आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उधारीने झाली सुरुवात, पण जॉनने \'जॉन डियर\' ही मल्टिनॅशनल कंपनी सुरु केली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॉन डियर कंपनीचे ट्रॅक्टर. इन्सेटमध्‍ये बहुराष्‍ट्रीय कंपनी, ' डियर' कंपनीचा पाया भरणी करणारे जॉन डियर. - Divya Marathi
जॉन डियर कंपनीचे ट्रॅक्टर. इन्सेटमध्‍ये बहुराष्‍ट्रीय कंपनी, ' डियर' कंपनीचा पाया भरणी करणारे जॉन डियर.
फॉर्च्युन ग्लोबल 500 कंपन्यांमध्‍ये जॉन डियरचा 307 वा क्रमांक लागतो. तर फॉर्च्युन अमेरिकन कंपन्यांमध्‍ये 80 क्रमांक. शेती, बांधकाम, वनांशी संबंधित यंत्रे आणि डिझेल इंजिन बनवणा-या अमेरिकन बहुराष्‍ट्रीय कंपनी 'डियर'चा पाया जॉन डीअर यांनी घातला. 1868 मध्‍ये त्यांचा मुलगा चार्ल्सने आपल्या वडिलांच्या नावाने डियर अँड कंपनीच्या उपकरणांचा 'जॉन डियर' असे नामकरण केले. 1880 मध्‍ये या ब्रँडचे बोधचिन्ह म्हणून 'उडी मारणारे हरिणा'ची निवड केली गेली.

कंपनी: जॉन डीयर
स्थापना:1837
संस्थापक: जॉन डीयर
मुख्यालय: अमेरिका

7 फेब्रूवारी, 1804 मध्‍ये जॉन डियर यांचा जन्म झाला होता. त्यांना एकूण नऊ भाऊ-‍बहिणी होत्या. त्यांचे वडील विलियम रेनॉल्ड टेलर होते. 1808 मध्‍ये रोजगार शोधण्‍यासाठी ते इंग्लंडकडे रवाना झाले आणि ते पुन्हा कधीच परतले नाही. कुटूंबाचा भरण-पोषणात आईला मदत व्हावी म्हणून जॉन डियरने लहान वयातच जे काम मिळेल ते केले. 1821 मध्‍ये वयाच्या 17व्या वर्षी ते मिडिलब्युरीच्या एका लोहाराचे मदतनीस बनले. यात नैपुण्‍य मिळवल्यानंतर 1825 मध्‍ये जॉन डियरने कमावायला सुरु केले.
आगीत दोन वर्षांची मेहनत जळून खाक
अस्वाच्या पायात सळ ठोकण्‍यापासून इतर कारागिरीचे काम तो करायचा. 1827 मध्‍ये मिडिल ब्युरीच्या एका शाळकरी मुलगी डेमारियूसशी त्यांनी विवाह केला. ती शिकलेली होती आणि जॉन डियर हे अशिक्षित होते. विवाहानंतर एक दशकापर्यंत रोजगारच्या शोधासाठी जॉन डियर ठिक-ठिकाणी भटकले. या दरम्यान कुटूंब मोठे होत गेले. खर्च वाढत गेले. बँकेतून कर्ज घेतल्यानंतर त्यांनी दोन वेळेस लोहारकामाचे दुकान लावले होते. पण प्रत्येक वेळी ते आगीत जळून खाक झाले. जॉन डियर कर्जात बुडाले. एका सावकाराने 78 डॉलर कर्ज वसूलीसाठी दबाव वाढवला. परंतु चार मुले आणि गरोदर पत्नीला लवकर बोलवून आणण्‍याचा सांगून जॉन डियर इलिनॉइसला पळून गेले. त्यांच्या जवळ 73 डॉलर होते. या पैशाच्या जोरावर त्यांनी ग्रँड डिरोटर नदीच्या काठावर लोहारकामाचे दुकान लावले होते. येथे जॉन डियरने कास्ट आर्यनचे नांगर तयार करायला सुरुवात केले.
पुढील स्लाइड्सवर वाचा आणखी...