आयआयएम बंगळूरुमधून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर विशाल गुप्ता एशियन पेंट्स, एचयूएल आणि अवीवा लाइफ इन्श्योरन्ससारख्या कंपन्यांमध्ये विपणन आणि विक्रीचा 13 वर्षांचा अनुभव घेतला. अवीवामध्ये मार्केटिंग डायरेक्टर असताना त्याने ब्रँड आयडिया म्हणून एज्युकेशन इज इन्श्योरन्सची कल्पना मांडली. या मुलांच्या इन्श्योरन्स प्लान्समध्ये कमी कालावधीत 1 वरुन 15 टक्क्यांवर पोहोचल्याचे निरीक्षण विशालने नोंदवला.
या अनुभवातून त्याला लक्षात आले, की पालक
आपल्या मुलांसाठी काहीतरी करायला नेहमी तयार असतात. वाढत्या डिस्पोझेबल उत्पन्नामुळे किड्स स्पेसमध्ये व्यवसायाचा आकार वाढू शकतो. या सर्व शक्यता पाहाता विशालला किड्स स्पेसमध्ये व्हेंचरची अशा दिसली. दुसरीकडे दोन मुलांचा पिता असल्याने मुलांना व्यस्त ठेवण्याच्या पध्दती शोधण्यात पालकांची कशी नाकीनऊ येते याचा अंदाज त्याला आला होता.
अशा स्थितीत विशालला आंत्रप्रून्यरशीपची संधी दिसली. त्याने असा ऑनलाइन मंच सुरु करण्याचा निर्णय घेतला ज्याने पालकांना आणि खास करुन नोकरदार महिलांना आपल्या मुलांच्या संगोपनासाठी काही सेवा देऊ शकेल. आपला निर्णय वास्तवात यावा यासाठी विशालने अवीवाची आपली नोकरी सोडून आंत्रप्रून्योरशीपकडे वळाला.
पुढील स्लाइड्सवर पाहा तरुण आंत्रप्रून्यरची यशकथा...