आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prestigious Institution : Indian Space And Research Orgnization

नामांकित संस्था: इंडियन स्पेस अँड रिसर्च ऑर्गनायझेशन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या राष्‍ट्रीय आणि सामाजिक विकासाला चालना देणा-या अनेक सरकारी व खासगी संस्था आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो त्यापैकीच एक आहे.

इंडियन स्पेस अँड रिसर्च ऑर्गनायझेशन भारताची मुख्य अंतराळ संस्था आहे. 15 ऑगस्ट 1969 रोजी या संस्थेची सुरुवात झाली. अंतराळ विज्ञानात देशाला प्रगतीपथावर नेणारी ही पहिली संस्था असल्यामुळे या संस्थेची नामांकित संस्थेमध्ये गणना होते. जगातील सर्वश्रेष्ठ सहा अंतराळ संस्थांमध्ये इस्रोचा समावेश आहे. अंतराळ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने देशाच्या आर्थिक विकासाला गती देणे हे इस्रोचे मुख्य उद्दिष्ट आहे. स्थापनेनंतर इस्रोने यशाचे अनेक टप्पे गाठले आहेत. देशाच्या पहिल्या उपग्रहनिर्मितीपासून चांद्रयान मोहीम ही इस्रोच्या यशाची उदाहरणे आहेत.


अन्य देशांसाठी उपग्रह प्रक्षेपण
1960 च्या दशकात भारतामध्ये अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन कार्य सुरू झाले. इस्रोच्या स्थापनेनंतर अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण करण्यावर भर देण्यात आला. इस्रोने 1975 मध्ये पहिला उपग्रह आर्यभट्ट तयार केला, तेव्हा त्याच्या प्रक्षेपणासाठी रशियाची मदत घ्यावी लागली होती. आज आपल्याकडे उपग्रह प्रक्षेपक वाहन असून अन्य देशांचे उपग्रहही प्रक्षेपित करत आहोत. उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रात कार्यरत मोजक्या देशांत भारताचा समावेश आहे.


प्रत्येक गरजेसाठी उपग्रह प्रणाली
इस्रोने दूरसंचार सेवेसाठी इंडियन नॅशनल सॅटेलाइट्स (इनसेट) सिस्टिम आणि नैसर्गिक स्रोताच्या व्यवस्थापनासाठी इंडियन रिमोट सेंसिंग सॅटेलाइट्स (आयआरएस) सिस्टिम विकसित केली आहे. इनसेट एशिया-पॅसिफिक प्रदेशामध्ये सर्वांत मोठी देशांतर्गत दूरसंचार प्रणाली आहे. याचा उपयोग दूरचित्रवाणी प्रसारण, दूरसंचार व हवामान विज्ञानात होतो. म्हणजेच प्रत्येक कामासाठी आपल्याकडे स्वतंत्र उपग्रह प्रणाली आहे.


सूर्य अणि मंगळावर पोहोचण्यासाठी योजना, पुढील महिन्यात मंगळ मोहिमेने सुरुवात
इस्रो या वर्षी 28 ऑक्टोबर रोजी मंगळयान प्रक्षेपित करणार आहे. मंगळ ग्रहाला परिक्रमा घालून यान तेथील वातावरणाची माहिती जमा करेल आणि जीवसृष्टीची शक्यता तपासेल. सन 2014 मध्ये सूर्यावर एक मानवरहित मिशन आदित्य-1 पाठवण्याची योजना आहे. या व्यतिरिक्त इस्रो चांद्रयानाच्या यशानंतर 2020 मध्ये चंद्रावर एका मानवी मोहिमेच्या तयारीत आहे.


न्यूज
मंदी असूनही आयटी
कंपन्यांकडून मोठे पॅकेज
देशातील मोठ्या अभियांत्रिकी संस्था नोकर भरतीसाठी पुढे येऊ लागल्या आहेत. मंदी असताना मागील वर्षीच्या तुलनेने कंपन्यांकडून दुप्पट पॅकेज देण्यात येत आहे. देशातील जवळपास सर्व मोठ्या अभियांत्रिकी संस्थांतून पॅकेजमध्ये किमान 10-15 टक्के एवढी वाढ होईल, असा अंदाज आहे. दिल्ली टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाने अलीकडेच गुगल इंकमध्ये 93 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळवले आहे. गेल्या वर्षी डीटीयूमध्ये वार्षिक पॅकेज 58 लाख रुपये होते. सोबतच अमेरिकेची सॉफ्टवेअर कंपनी एपिकनेदेखील विद्यार्थ्यांना 73 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज देऊ केले आहे. एवढेच नव्हे, तर नऊ विद्यार्थ्यांना प्रत्येकी 70 लाख रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. भारतातील अमेझॉनने पाच विद्यार्थ्यांना 19.5 लाख रुपयांचे पॅकेज दिले आहे. आयआयटी खरगपूर, कानपूर, मुंबई, गांधीनगरच्या रिक्रूटर टाइम टूथ टेक्नॉलॉजीने प्लेसमेंट
पॅकेज वाढवण्याची संकेत दिले आहेत.


शिकण्यासारखे काही
म्हण आणि वाक्प्रचारातील फरक
एखाद्या भाषेचे सौंदर्य त्यामधील म्हणी किंवा वाक्प्रचारावर अवलंबून असते. हे दोन्ही शब्दांचे समूह असतात; परंतु दोन्हींमध्ये मूलभूत फरक असतो. सामान्यपणे फ्रेझ हा शब्दांचा असा समूह असतो, जो पूर्ण वाक्य नसला तरी त्याला विशिष्ट अर्थ जरूर असतो. कधी कधी एखादा शब्दही फ्रेझचे काम करतो व तो नामाच्या रूपात काम करतो; परंतु इडियम्सचे तसे नसते. त्यात शब्दांचा समूह तर असतो; परंतु त्यातील शब्दांचा अर्थ जो दिसतो, तसा मात्र नसतो.
■ The car outside the building is black..
यात the car outside building
एक फ्रेझ आहे. त्यात आणखी एक फ्रेझ आहे.- - outside the building.

■ ts raininig cats and dogs..
यामध्येcats and dogs इडियम आहे. अर्थात तुम्ही कुत्रा आणि मांजरीचा पाऊस पडतोय, असे म्हणणार नाहीत; परंतु त्याचा उपयोग मुसळधार पावसासाठी केला जातो.


शब्द लफ्ज word

> परंपरावादी, - राशिद - orthodox
> जीनत - सौंदर्य - orthodox
> Caricature - रेखाटनव व- खाका


प्रश्न आणि सूचनेसाठी एसएमएस करा
9200001174 या क्रमांकावर किंवा ई-मेल करा
education@dainikbhaskargroup.com