आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपयशाने घाबरलात? अशी करा त्यावर मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुटूंबासाठी तुम्ही खास असता. मात्र जगा करिता तुमचे महत्त्व शून्य असते. येथे तुम्ही इतरांप्रमाणे फक्त सर्वसामान्य व्यक्ति ठरता. यामुळे अपयश आल्यास घाबरुन जाऊ नका. त्याच्याशी दोन हात करा.गाड्यांच्या टायरचे एक निश्चित उद्देश असते. ते रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांना झेलत असतात. ओबड-धोबड रस्ते, दगड आदींमुळे गाडीला नुकसान पोहोचू शकते. अशा प्रकारचे कठीण प्रसंग जीवनाचे अभिन्न अंग असतात. वेगवेगळी अडथळे पार करुन पुढे जाण्‍यासाठी तुम्हाला टायरप्रमाणे क्षमता विकसित करणे आवश्‍यक आहे.
जरी तुम्ही जीवनात प्रवास केला नसेल, तर मी म्हणेल तुम्ही कदाचित आयुष्‍य जगला असाल. चला जान्हवीने आपल्या आईच्या गाडीच्या टायरप्रमाणे लवचिकपणा विकसित करण्‍यासंबंधी कोणती शिकवण घेतली?

ग्रहित धरा आयुष्‍य अवघड असेल : जान्हवीची आई तिला नेहमी सांगायची, अपयश हे जीवनाचा अभिन्न अंग आहे. आपल्यात दृढता आणि चिकाटी विकसित करण्‍याचा पहिला मार्ग म्हणजे आयुष्‍य हे कठीण आहे मानणे. जेव्हा तुम्ही बाहेरच्या जगात पाऊल ठेवाल, तेव्हा कोणी तुमच्यासाठी गालिचा टाकणार नाही. एक दुर्दैवाची बाब अशी, की आईवडील असे मानतात त्यांची मुले विशेष आहेत. असा विचार करायला ती त्यांना प्रशिक्षण देतात. पालक आपल्या मुलांसमोर वास्तविकता ठेवायला क्वचितच तयार असतात. ते नेहमी आपल्या पाल्याचे जीवनमार्ग आणखी सुसहाय्य करायचा प्रयत्न करतात.

भारतीय आईवडील आपल्या मुलांची सुरक्ष‍िततेला प्रथम प्राधान्य देतात. कुटूंबासाठी महत्त्वाची. पण जगासाठी मुलीचे महत्त्व शून्य आहे असे जान्हवीची आई तिला समजून सांगायचा प्रयत्न करित होती. जेव्हा ती घराबाहेर पाऊल ठेवेल, तेव्हा तिला विशेष असे वागणूक मिळणार नाही. त्यासाठी परिश्रम करुन जगात आपले स्थान निर्माण करावी लागेल.
पुढे वाचा... कठीण प्रसंगातून मिळते शक्ती