आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sbi To Recruit 2000 Probationary Officers And 5000 Clerks Soon

स्टेट बँकेत 2 हजार प्रोबेशनरी ऑफिसर आणि 5 हजार क्लार्कची होणार भरती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टेट बँक ऑफ इंडियामध्‍ये (एसबीआय) रिक्त जागी भरली जाणार आहे. या वित्तीय वर्षांतच 7 हजारापेक्षा अधिक कर्मचा-यांची भरती होणार आहे. यात 2 हजार प्रोबेशनरी ऑफीसर आणि 5 हजार क्लार्क या पदांचा समावेश आहे. या भरतीने नव्या शाखांचे विस्तार आणि नियमित गरजा भागवल्या जाऊ शकतात.
बँकेला या वर्षी 700 शाखा वाढवायच्या असून तो 17 हजार होतील. 700 शाखांपैकी 100 शाखा सुरुही झाल्या आहेत. बाकी पुढील महिन्यांमध्‍ये कार्यान्वित होतील. बँकिंग क्षेत्रात स्टेट बँक एक मोठी भरती करणारी संस्था आहे. एसबीआयमध्‍ये सध्‍या 2 लाखांपेक्षा अधिक कर्मचारी आहेत. यात 45 हजार महिला आणि 2 हजार 500 शारीरिक दृष्‍ट्या अपंगांचाही समावेश आहे.