आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Divya Education: पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टॉप मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये पर्सनल स्किल्सवर लक्ष, आता वर्किंग प्रोफेशनल्सही प्रवेश घेऊ शकतात
आयआयएम, आयएसबी, झेव्हियर्ससारख्या अव्वल बिझनेस स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे कठीण असते. ज्या विद्यार्थ्यांचे अकॅडमिक रेकॉर्ड मजबूत असण्याबरोबर संवादकौशल्यही चांगले आहे, ते विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. नोकर भरतीवेळी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास तपासला जातो. या इन्स्टिट्यूट्सनी आधीपासून एखाद्या कंपनीत काम करणा-या फ्रेशर्स आणि सीनियर्सचा कामाचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी काही कोर्सेस सुरू केले आहेत. यामध्ये एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅम्स आणि मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रॅम्सचा समावेश आहे. हे कोर्सेस वेगवेगळ्या वरिष्ठ पातळीवर काम करणा-या प्रोफेशनल्सच्या कौशल्यात वाढ करण्यासाठी आहेत.
एक्सएलआरआय - जमशेदपूर
कोर्स
एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅम्स
शुल्क
5 लाख 50 हजार रु.
व्यवस्थापनाच्या जुन्या संकल्पना एक्सएलआरआयच्या एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅम्समध्ये नव्या रूपात सादर करण्याचा त्यात समावेश आहे. कोर्स दोन वर्षांचा आहे. यामध्ये मॅनेजर्सना आपापल्या क्षेत्रात मोठी जबाबदारी सोप्या पद्धतीने कशी पार पाडता येईल याचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये एचआर, जनरल मॅनेजमेंट, ऑर्गनायझेशन बिहेवियर, मार्केटिंग आणि फायनान्स, इन्फर्मेशन सिस्टिम्स आणि इंडस्ट्रियल रिलेशन्स यांचा समावेश आहे.
आयएसबी-हैदराबाद
कोर्स
एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन
शुल्क
2 लाख 50 हजार रु.
आयएसबीच्या सेंटर फॉर एक्झिक्युटिव्ह एज्युकेशनमध्ये अनेक बिझनेस स्कूलच्या फॅकल्टी उभरत्या अर्थव्यवस्थेवर चर्चा करणा-या असतात. येथे वर्किंग प्रोफेशनल्सना आपले वैयक्तिक कौशल्य तपासण्याची संधी मिळते. इथे हा एका वर्षाचा कोर्स आहे. प्रत्येक कोर्ससाठी विषयतज्ज्ञांचे गेस्ट लेक्चर होतात.
आयआयएम- अहमदाबाद
कोर्स
एक्झिक्युटिव्ह एमडीपी
शुल्क
21 लाख रुपये
लहान-मोठ्या उद्योगांसाठी एक प्रोग्रॅम आणि 30 अन्य नव्या प्रोग्रॅमसोबत आयआयएम अहमदाबादने या वर्षी मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (एमडीपी) कोर्स सुरू केला आहे. हा एका वर्षाचा कोर्स आहे. यामध्ये वर्किंग प्रोफेशनल्सना व्यवस्थापकीय संकल्पना आणि तंत्र प्रात्यक्षिकासह शिकवले जाईल. पब्लिक आणि हेल्थ सिस्टिम्सवरही लक्ष दिले जाईल. मागील कोर्सेसमधून आतापर्यंत जवळपास 51 हजार व्यवस्थापकांनी प्रशिक्षण घेतले आहे.
आयएमटी-गाझियाबाद
कोर्स
पीजी डिप्लोमा एक्झिक्युटिव्ह
शुल्क
7 लाख
60 हजार रुपये
कनिष्ठ स्तरावर कार्यरत कर्मचा-यांसाठी 15 महिन्यांचा एक्झिक्युटिव्ह पीजी डिप्लोमा कोर्स आहे. त्यांना आहे त्यापेक्षा मोठ्या पदावर काम करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. आयएमटी गाझियाबादच्या या कोर्ससाठी दुबई, हैदराबाद आणि नागपूरमध्येही कॅम्पस आहेत. यासाठी पाच वर्षे कामाचा अनुभव आवश्यक आहे.
मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट - गुडगाव
कोर्स
पीजी एमबीए एक्झिक्युटिव्ह
शुल्क
14 लाख रुपये
वर्किंग प्रोफेशनल्ससाठी हे विशेष एमबीए आहे. या एमबीएमध्ये प्रत्येक प्रोफेशनलसाठी आपले स्पेशलायझेशन असते. तीन पूर्णवेळ तर एक अर्धवेळ कोर्स आहे. फुल टाइम कोर्समध्ये एनर्जी मॅनेजमेंट, पब्लिक पॉलिसी आणि नॅशनल मॅनेजमेंट असते. हा जास्त लोकप्रिय असून त्याची 1987 मध्ये सुरुवात झाली होती. यास कन्सोर्टियम एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंट प्रोग्रॅम संबोधले जात असून आता तो फ्रेंच बिझनेस स्कूल, ईएससीपी-युरोपच्या सहकार्याने शिकवला जात आहे.
शिक्षक-विद्यार्थी नियमित जात असल्यामुळे शाळेची हजेरी वाढली
गेल्या सहा वर्षांत नियमित शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर शिक्षकांची उपस्थितीही वाढली आहे. हा सकारात्मक बदल शिक्षणाचा हक्क कायद्यामुळे झाला आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या सहा वर्षांत देशातील प्रमुख राज्यांत शाळेत जाणा-या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संख्येत वाढ झाली आहे. संपूर्ण देशात शिक्षकांची उपस्थिती 81.7 टक्क्यांहून 84.3 टक्के झाली आहे. राज्यांतील हजेरीत सुधारणा झाली आहे. केवळ उत्तराखंडमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील हजेरी घसरली आहे. निवडणूक ड्यूटीमुळे शिक्षकांची हजेरी घसरली असल्याचे मंत्रालयाचे म्हणणे आहे.
एआयपीएमटीसाठी आता 31 जानेवारीपर्यंत अर्ज करू शकता
मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी होणा-या ऑल इंडिया प्री-मेडिकल टेस्टसाठी (एआयपीएमटी) विद्यार्थी आता 31 जानेवारीपर्यंत अर्ज करू शकतात. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने हा निर्णय घेतला आहे. याआधी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर होती. मात्र, आता विद्यार्थी 1000 रुपयांहून अधिक शुल्क देऊन 31 जानेवारीपर्यंत अर्ज करू शकतात. 4 मे रोजी परीक्षा होईल.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com