आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Teacher Day Special: Information And Number Should Be With Teacher

शिक्षकदिन विशेष: माहिती असावी असे शिक्षकांबद्दलचे सत्य व आकडेवारी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॉलेज इकॉनॉमी म्हणून ओळख असणा-या भारतात स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र असणा-या पेशांपैकी एक म्हणजे शिक्षक. पंजाब आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये तर टिचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यासाठी लोक लाखो रुपयांचे डोनेशनही द्यायचे. पण त्यावेळीही शिक्षक-विद्यार्थी प्रमाण इतर देशांच्या तुलनेत अत्यंत कमी होते. आजही परिस्थितीमध्ये काही सुधारणा झालेली नाही. पण आपल्या देशांत शिक्षकांची कमतरता का आहे? तसेच शिक्षक ती भरून काढण्यासाठी सरकार काय पावले उचलत आहे? याबद्दल आज चर्चा करूया.


कठीण काम आणि उत्पन्नामुळे माघार
चांगली नोकरी आणि पगार मिळत नसल्याच्या कारणामुळे शिक्षकी पेशाबद्दलचे आकर्षण कमी होऊ लागले. आज प्रत्येक राज्याच्या बीएड महाविद्यालयांमध्ये जागा रिक्त राहतात. 2013 मध्ये महाराष्ट्रामध्ये डिप्लोमा इन टिचर्स एज्युकेशन अभ्यासक्रमाच्या 90 हजार जागा होत्या. त्यापैकी 38 टक्के जागा रिक्त आहेत, तर 408 संस्था बंद होण्याच्या मार्गावर आहेत. उत्तर प्रदेशातील महाविद्यालयांमध्येही बीएडच्या 70 टक्के जागा रिक्त आहेत. कर्नाटकात तर जागा रिक्त असण्याचे प्रमाण 70 टक्के इतके आहे. एकीकडे सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची लाखो पदे रिक्त आहेत. तर दुसरीकडे डीएड, बीएड महाविद्यालयांना विद्यार्थी मिळत नाहीत. याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे, सरकारी शाळांमध्ये नोकरी मिळत नाही आणि खासगी शाळांमध्ये त्यांना अत्यंत कमी वेतनावर करावे लागते.


चांगल्या वेतनासाठी परदेशी जाण्याकडे ओढा
देशात शिक्षकांची कमतरता असण्याचे आणखी एक प्रमुख कारण म्हणजे, विद्यापीठात प्राध्यापकाला जर महिन्याला 35 हजार रुपये वेतन मिळत असेल तर ब्रिटनमध्ये त्यांना महिन्याला दीड लाख रुपये मिळतात. परदेशातही भारतीय शिक्षकांना मागणी आहे. इंग्रजी, विज्ञान आणि गणित अशा विषयांसाठी त्यांना बोलावले जात आहे. आफ्रिका, पश्चिम आशिया, युरोप आणि व्हिएतनाममध्ये गेल्या दोन वर्षांत भारतीय शिक्षकांना मागणी वाढली आहे.
केवळ केरळमध्ये पुरेसे शिक्षक, इतर राज्यांत सर्वत्र एकशिक्षकी शाळा
भारतातील राज्यांमध्ये अनेक सरकारी शाळा आहेत. मात्र, त्याठिकाणी शिकवण्यासाठी शिक्षक नाहीत, किंवा असतील तर ते आवश्यक ती अर्हता पूर्ण करणारे नाहीत. केरळ देशातील सर्वात सुशिक्षित राज्य मानले जाते. ते एकमेव राज्य आहे, ज्याठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये किमान 6 शिक्षक आहेत. इतरांची परिस्थिती खालीलप्रमाणे आहे.


मध्य प्रदेश-19,095
शाळांमध्ये प्रत्येकी फक्त 1 शिक्षक. देशातील सर्वाधिक एकशिक्षकी शाळा.
राजस्थान - 49 टक्के
उत्तर प्रदेश - 1000
शाळांमध्ये एक-एक शिक्षक. पण सर्वाधिक (सुमारे 6 लाख) शिक्षकही याठिकाणीच.
बिहार - 83:1
एवढे देशातील सर्वात कमी विद्यार्थी - शिक्षक प्रमाण. देशातील सरासरी प्रमाण 42:1 आहे.
देशात 12 लाख शिक्षकांची कमतरता
12 लाख
शिक्षकांची देशात कमतरता आहे. अमेरिकेत 2011 मध्ये 3 कोटी 72 लाख विद्यार्थी होते. त्याचे विद्यार्थी - शिक्षक प्रमाण 15:2 आहे. ते भारताच्या तुलनेत अत्यंत कमी आहे.
16 टक्के
गावांमध्ये शाळात नाहीत. 17 टक्के शाळांमध्ये फक्त एकच शिक्षक आहेत.
53.2 टक्के
शाळांध्ये शिक्षकांचे प्रमाण सरासरीपेक्षाही कमी आहे.
@युनेस्को इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टीक्सच्या अहवालानुसार 2015 पर्यंत देशात सुमारे 20 लाख नवीन शिक्षकांची आवश्यकता असेल.
बीएडची पदवी नसलेल्या शिक्षकांवर
शाळा चालवते सरकार

सर्वशिक्षा अभियानांतर्गत सुमारे 12 लाख शिक्षकांची नियुक्ती करण्याची सरकारची योजना आहे. त्यापैकी आतापर्यंत सुमारे 10.5 लाख नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पण या सर्वांना शहरांमध्येच काम करण्याची इच्छा असते. त्यामुळे ग्रामीण भागांमध्ये अजूनही परिस्थिती पूर्वीप्रमाणेच आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी राज्यातील सरकारी शाळांनी कंत्राटी किंवा अशा शिक्षकांची नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे, ज्यांच्याकडे बीएड ची पदवी नाही, पण शिकवण्याइतपत ज्ञान आहे. एमएचआरडीनुसार सरकारी शाळांमध्ये शिकवणा-या या शिक्षकांपैकी सुमारे 7 लाख 74 हजार पूर्णपणे प्रश्क्षित नाहीत. याचे प्रमाण मध्य प्रदेशात सर्वाधिक 52 टक्के आणि त्यानंतर छत्तीसगड 41 टक्के आहे. मात्र, त्यांना रिफ्रेशर ट्रेनिंग दिली जाते.


To my teacher...
"Teachers are often the people who inspire us the most. I know I wouldn't be where I am today without my fourth grade teacher, Mrs. Duncan. She so believed in me, and for the first time, made me embrace the idea of learning. I learned to love learning because of Mrs. Duncan."
- Oprah Winfrey.

"She looked out for me fully. She made sure I was always in class. She made sure I always remained focused. She is like my second mother. She is my Physical Education Coach, Lorna Thorpe."
- Usain Bolt.


शब्द - लफ्ज- word
> अत्यंत हुशार - बाकिंर - brilliant
> निरक्षर - अनपढ - illiterate
> Pedagogue - शिक्षक - उस्ताद
9200001174 या क्रमांकावर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com