आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३.४७ कोटी नोकऱ्यांचे मजबूत क्षेत्र आहे प्रवास आणि पर्यटन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रवास आणि पर्यटन क्षेत्र देशातील सर्वात मोठी विदेशी मुद्रा मिळवून देणाऱ्या मोजक्या महत्त्वाच्या क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. जीडीपीत मोठे योगदान देण्यासह रोजगाराच्या अंगानेही हे क्षेत्र अग्रणी आहे. वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सिलच्या अहवालानुसार भारतीय प्रवास आणि पर्यटन उद्योग यावर्षी ७.५ टक्के च्या वाढीने प्रगतिपथावर आहे. आणि या वर्षीच्या अखेरीस प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपाने ३.७४ कोटी नोकऱ्या देईल. केपीएमजी व सीआयआयच्या अहवालानुसार २०१२ मध्ये या क्षेत्रात प्रत्यक्ष रूपाने २.५ कोटी नोकऱ्या दिलेल्या आहेत. आणि २०२३ पर्यंत हा आकडा ३.१ कोटी होईल. वास्तविकतेपेक्षाही वेगाने वाढणारे हे क्षेत्र नव्या नोकऱ्यांच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या वर्षात पर्यटन क्षेत्रात भारताच्या मजबूत स्थितीमुळे या ट्रेंडला चालना मिळाली आहे. डब्ल्यूटीटीसीच्या अहवालानुसार या वर्षअखेरीस जागतिक स्तरावर या क्षेत्रात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रूपाने २८४ मिलियन नोकऱ्या उपलब्ध केल्या जातील वा होतील. प्रत्यक्षात व्हिसा व पायाभूत सुधारणांकडे पाहता देशाकडे या प्रवास व पर्यटन क्षेत्राच्या रूपाने एक मोठी सुवर्णसंधी उपलब्ध आहे. यासह सरकारी पुढाकार, उद्योगांचा सहभाग, स्टार्टअप व्हेंचर्ससह अनेकांचा सहभाग या क्षेत्राच्या वाढीत योगदान देते आहे आणि यामुळे भारतदेश हा खुद्द लोकप्रिय पर्यटनस्थळ होणे आता अटळ आहे.
कसा घेऊ शकतो आपण प्रवेश
१२ वी वा पदवीनंतर आपण सुरुवात करू शकता. या क्षेत्रात पदवी, पदव्युत्तर, पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. एवढेच नव्हे तर मास्टर्स ऑफ टुरिझम अॅडमिनिस्ट्रेशनसारखे विशेष अभ्यासक्रमदेखील योग्य उमेदवारांना नोकरी देण्यात मदतगार सिद्ध होताहेत. विदेशी भाषेचे जाणकार व चांगले संपर्क काैशल्य असलेल्या व्यक्तींना या क्षेत्रात चांगली मागणी आहे. याशिवाय सरकारी विभागांमध्ये ऑपरेशनल जॉब्जसाठी प्रवास व पर्यटन क्षेत्रातील पदवी आवश्यक आहे.
अशी क्षेत्रे जिथे संधी वाढणार आहेत
मेडिकल टुरिझम : असोचेमच्या अंदाजानुसार २०११ ते २०१५ च्या दरम्यान भारतातील मेडिकल पर्यटन क्षेत्र १.८ बिलियन डॉलरचे होऊ शकते. तेजीने वाढता हा बाजार नोकऱ्यांसाठी एक नवी संधी निर्माण करत आहे.
बिझनेस ट्रॅव्हल्स : जीबीटीएच्या अहवालानुसार बिझनेस ट्रॅव्हलर्सची वाढती संख्या पाहता भारत जगात दहावा सर्वात मोठा बिझनेस ट्रॅव्हल मार्केट आहे. बैठका, इन्सेंटिव्ह, परिषदा-अधिवेशने व प्रदर्शने, व्यापारदेखील देशाच्या पर्यटन उद्योगात योगदान देणारे प्रमुख क्षेत्र होत आहे. जिथे देशांतर्गत छोट्या-छोट्या व्यापार बैठका (माईस सेग्मेंट) देखील १५-२० टक्के या दराने वाढते आहे.
ऑनलाइन टुरिझम : आकड्यानुसार हे क्षेत्र भारतात ३० टक्के या दराने-वेगाने वाढणार आहे. जाहीर आहे की नोकरीसाठीदेखील चांगल्या संधी निर्माण होतीलच.
कुठे कुठे मिळणार नोकऱ्या
सरकारी पर्यटन विभाग, इमिग्रेशन व कस्टम सर्व्हिस, ट्रॅव्हल्स एजन्सीज, टूर ऑपरेटर्स व हॉटेल हा प्रमुख सर्विस एरिया असेल. तिथे नोकऱ्या मिळतील. वाहतूक विभाग, फॉरेन एक्स्चेंज, व्हिसा सर्व्हिसेस, टुरिस्ट इन्फॉर्मेशन ऑफिसेस, क्रुज लायनर्स, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय टुरिझम बोर्ड, ट्रॅव्हल बीपीओदेखील या क्षेत्रातील प्रमुख रोजगार देणारे (भरती करणारे) रिक्रुटर आहेत. फ्रंट ऑफिस मॅनेजमेंट, एचआर, बिझनेस डेव्हलपमेंट, पीआर व इव्हेंट मॅनेजमेंटशी जोडले गेलेले व्यावसायिकांना हा उद्योग चांगल्या संधी देईल. याशिवाय टूर मॅनेजर, ट्रॅव्हल प्रॉडक्ट डिझायनर, ट्रॅव्हल एज्युकेटरसह पासपोर्ट, व्हिसा प्रकरणे हाताळणारे व्यावसायिक, डेस्टिनेशन मॅनेजर, ट्रॅव्हल कन्सल्टंटची मागणीदेखील वेगाने वाढत आहे.