आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 रुपये घेऊन आला होता मुंबईत, आज 63 अब्जांचे साम्राज्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर सिटी घाटकोपर(पश्चिम) इनसेट : सुभाष रुणवाल. - Divya Marathi
आर सिटी घाटकोपर(पश्चिम) इनसेट : सुभाष रुणवाल.
सुभाष रुणवाल यांचा फोर्ब्स इंडियाच्या भारतीय श्रीमंतांच्या यादीत(2015) समावेश आहे. 1964 मध्‍ये वयाच्या 21 व्या वर्षी 100 रुपये घेऊन मुंबईत रुणवाल आले होते. मध्‍यमवर्गीय लोकांना परवडणारे घरे बांधून देणारे सुभाष रुणवाल यांचा जन्म महाराष्‍ट्रातील आहे. पुण्‍यातून वाणिज्याची पदवी घेतल्यानंतर 21 व्या वर्षी ते चार्टर्ड अकाउंटंट बनले. अमेरिकेत त्यांना नोकरी मिळाली पण तेथील जीवनशैली आवडली नाही. ते मुंबईला परतले.
वनरुम फ्लॅटच्या जागेवर मॉल
मुंबईच्या एका रासायनिक कंपनीत रुणवाल यांनी अकाउंटंटची नोकरी स्वीकारली. कुर्ल्यात ते वन रुम-किचन असलेल्या फ्लॅटमध्‍ये राहायला लागले. आश्‍चर्याची गोष्‍ट म्हणजे आज येथेच 12 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर 'ऑरा सिटी' मॉल आहे. त्याचे मालक आहेत सुभाष रुणवाल. ज्या केमिकल कंपनीत ते नोकरीला होते, त्या कंपनीने त्यांचा प्रॉब्लम शूटरप्रमाणे वापर केला. प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांशी जवळी वाढल्याने रुणवाल यांचा आत्मविश्‍वास वाढला आणि त्यांनी नोकरी सोडली. त्यांनी रिअल इस्टेटमध्‍ये प्रवेश केला.

सुभाष रुणवाल यांच्या यशस्वी कथा पुढील स्लाइड्सवर वाचा...