आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधारण राहाल वा आयकॉन व्हाल? वाचा लीडरशिप एक्स्पर्ट रॉबिन शर्मा यांच्या टीप्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रॉबिन शर्मा,  लेखक आणि लीडरशिप एक्स्पर्ट - Divya Marathi
रॉबिन शर्मा, लेखक आणि लीडरशिप एक्स्पर्ट
तुम्हाला उपरोक्त गुणांचे स्वामी व्हायला आवडेल की एक साधारण आयुष्य जगाल? चला जाणून घेऊया, साधारण जीवन जगणारे आणि इतरांसाठी आयकॉन होण्याची हिंमत ठेवणाऱ्या महान लोकांमधील अंतर...

1.साधारण जीवन जगणाऱ्या लोकांना दुसऱ्यांविषयी बोलणे आवडते, तर इतरांसाठी प्रेरणा होणारे आयकाॅन स्वत:च्या स्वप्नाविषयी बोलतात.

2.साधारण जीवन जगणाऱ्या लोकांना आराम करणे आवडते. कोणत्या वाहिनीवर काेणती मालिका येणार आहे, हे त्यांना माहिती असते. ते आपल्या जीवनातील महत्त्वाची वेळ कँडी क्रश खेळण्यात घालवतात. बाजारात आलेले लेटेस्ट गॅजेट आपल्या मित्रांच्या अाधी खरेदी करण्याचा प्रयत्न करतात. आयकाॅन होणारे लोक नेमके याच्या उलट असतात. त्यांना नवे काही शिकण्याची सवय असते. ते पुस्तके विकत घेतात, परिषदेत सहभागी होतात आणि आपले भविष्य वर्तमानापेक्षा अधिक चांगले राहील, असे सर्व काही करतात.

3.उच्च कोटी गुणांची वा आयकाॅन होणारी माणसे कोणत्या तरी दुसऱ्या मातीची बनलेली असतात, असा साधारण जीवन जगणाऱ्यांचा समज असतो. ते मीडियॉक्रिटी वा साधारण कोटीच्या अधीन होतात. मी याला मिथ ऑफ जीनियस म्हणतो. यात गुंतू नका. वेगळा दृष्टिकोन हाच महान व्यक्तींच्या प्रेरणेचा स्रोत असतो. जीनियस वा लेजेंडरी असणे ईश्वराद्वारे निर्मित प्रज्ञेचा परिणाम नाही, हे ते जाणतात. कठोर मेहनत, शिस्त, त्याग, सहनशक्ती, घटनेकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन त्यांना सामान्यांपेक्षा वेगळे आणि सर्वश्रेष्ठ बनवतो.

पुढे वाचा...साधारण जीवन जगणारे वेळेचा अपव्यय करतात