article

Recommended