आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Satyajit Ray Film Institute Entrance Examination

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एसआरएफटीआय - 2013 : सत्यजित रे फिल्म इन्स्टिट्यूट प्रवेश परीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील सर्वोच्च संस्थांपैकी एक कोलकात्यातील सत्यजित रे फिल्म अ‍ॅँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी 23 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात. पाच कोर्सेसच्या प्रवेशासाठी 1 सप्टेंबर रोजी परीक्षा होईल. गेल्या वर्षी 4 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
स्पर्धा
60
जागा 5
हजार अर्जदार
3 वर्षे
कोर्स मुदत
पात्रता : पदवी प्रमाणपत्र. साऊंड रेकॉर्डिंग आणि डिझाइनसाठी बारावीत फिजिक्स आणि मॅथ्स आवश्यक.
या कोर्सेससाठी परीक्षा
1. डायरेक्शन अ‍ॅँड स्क्रीनप्ले राइटिंग, 2. सिनेमेटोग्राफी, 3. एडिटिंग
4. साऊंड रेकॉर्डिंग 5. प्रोडक्शन मेथेडॉलॉजी
निकाल : 31 ऑक्टोबर 2013
शुल्क : सर्व अभ्यासक्रमांसाठी प्रतिसेमिस्टर 20 हजार रुपये आणि प्रवेशावेळी 25 हजार रुपये अनामत रक्कम ठेवावी लागेल. यामध्ये वाचनालय शुल्काचाही समावेश आहे. एफटीआयआय, पुण्याच्या 11 कोर्सेसमध्ये 33 हजारांपासून 2 लाख रुपयांपर्यंत वार्षिक शुल्क.
शिष्यवृत्ती व पुरस्कार
सत्यजित रे फिल्म अ‍ॅँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही देते. शिष्यवृत्ती एका वर्षासाठी किंवा शिस्तीसाठी एक आणि दोन शिष्यवृत्ती वर्षभरातील कामगिरीवर दिली जाईल. याबरोबर राज्य सरकार गुणवत्ता यादीत येणा-या विद्यार्थ्यांना विद्यावेतन देते.
परीक्षा पद्धती
अडीच तासांच्या प्रवेश परीक्षेमध्ये दोन पेपर असतील. एक तासाचा पहिला पेपर सामान्यज्ञान व बौद्धिक क्षमता चाचणीचा असेल. यामध्ये कला, संस्कृती, समाज व राजकारणासंबंधित प्रश्न असतील. पेपर बहुपर्यायी स्वरूपाचा असेल. दुसरा पेपर दीड तासांचा असेल. तो स्पेसिफिक एरिया अ‍ॅप्टिट्यूड आधारित असेल.यात विद्यार्थ्यांनी ज्या कोर्ससाठी अर्ज केला आहे, त्या विषयाशी संबंधित प्रश्न असतील. पेपर लेखी स्वरूपाचा असेल. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसेल.
ज्ञान
वेगवेगळ्या प्रकारचे माहितीपट
कोणताही नॉन फिक्शन चित्रपट अर्थात चित्रपटात कथेऐवजी माहिती असते. त्याला माहितीपट म्हटले जाते. 1900 मध्ये सुरुवातीचा कोणताही चित्रपट किंवा सामान्य दृश्य माहितीपटात मोडते.परंतु हळूहळू त्याचे विभाजन झाले.
सिटी सिंफनी : अशी परंपरा जी मानवाबद्दल सांगते किंवा अशी एखादी जागा जी मानवासाठी तयार केलेली असेल.
वास्तवता : कोणत्याही घटनेचा तपशील देणारा चित्रपट, जसे रेल्वेतून प्रवासी उतरताना किंवा कार्यालयातून परततानाचे दृश्य दाखवणे
सिनिक्स : ट्रॅवलॉग चित्रपटात एखाद्या प्रवासाचे वर्णन असते. जसे एखाद्या जागेचा इतिहास किंवा त्याचे वैशिष्ट्य, पर्यटन स्थल इत्यादी माहितीचे स्पष्टीकरण.
न्यूजरिल्स : नाट्य रूपांतर. जे घडलेल्या घटनेची माहिती देते. त्यासाठी नाटकाचा वापर केला जातो.
रंजक
धर्मगुरू होण्याची टॉम क्रूजची इच्छा
धर्मगुरू होण्याची टॉम क्रूजची इच्छा
> टॉम क्रूजने एकदा एका सेमिनरीमध्ये प्रवेश घेतला होता. त्यांना धर्मगुरू होण्याची इच्छा होती. परंतु एका वर्षांतच त्यांना ते नकोसे वाटले.
> ब्रॅड पिटला चीनमध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाही. चिनी सरकारला पिटच्या ‘सेव्हन इयर्स इन तिबेट ’ मधील व्यक्तिरेखेवर आक्षेप आहे.
> मायकल जॅक्सन पहिला कृष्णवर्णीय आहे, ज्याचा व्हिडिओ ‘बिली जीन ’ एमटीव्हीवर प्रसारित झाला.
> डेमी मूरला डाव्या डोळ्याने अजिबात दिसत नाही. लहानपणी तिरळ्या डोळ्यांवरील शस्त्रक्रियेदरम्यान त्यांना डाव्या डोळ्याची दृष्टी गमवावी लागली.
> हार्पाे ही ओप्रा विन्फ्रे यांची निर्मिती संस्था आहे. त्यांनी आपल्याच नावाच्या इंग्लिश नावाचे स्पेलिंग उलटे करून कंपनीला नाव दिले.
इंटरेस्टिंग कोट
“To grasp the full significance of life is the actor's duty; to interpret it his problem; and to express it his dedication.” - James Dean
जीवनाचे समग्र आकलन करून समस्या लक्षात घेऊन त्याप्रती समर्पित भावना ठेवणे हे अभिनेत्याचे कर्तव्य असते.
-जेम्स डीन
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या क्रमांकावर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com