आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Success Story Of Albinder Dhindsa Co Founder Of Grofers

वार्षिक उलाढाल कोटींचा, काम फक्त ऑनलाइन ऑर्डरची घर पोहोच सेवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो : ऑनलाइन डिलिव्हरी ग्रोफर्सचे सहसंस्थापक अलबिंदर डींढस - Divya Marathi
फाईल फोटो : ऑनलाइन डिलिव्हरी ग्रोफर्सचे सहसंस्थापक अलबिंदर डींढस
पंजाबमधील पटियालामध्‍ये लहानाचा मोठा झालेला आणि आयआयटी दिल्लीत इंजिनिअरिंगची पदवी घेतली. 2005 मध्‍ये अमेरिकेच्या युआरएस कॉर्पोरेशनमध्‍ये ट्रान्सपोर्टेशन अॅनालिस्ट म्हणून करिअरची सुरुवात केली. दोन वर्षांनंतर नोकरी बदलली. केंब्रिज सिस्‍टमॅटिक्समध्‍ये सिनियर असोसिएट म्हणून पदभर स्वीकारला. येथे तीन वर्ष काम केल्यानंतर अलबिंदरने एमबीए करण्‍याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला.

एमबीए करताना त्याने तीन महिने युबीएस इन्व्हेस्टमेंट बँकेतही नोकरी केली. डिग्री घेतल्यानंतर अलबिंदरने भारतात परतण्‍याचा निर्णय घेतला. देशात आल्यानंतर त्याने जोमॅटो डॉट कॉमचा आंतरराष्‍ट्रीय मोहिमांचा प्रमुख म्हणून काम सुरु केले. येथील तीन वर्षांमध्‍ये अलबिंदर खूप काही शिकला. त्याने आपली भविष्‍यातील कंपनी ग्रोफर्ससाठी काम करायला सुरुवात केली.

अशी झाली सुरुवात :
अमेरिकेतील केंब्रिज सिस्टमॅटिक्समध्‍ये नोकरीवर असे पर्यंत अलबिंदरचा व्यवसाय सुरु करण्‍याचे कोणतेही नियोजन नव्हते. परंतु येथे काम करताना त्याला लॉजिस्टि‍क्स किंवा डिलिव्हरी इंडस्ट्रीत मोठी पोकळी दिसली. त्याने स्थानिक बाजारपेठेत ग्राहक आणि व्यापारी यांचा होणार व्यवहार हा निश्चित ठोकताळ्यानुसार होत नसल्याचे पाहिले. या दरम्यान त्याची भेट सौरभ कुमारशी झाली. दोघांनी त्या पोकळीवर चर्चा केली. ती वाया घालवायची नाही. व्यवसायाची पार्श्‍वभूमी नसलेल्या अलबिंदरमध्‍ये उद्यमशीलतेचे स्वप्न पडू लागले.

पुढील स्लाइड्सवर वाचा बाजारपेठीय पोकळी भरण्‍यासाठी डिलिव्हरी प्लॅटफॉर्म...