आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NIN 2013 : Admission In National Institute Of Nutritution

एनआयएन -2011: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रीशनमध्‍ये प्रवेश परीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रीशनच्या(एनआयएन) एमएस्सी(अप्लाइड न्यूट्रीशन) कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी 12 जुलैपर्यंत अर्ज करू शकतील. परीक्षा 11 ऑगस्टला होईल. हा अभ्यासक्रम एनआयएनमध्ये शिकवला जाईल. आंध्र प्रदेशातील डॉ. एनटीआर आरोग्य विज्ञान विद्यापीठाची या कोर्सला मान्यता आहे.


स्पर्धा
16 जागा/ 500 अर्जदार(जवळपास)
कोर्स मुदत 2 वर्षे


पात्रता
एमबीबीएस, बीएस्सी न्यूट्रीशन, बीएसस्सी होमसायन्स, बीएस्सी बायोकेमेस्ट्री विथ न्यूट्रीशन आणि बीएसस्सी नर्सिंग झालेले विद्यार्थी.
वयोमर्यादा : 31 ऑक्टोबर 2012 रोजी विद्यार्थ्याचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे. एससी-एसटीसाठी तीन वर्षे सूट


निवड प्रक्रिया
दोन सदस्यांची समिती विद्यार्थ्यांची निवड करेल. प्रवेश परीक्षेच्या आधारे कौन्सिलिंग होईल आणि त्यानंतर जागा वाटप. आंध्र प्रदेशातील विद्यार्थ्यांसाठी सहा जागा राखीव असतील. उर्वरित 10 जागा बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांना मिळतील.
शुल्क एमएस्सी अप्लाइड न्यूट्रीशनचे वार्षिक शुल्क 20 हजार रु. आहे. याबरोबर प्रवेशावेळी 5 हजार रु. अनामत ठेवावी लागेल. मणिपाल विद्यापीठात एमएस्सी अप्लाइड न्यूट्रीशन व डाइट्रिक्सचे वार्षिक शुल्क 81 हजार रु. आहे.

परीक्षा पद्धती
दीड तासांच्या परीक्षेत 100 बहुपर्यायी प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असेल. यातील 40 प्रश्न न्यूट्रीशन, 25 बायोकेमेस्ट्री, 25 फिजियोलॉजी आणि 10 प्रश्न मायक्रोबायोलॉजीचे असतील. पेपर केवळ इंग्रजी भाषेत असेल. सामान्य व इतर मागासवर्गीय वर्गासाठी 40 गुण तर एससी-एसटीसाठी 30 गुण आवश्यक.


जास्त वयाच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य
प्रवेश परीक्षेत दोन विद्यार्थ्यांना समान गुण मिळाल्यास त्यांच्या पात्रता प्रवेश गुणांची पडताळणी केली जाईल. ज्या विद्यार्थ्याचे वय जास्त असेल त्याला प्रवेश मिळेल. येथील अभ्यासक्रमानंतर विद्यार्थी हॉस्पिटल, हेल्थ रिक्रिएशन क्लब्स, विज्ञान महाविद्यालये आणि न्यूट्रीशनिस्टच्या रूपात काम करू शकतील.


ज्ञान
सर्वात आधी तयार केलेला डायट प्लॅन डॉक्टरांनी नाकारला
1863 मध्ये मॉर्टिशियन विल्यम बॅटिंग या इंग्रजाने वजन घटवण्यासाठी जेवणाचा चार्ट तयार केला होता. सामान्य लोकांना वजन कमी करण्याचा सल्ला देत त्यावर लेटर ऑन कॉर्प्युलन्स(लठ्ठपणा) लिहिले होते. यामध्ये त्याने डायट प्लॅनबाबत माहिती दिली होती. त्यात चार वेळेस जेवण्याचा सल्ला दिला होता. साखरेशिवाय दूध आणि लोणी खाण्यास त्याने संमती दिली होती. या चार्टची मोठी प्रसिद्धी झाली, लोकांनी त्याचे अनुकरणही सुरू केले. मात्र, ब्रिटिश मेडिकल डॉक्टर्सने हा तक्ता नाकारला. बॅटिंग शास्त्रज्ञ नाहीत, त्यामुळे त्यांचा चार्ट सर्वांना लागू होऊ शकत नाही. लोकांनी या चार्टनुसार जेवणाचे नियोजन केले व वजन कमी केले. इतिहासातील हा पहिला डायट प्लॅन मानला जातो.


रंजक
जास्त मांसपेशींमुळे जास्त उष्मांक जळतात
०जास्त मांसपेशी केवळ जास्त उष्मांक(कॅलरी) जाळण्याचे काम करतात. ज्यांच्यात जास्त मांसपेशी असतात त्यांच्या कॅलरीजही लवकर जळल्या जातात.


इंटरेस्टिंग कोट
"The body is like a piano, and happiness is like music. It is needful to have the instrument in good order." - Henry Beecher.
आपले शरीर पियानोसारखे आहे आणि आनंद संगीतासारखा. शरीराची योग्य काळजी घेतल्यास आपण आनंदीत राहू.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा 9200001174 यावर
किंवा मेल करा education@dainikbhaskargroup.com