आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टुडंट Issues : शाखा निवडीपूर्वीच जाणून घ्या या तीन गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुसऱ्याच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. आवडी व उद्दिष्टांनुसार निवड करा...
बारावी बोर्डाची परीक्षा वा कॉलेजमधून पासआऊट झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालक हा विचार करण्यात अधिकाधिक वेळ घालवतात की पुढे कोणत्या शाखेचे शिक्षण घ्यायचे वा कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे ते. अशाच काही विद्यार्थी व पालकांबरोबर बातचीत केल्यावर कळले की, आम्ही संशोधन करणे आणि अन्य लोकांचे मत घेण्यात खूप वेळ घालवतो. खरे तर हा निर्णय कुठल्याही अन्य गोष्टींपेक्षा अधिक व्यक्तिगत असतो. खरी शाखा निवड काय आहे, यात उलगडण्याएेवजी या गोष्टींवर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे की आपण कोण आहात. आणि जीवनात तुम्ही काय मिळवू इच्छिता. यासाठी तीन गोष्टींवर केंद्रित केले जाऊ शकते :
सेल्फ अवेअरनेस (स्वयंजागृती) : आपल्या आवडीची निवड करण्यासाठी वेळ दिला जाऊ शकतो. आपण कोणता विषय शिकणे पसंत कराल. कोणत्या गोष्टींच्या बाबतीत आपण मोकळ्या वेळेत वाचत असता. कोणत्या प्रकारच्या लोकांची आपण प्रशंसा करता आणि कोणत्या गोष्टींची बातमी ठेवणे आपल्याला आवडते. सर्वच प्रकारच्या विषयात मेहनत तर लागतेच, यासाठी आपल्या आवडीच्या शाखा निवडीसाठी आपण अधिक वेळ द्या. आज सर्वच जागी स्पर्धा आहे. यासाठी आपणास आपणच निवडलेल्या शाखेत सर्वोत्तमच व्हावे लागेल. यानंतर आपली आवड आणि क्षमतेनुसार आपल्याला शाखा निवडावी लागेल. यासाठी आपणास त्याच शाखेची निवड करावी लागेल, ज्यास आपल्याला शिकणे आवडेल. उदा. संगीत आपल्याला खूप पसंत आहे, पण आपण गाऊ शकत नाही, यासाठी ही शाखानिवड हा एक चांगला निर्णय नसेलच. पण जर आपणास आकड्यांची आवड असेल आणि गणित चांगले आहे, तर गणित ही आपली खरी निवड असेल.

जीवनाचा दृष्टिकोन : पुढे येणाऱ्या ५ वर्षांत आपण स्वत:ला कुठे असलेले पाहता. आपले उद्दिष्ट निर्धारित करा. कोर्सची निवड करताना यास लक्षात जरूर ठेवा. आपली पदवी आपल्या उद्दिष्टांना प्राप्त करण्यासाठी साहाय्यकारी असले पाहिजे. केवळ हे पुरेसे नाही की, आपले पालक काहीतरी वेगळेच विचार दृष्टिकोन ठेवताहेत. तेव्हा त्यांचा विचारही समजून घ्या आणि पाहा की आपण त्यांच्याशी सहमत आहात का.

ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवू नका : जर का आपण एखादे विशिष्ट स्पेशल असे निवडणार आहात. तेव्हा कोर्स जॉईन करण्यापूर्वी त्या क्षेत्रातील संभावित करिअर पर्यायाच्या बाबत जाणून घ्या. हे माहीत करून घ्या की, कोणती कंपनी त्या क्षेत्रात नियमित हायरिंग करते आहे. आणि काय त्या प्रकारची जॉबमध्ये तुम्ही इंटरेस्टेड आहात का.
पदवीपूर्व पातळीवरील नोंदणी
40.44% विद्यार्थी कला मानव्य विद्या आणि सामाजिक शास्त्रात प्रवेश घेतात.
17.36% विद्यार्थी इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी कोर्समध्ये प्रवेश घेतात.
13.76% विद्यार्थी घेतात विज्ञान शाखांतील विषयात प्रवेश
श्वेता रैना
टेलिरंगच्या संस्थापक व सीईओ
बातम्या आणखी आहेत...