आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअर कॉर्नर: ... ही आहेत ध्‍येयांपर्यंत पोहोचण्याच्या परिणामकारक पद्धती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या कामाला उत्तम बनवण्यासाठी नवनव्या पद्धतींचा अवलंब करा. यात एक पद्धत अशी आहे की, दररोज वृक्ष-रोपट्यांमध्ये काही वेळ घालवा. अधिक नव्हे तर एक-दोन मिनिटे पुरेशी आहेत. तिथे कमी वेळेत जर का आपल्याला आपले करिअर घडवायचे असेल तर आपण आपले नेटवर्क वाढवत नेले पाहिजे. तुमच्या संपर्कक्षेत्रात जेवढे लोक अधिक तेवढी तुम्हाला करिअरसंबंधी महत्त्वपूर्ण माहिती मिळत जाईल. वाचा हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमध्ये ....
उत्तम करिअरसाठी नवे मित्र बनवत चला :
आपले संपर्कक्षेत्र मजबूत, व्यापक असेल तर करिअरच्या उंचीपर्यंत पोहोचणे सोपे जाते. चांगला मित्रपरिवार असण्याने गरजेच्या वेळी आपल्या करिअरशी संबंधीत अचूक माहिती पाठिंबा मिळतो. नेटवर्क तयार करताना आपल्याला त्यात कोणते लोक हवेत हे ठरवा. आपल्या क्षेत्रातील आणि व्यावसायिक यात असू शकतात. ग्रुपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक असल्याने तेवढेच अधिक मूल्य जोडले जाईल. ग्रुपसाठी काही नियमही तयार करा. सर्वांना याबाबबत माहिती द्या. ग्रुपमधील चर्चा सदस्यांपुरतीच मर्यादित ठेवा. ग्रुपचा आराखडा वा योजना तयार करा. जसे आठवड्यात वा महिन्यात किती वेळेस भेटायचे, एक-दुसऱ्याशी कसे काय बोलायचे, ग्रुपमधील सदस्य अडचणीत असेल तर ग्रुपच्या सर्व सदस्यांनी त्याला सर्व प्रकारची माहिती मदत केली पाहिजे. त्यामुळे त्या उदास, नाराज, अडचणीतील सदस्याला सर्व प्रकारे मदत होईल. (संदर्भ: क्रिएट मास्टरमाइंड ग्रुप टू हेल्प युवर करिअर)
पुढे वाचा.. अंतर्गत कौशल्ये दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग