आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्काॅलर Ship: उच्च शिक्षणासाठी पदव्युत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) "पोस्ट ग्रॅज्युएट मेरिट स्कॉलरशिप फॉर युनिव्हर्सिटी रँक होल्डर्स फॉर पीजी प्रोग्रॅम'साठी अर्ज मागवले आहेत. यानुसार पदवी अभ्यासक्रमात प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
अशी असेल रक्कम
निवड झालेल्या ३ हजार विद्यार्थ्यांना मासिक ३१०० रुपये प्रदान केले जातील.
पात्रता
पदवीपूर्व अभ्यासक्रमांत प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थी किंवा ज्या विद्यार्थ्यांनी मास्टर्स पदवीसाठी प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेला आहे अशांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येतील. पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण यासाठी आवश्यक आहेत. वयोमर्यादा ३० वर्षे.
असा करा अर्ज
इच्छुक विद्यार्थी युजीसीच्या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करू शकतील.
निवड
शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड गुणानुक्रमानुसार आधारे केली जाईल.
वेबसाइट
http://www.ugc.ac.in/