आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 10 टीप्स फॉलो करा, स्वत: मधील स्मार्टनेस वाढवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण नेहमी अनेक लोकांना भेटत असतो. यातील काही जण आपल्याला प्रभावित करतात. अशा लोकांना, the person has got a pleasant personality असे म्हणतो. प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तींचा प्रत्येक ठिकाणी आदर केला जातो. ती हवीहवीशी वाटतात. पार्टींमध्‍ये बोलवले जाते आणि नोकरीच्या ठिकाणी बढतीही लवकर दिली जाते.स्वाभा‍विकच सगळ्यांना असे व्यक्तिमत्त्व आपलेही असावे वाटते. यामुळे divyamarathi.com तुम्हाला आकर्षक व्यक्तिमत्त्व कसे विकसित करावे यासाठी 10 गोष्‍टी सांगणार आहे. ती तुम्हाला Personality Development मध्‍ये मदतीची ठरतील.

1.जे आहात ते लोकांना दाखवा :
जेव्हा आपण कोणाला भेटतो, तेव्हा मनात त्या व्य‍क्तीची एक प्रतिमा तयार होते. ती सकारात्मक, नकारात्मक किंवा तटस्थही असू शकते. जर तुम्हाला स्वत:ची प्रतिमा सुधारायची आहे. त्यासाठी स्वत:ची प्रतिमा हेतूपूर्वक सकारात्मक बनवा. मनाला प्रशिक्षण द्यावे लागेल, की लोकांमधील चांगूलपणा शोधावे नव्हे नकारात्मकता.हे अवघड नाही. तुम्ही मनाला चांगूलपणा शोधण्‍याची सूचना दिली तर ते नक्की शोधेल.
लोकांसह शांततेने वागले पाहिजे. त्यांच्या कोणत्याही उणीवाने क्रोधित होऊ नये. उलट स्वत:ला त्यांच्या जागी ठेवून पाहिले पाहिजे. कदाचित आपण त्याच वातावरणात मोठे झालो असतो, तर तसेच वागले असता. यामुळे मतभेदाचे स्वागत करावे. क्रोधित होऊ नये.
राल्फ वाल्डो इमर्सनने म्हटले आहे, की मी असा व्यक्तिंना भेटतो, जी ती कोणत्याना कोणत्या कामात माझ्यापेक्षा सर्रास असतात.

2. स्मितहास्याने भेट घ्‍या :
जेव्हा तुम्ही आपल्या जिवलग मित्राला भेटता तेव्हा काय होते? तुम्ही एकमेंकांना भेटून स्मितहास्य करता. नाही का? हास्याने कळते, की तुम्ही समोरच्या व्यक्तिला किती पसंत करता. हाच नियम प्रत्येक नातेसंबंधात लागू होतो. त्यामुळे जेव्हाही तुम्ही कोणाला भेटाल, तेव्हा चेह-यावर स्मितहास्य ठेवा. याने लोक तुम्हाला पसंत करतील. काही प्रसंगी लोकांना भेटल्यावर तुम्हाला हवा असलेला प्रतिसाद मिळणार नाही. पण तुम्ही आपली भूमिका चांगल्या प्रकारे करा.

एका संशोधनानुसार, जेव्हा आपण आतून आनंदी असतो, तेव्हा आपल्या आतील भावना त्याप्रमाणात बदलत असतात. तुम्हाला पाहून लोकांना कळून जाते, की तुम्ही खूश आहात. याच्या उलट बाहेरील वातावरण चांगले असेल, तर आपली म‍नस्थितीही आनंदी राहते.
3. नाव ध्‍यानात ठेवा:
कोणत्याही व्यक्तिला त्याचे नाव खूप प्रिय असते. यामुळे जेव्हा तुम्ही कोणाशी बोलत असाल तर मधे-मधे त्याचे नाव घेत राहा. ती व्यक्ति वरिष्‍ठ असेल, तर आदराने त्यांचे नाव घ्‍या. मधे-मधे नाव घेतल्याने समोरच्या व्यक्तिला आपण किती महत्त्वाचे आहोत हे सारखे वाटत असते. तो तुमच्याकडे अधिक लक्ष देतो.

4. मी ऐवजी तुम्ही :
तुम्ही कोणत्या लोकांना अधिक पसंत कराल, जे आपल्या स्वार्थसाधून घेतात ते? प्रत्येक व्यक्ति स्वत:च्या अति प्रेमात पडलेला असतो. जसे की, मी हे करतो/ते करतो. पण तुम्ही यातून मी बाजूला काढा आणि तुम्ही असा शब्द वापरा. तुम्हाला कसे वाटते? तुम्हाला काय चांगले वाटते ? तुम्ही काय करता? तुम्ही असे केल्याने लोक तुम्हाला ती आणखी पसंत करायला लागतील. केवळ अभिनेता, क्रिकेटपटू किंवा लेखक नव्हे तर कॉमन मॅनलाही चाहता हवा असतो. जेव्हा तुम्हा त्या कॉमन मॅनचे चाहते बनता तेव्हा त्याच्यासाठी खास बनता. आणि असे तुम्ही सगळ्यांशी वागता तेव्हा अनेकांचे तुम्ही खास होऊन जाता. आणि तुम्ही एका प्रक्रियेत Person मधून Personality होऊन जातात. असे व्यक्तिमत्त्व ज्यास सर्वर लोक पसंत करतात.

5. बोलण्‍यापूर्वी ऐका
तुम्ही जेव्हा दुस-यात इंटरेस्ट घेता, तेव्हा त्यात विश्‍वासार्हता असायला हवी. तुम्हाला समोर येणा-यास फक्त बोलायची संधी द्यायची नाही, तर तो जे बोलतो ते काळजीपूर्वकही ऐकायचे आहे. जसे की जर कोणी म्हणतो त्याला फीरायला आवडते, तर तुम्ही त्याच्या आवडत्या पर्यटन केंद्रांविषयी विचारले पाहिजे. चांगल्या श्रोत्याची मागणी कमी नाही. तुम्ही एक चांगला श्रोता बना आणि पाहा तुमची मागणी कसे वाढते.
पुढे वाचा आणखी 5 व्यक्तिमत्त्व विकासाचे 5 गोष्‍टींविषयी...