आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pilot Lincenes Course: Indira Gandhi National Air Academy Permission Course

पायलट लायन्सस कोर्स: इंदिरा गांधी राष्‍ट्रीय हवाई अकादमीची प्रवेश परीक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालय संचलित रायबरेली येथील इंदिरा गांधी राष्‍ट्रीय हवाई अकादमीच्या(आयजीआरयूए) व्यावसायिक वैमानिक परवाना कोर्समध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करु शकतात. यासाठीची प्रवेश परीक्षा 17 नोव्हेंबरला होईल. 18 महिन्यांच्या या कोर्समध्ये एकूण 75 जागा आहेत.
पात्रता
फिजिक्स व मॅथ्समध्ये किमान 55 टक्के गुणासह 10+2 परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. एससी/एसटीसाठी 50 टक्क्यांची अट. याबरोबर इंग्रजी हा सक्तीचा विषय असावा.
वयोमर्यादा: 17 वर्षे
निवड पद्धती
व्यावसायिक वैमानिक परवाना अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याची निवड तीन स्तरावर होईल. प्रवेश परीक्षेच्या आधारावर अर्जदार विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड केली जाईल. यानंतर पायलट अ‍ॅप्टिट्यूड/ सायकोमेट्रिक टेस्ट होईल. यातील यशस्वी विद्यार्थ्यांनाच गुणवत्ता यादीत स्थान मिळेल.
परीक्षा पद्धती
प्रवेश परीक्षेमध्ये मॅथ्स, फिजिक्स, जनरल इंग्लिश आणि चालु घडामोडीवर बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. परीक्षेमध्ये एससी/एसटी विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ सामान्य वर्गातील विद्यार्थ्यांपेक्षा 5 टक्के कमी असेल.
शुल्क
कोर्सचे एकूण शुल्क 32 लाख 50 हजार रुपये(कर वगळता) आहे. याव्यतिरिक्त सुमारे एक लाख रुपये गणवेश, स्टडी मटेरियल, परवाना शुल्क आदीसाठी द्यावे लागतील. देहरादूनच्या ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ एरॉनॉटिक्समध्ये या कोर्सची फिस सुमारे 10 लाख रुपये आहे. मात्र, यामध्ये फ्लाइंग कॉस्टचा(18-20 रुपये) समावेश नाही.
निकाल : 30 जानेवारी 2014
वृत्त
इतिहासाची लांबलचक उत्तरे लक्षात ठेवण्यापासून सुटका, अभ्यासक्रम कमी होऊ शकतो
नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना इतिहासाची लांबलचक उत्तरे लक्षात ठेवण्यापासून काहीशी सुटका होणार आहे. इतिहासाचा अभ्यासक्रम कमी असावा यासाठी अनेक शाळा सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनला(सीबीएसई) सतत पत्र पाठवत आहेत. मंडळाने सध्याच्या अभ्यासक्रमाबाबत शाळांकडे मत मागितले आहे. यासाठी त्यांनी एक प्रश्नावली पाठवली आहे. विद्यार्थ्यांना सोशल सायन्स विषयात इतिहास, अर्थशास्त्र व भूगोलाच्या वेगवेगळ्या पुस्तकांचा अभ्यास करावा लागतो. विद्यार्थी आठवीत भारताचा इतिहास शिकतात, नववीत गेल्यानंतर त्यांना एकदम रशियन व फ्रेंच क्रांतीचा अभ्यास करावा लागतो. यामुळे त्यांना संपूर्ण इतिहास समजून घेऊन तो लक्षात ठेवणे अवघड जाते. शाळांची मते अजमावल्यानंतर अभ्यासक्रमात कितपत कमी केला जाऊ शकतो यावर बोर्ड निर्णय घेईल. यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत होईल.
जेईई-मेन्स 6 एप्रिल रोजी शक्य
आगामी वर्षातील आयआयटी प्रवेश परीक्षेची संभाव्य तारीख बोर्डाने जाहीर केली आहे. जेईई-मेन्स 6 एप्रिलला तर अ‍ॅडव्हान्स 25 मार्च रोजी होईल. जेईई- अ‍ॅडव्हान्स परीक्षा संगणक आधारीत करण्याची अनेक दिवसांपासूनची योजना होती. मात्र, 2014 मध्ये विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा द्यावी लागली होती. जेईई- अ‍ॅडव्हान्स परीक्षा 15 लाख विद्यार्थ्यांनी दिली होती. परीक्षार्थींसाठी संगणक उपलब्ध केले जाऊ शकतील, असे मंडळाने म्हटले होते. मात्र, या योजनेला स्थगित देण्यात आली. परीक्षा पद्धती 2013 मधील परीक्षेप्रमाणेच असेल.
विद्यापीठात माहिती तंत्रज्ञानाच्या सुविधा वाढणार
मोठी आयटी कंपनी आयबीएमने विद्यार्थ्यासाठी हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग सोल्यूशन तयार केले आहे. यामध्ये आयबीएमचे सर्व्हर, सिस्टिम, स्टोअरेज सोल्यूशन्स, व्हर्च्यअल इक्विपमेंट्स आणि सॉफ्टवेअरच्या मदतीचा समावेश आहे. यासाठी आयबीएमने देशातील प्रमुख विद्यापीठांशी टायअप केले आहे. यामध्ये आयआयटी-मद्रास, आयजर-भोपाळ, कोईम्बतूरचे कारुण्य विद्यापीठ आणि शिव नादर विद्यापीठ आहे.
अचिव्हमेंट
गूगल मार्केटिंग स्पर्धेमध्ये आयआयटी-बीएचयूचे विद्यार्थी आशियात चौथे
गूगलने नुकतीच मार्केटिंग स्पर्धा सुरू केली होती. यामध्ये जगभरातील 100 देशांच्या सुमारे 50 हजार विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. विविध खंडाच्या आधारावर स्पर्धकांची विभागणी करण्यात आली होती. एशिया-पॅसिफिक विभागात बनारस हिंदू विद्यापीठ, आयआयटीच्या विद्यार्थ्यांना चौथा क्रमांक मिळाला. त्यांना 22 वी ग्लोबल रॅँकिंग मिळाली. याच विभागात एशियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला प्रथम स्थान मिळाले. विभागवार विजेत्यांना गूगलच्या कार्यालयात दोन दिवसाची सहल आणि कम्प्युटिंग डिव्हाइस दिले जाईल.
शब्द - लफ्ज -word

> मोबदला - अजूरा - remuneration
> टिकाऊ- स्थायी - remuneration
> Confounded - गोंधळणे व- बेचैन
प्रश्न आणि सूचनेसाठी एसएमएस करा
9200001174 या क्रमांकावर किंवा ई-मेल करा
education@dainikbhaskargroup.com