आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • TIFR FS 2014 : Tata Institute Of Fundamental Research Entrance

टीआयएफआर जीएस-2014: टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च एमएस्सी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमएस्सी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षा
मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्चच्या पदवी विद्यालयात प्रवेशासाठी 8 डिसेंबरला परीक्षा होईल. या माध्यमातून विद्यार्थी एमएस्सी, पीएचडी व इंटिग्रेटेड एमएस्सी-पीएचडीमध्ये प्रवेश घेऊ शकतात. त्यासाठी 20 ऑक्टोबरपर्यंत अर्ज केले जाऊ शकतात.


पात्रता
एमएस्सी / इंटिग्रेटेड पीएचडीसाठी : संबंधित शाखेत पदवीधर.
पीएचडीसाठी : संबंधित शाखेत पदव्युत्तर पदवी.


निवड प्रक्रिया
विज्ञान शाखेतील विषयांशिवाय सर्व शाखेसाठी विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देऊ शकतात. त्या आधारेच त्यांना मुलाखतीसाठी निमंत्रित केले जाऊ शकते. मुलाखत फेब्रुवारी ते एप्रिल 2014 दरम्यान होईल. अंतिम गुणवत्ता यादी दोन्ही परीक्षेतील कामगिरी पाहून तयार केली जाईल.
निकाल (प्रवेश परीक्षा) : 15 जानेवारी 2014


शुल्क व शिष्यवृत्ती
एमएस्सीच्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला 12 हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळेल. अभ्यासक्रमासाठी दरवर्षी 2 हजार रुपये भरावे लागतील. पीएचडीच्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला दर महिन्याला 16 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळेल. त्याशिवाय 20 हजार रुपये वार्षिक निधी व अध्ययनअंतर्गत शुल्कदेखील विद्यार्थ्यांना दिले जाते.


संशोधनावर सर्वाधिक भर
टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चची सुुरुवात 1945 मध्ये झाली होती. डॉ. होमी जहांगीर भाभा संस्थेचे पहिले संचालक होते. टीआयएफआरमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स, कॉम्प्युटर सायन्स आणि विज्ञानातील मूलभूत संशोधनावर भर दिला जातो. भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे यावर नियंत्रण आहे. मुंबईव्यतिरिक्त पुणे, बंगळुरू व हैदराबादमध्ये या संस्थेच्या शाखा आहेत.


वृत्त
आयआयटीजसाठी ग्लोबल रॅँकिंग सिस्टिम
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थांसाठी नवी जागतिक गुणवत्ता प्रणाली विकसीत केली जात आहे. यामुळे या संस्थेची जगातील सर्वोत्कृष्ट संस्थांशी त्यांची तुलना होऊ शकेल. आपल्या आवडीच्या कोर्सची निवड करण्यासाठी तुलनात्मक आढावा घेता येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. नव्या प्रणालीमध्ये आयआयटीजना अ‍ॅकॅडमिक प्रोग्राम, फॅकल्टी, लॅब आणि रिसर्च फॅकल्टिज, प्लेसमेंट्स आदी मानकांतून निवडले जाईल. याबरोबर इंस्टिट्यूटची जागतिक पात्रता पाहिली जाईल. सुरुवातीस आयआयटीला कमी रॅँकिंग मिळू शकेल. मात्र, त्यात हळूहळू बदल होऊन स्थिती सुधारेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


2014 मध्ये देशातील पहिली रोबोटिक कार
भारतातील पहिली रोबोटिक कार पुढील वर्षाच्या सुरुवातीस येण्याची शक्यता आहे. आयआयटी खरगपूरमधील 30 विद्यार्थ्यांच्या टीमने त्याचे डिझाइन केले आहे. या प्रोजेक्टला एकलव्य 2.0 नाव देण्यात आले असून त्यावर 2011 पासून काम सुरू करण्यात आले आहे. प्रोजेक्टचा अंदाजित खर्च 1.5 कोटी रुपये आहे. प्रोजेक्टचे टीम लीडर श्रीनिवास रेड्डी यांच्या म्हणण्यानुसार, याच्या निर्मितीसाठी खाण, कृषी आणि ऑटोमोबाइल्स या तीन विषयांवर भर देण्यात आला आहे. माणसाला जिथे वाहन चालवता येत नाही, अशा ठिकाणीही ही कार जाऊ शकेल. याबरोबर यामध्ये लावण्यात आलेल्या सेन्सरद्वारे आकाशमंडळातील घातक वायूची माहिती मिळू शकेल.


Four English words
that are utterly unique...

1.Syzygy (siz-i-zee) : Amazingly, the only English word with three Ys also happens to describe a rare astronomical event involving three heavenly bodies. A syzygy is the alignment of three celestial bodies in a straight line, commonly the Earth, the Sun and the Moon.

2. Tmesis (tuh-mee-sis) : The sole term in the English language to begin with Tm- has an unusual meaning to match. Tmesis is the insertion of one or more words between the words that make up a compound phrase. For example: "what-so-ever" inserted in the middle of "whatever."

3. Hydroxyzine (hahy-drok-suh-zeen) : Only one word in all of English has an X, Y, and Z. Hydroxyzine is also the only word on this list that you may have swallowed at some point. This medication developed in the 1950s can help calm you down, prevent sneezing, and impress you with unique linguistic qualities.

4. Queue (kyoo) : Before it meant a line, a queue referred to the tail of a beast in medieval pictures and designs. The unusual spelling owes its origin to French, like so many words that look a little odd in English. Prior to the Frenchification of queue, Latin spelled it simply as coda. The duplication of U and E often feels like waiting in line: once you think you are almost there, the queue magically seems to repeat itself.


शब्द - लफ्ज -word
योद्धा - जर्रार- Fighter
तफहहुम- समजूतदारपणा- Understanding
Poignancy - मार्मिकता- हिद्दत


प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या क्रमांकावर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com