आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविद्यालयीन शिक्षणासाठी पैसे बचतीच्या योजनेवर प्रश्नचिन्ह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेमध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी पैसे बचतीच्या ५२९ या योजनेच्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. ग्लेन रॉक, न्यू जर्सीचे निक आणि तारा पोटोने तीन वर्षांपूर्वी मुलाला जन्म दिल्यानंतर ५२९ योजनेत खाते उघडले. नंतर त्यांनी आपल्या अकाउंटंटला योजनेविषयी विचारले. त्याने सांगितले की, पुढचा हप्ता भरण्यापूर्वी त्यांनी पुन्हा विचार करावा. त्याला सोशल मीडिया आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह तारा म्हणतात, अकाउंटंटने सल्ला दिला की, आपण भविष्याचा विचार करायला हवा. पुढील १५ वर्षांत महाविद्यालयीन शिक्षणाची स्थिती कशी असेल, आपल्याला माहीत नाही. उच्च शिक्षणासाठी पैसे जमा करण्याचा आणखी योग्य मार्ग असू शकतो.

गेल्या वीस वर्षांपासून ५२९ सर्वाधिक लोकप्रिय योजनेच्या स्वरूपात समोर आली. एक कोटी २० लाखांपेक्षा अधिक खात्यांमध्ये १७ हजार ४९ अब्ज रुपये त्यात जमा आहेत. खात्यात जमा करण्यात येणाऱ्या पैशांवर कर आकारला जात नाही. मात्र, उच्च शिक्षण फार खर्चिक असल्याने आणि ५२९ चे कडक नियम काही गुंतवणूकदार व त्यांच्या सल्लागारांना इतर पर्यायांवर विचार करण्यासाठी उद्युक्त केले आहे. ५२९मधून पैसे काढल्यास दंड भरावा लागतो. राथेर अँड किट्‌टेल कंपनीचे अर्थतज्ज्ञ वेस ब्राउन म्हणतात, आता या योजनेत विशेष असे काही नाही.
५२९ संबंधी अनेक प्रश्न उपस्थित झाले. पहिला प्रश्न- तुम्हाला माहीत आहे, कुठल्या कामासाठी पैसे वाचवतात? परंपरागत महाविद्यालयांमधील शिक्षणाचा खर्च वाढण्यासाठी आणि ऑनलाइन कोर्स कमी खर्चात किंवा मोफत उपलब्ध होण्यासाठी ५२९च्या आधाराला आव्हान मिळाले आहे. जर इंटरनेटचा अभ्यास ५२९साठी पात्र आहे आणि मोफत आहे तर पैसे जमा का करावे? फायनान्शिअल प्लॅनर आणि सल्लागार अशा प्रकारचे प्रश्न विचारत आहेत. वित्त सल्लागार डेविड मुलिन्स म्हणतात, १८ वर्षांनंतरच्या स्थितीचा अंदाज लावणे कठीण आहे. तसे, महाविद्यालयीन शिक्षणासाठी पैसे उभे करण्याचे खूप पर्याय आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ५२९ योजना संशयाच्या भोवऱ्यात आहे. मुलिन्स म्हणतात, अमेरिकनांनी आपल्या सेवानिवृत्ती खात्यांवर लक्ष द्यावे. कारण, ८०व्या वर्षानंतर पुढील आयुष्य जगण्यासाठी कोणतेही अनुदान, स्कॉलरशिप किंवा कर्ज मिळू शकत नाही. शिक्षा नीती सेंटर नामक वैचारिक संस्थेचा निष्कर्ष आहे की, जर एक कुटुंब ५२९ योजनेत १८ वर्षांसाठी ६६ हजार रुपये गुंतवत असेल तर ते १९९७मध्ये कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या पब्लिक युनिव्हर्सिटीत चार वर्षांच्या अभ्यासाचा खर्च उचलू शकत होते. २००८मध्ये सुरू करणाऱ्या विद्यार्थ्याच्या एका वर्षाच्या शिक्षणासाठी हे पैसे फारच कमी आहेत.
वित्त सल्लागार ब्राउन फक्त एका सीमेपर्यंतच ५२९ योजनेला पसंती देतात. त्यांचे म्हणणे असे आहे की, कुटुंबात एकापेक्षा जास्त मुले असतील तर फक्त एक खाते उघडून अर्धा खर्च वाचवू शकतात. बाकी पैसे रॉथ आयआरएसारख्या करमुक्त योजनेत गुंतवू शकतात. जर पैसे शिक्षणावर खर्च करण्यात आले तर वेळेआधी पैसे काढल्यावर दंड आकारला जात नाही.
कॉलेज सेव्हिंग्ज प्लान्स नेटवर्क (सीएसपीएन)नुसार सरासरी ५२९च्या खात्यात १३ लाख ८० हजार रुपये जमा होतात. लोचनेर म्हणते, भविष्यात कॉलेज कसेही असो, लोकांना अधिकचा खर्च करावा लागेल. त्यांची संघटना ५२९ खात्यात आणखी काही खर्च समाविष्ट करण्यावर जोर देत आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत महागड्या उच्च शिक्षणाचा सूर ऐकू येत आहे. शिक्षणाच्या कर्जाचे ओझे जवळपास ७० खरब डॉलरवर पोहोचले आहे. डेमोक्रॅटिक पार्टीतील राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीचे दावेदार बर्नी सेंडर्सने शैक्षणिक कर्जाला मुद्दा बनवला आहे. राष्ट्राध्यक्ष ओबामांचा प्रस्ताव आहे की, सर्वाधिक विद्यार्थ्यांना सरकारी महाविद्यालयांत दोन वर्षांपर्यंत मोफत शिक्षण मिळावे. त्यानुसार काही राज्यांनी त्याला सुरुवातही केली आहे.
कॅम्पस आवाक्याबाहेर...
-२० वर्षांत ५२९ योजनेत एक कोटी २० लाखांपेक्षा जास्त खाती उघडली.
-या खात्यांत १७ हजार अब्जांपेक्षा जास्त रक्कम.
-अमेरिकेत विद्यार्थ्यांवरील कर्जाचे ओझे ७० खरबपेक्षा जास्त आहे.
-एका खात्यात सरासरी १३ लाख रुपये आहेत.
-वित्त तज्ज्ञ ५२९ एेवजी इतर पर्यायांचा विचार करण्याचा सल्ला लाेकांना देत आहेत.