आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनसीईआरटीची पुस्तके आता ऑडिओ रूपात उपलब्ध होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंगच्या (एनसीईआरटी) वतीने ऑडिओ रूपात पुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याबाबतचा पायलट प्रोजेक्ट राबवणे सुरू झाले आहे. यात केंद्रीय शैक्षणिक प्रौद्योगिकी संस्थेच्या सहकार्याने एनसीईआरटीने सुरुवातीला नर्सरी आणि के.जी.च्या विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचा डाटा लवकरच ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येईल. या वेळी सर्व शाळांमध्ये ऑडिओ बुक्सच्या माध्यमातून शिकवण्यात येईल. यामुळे हसत-खेळत मनोरंजनात्मक शिक्षण देण्याचा उद्देश साध्य होणार आहे.