आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यातील शिक्षकांसाठी \'कॅशलेस मेडिक्लेम\' लागू होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यातील शिक्षक त्यांच्या कुटुंबीयांसाठी कॅशलेस मेडिक्लेम योजना लागू करण्याचा निर्णय शिक्षणमंत्र्यांनी घेतला असून शिक्षक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या कुटुंबीयांना होणार आहे. विविध आजारांवरील उपचारासाठी राज्यातील शेकडो हॉस्पिटल या योजनेत जोडले जाणार आहेत. सध्या आजारांवर उपचार घेतल्यानंतर मेडिकल बिल मंजूर करून घेण्यासाठी विलंब लागतो. नवीन योजनेत शिक्षकांना एक मेडिकल कार्ड दिले जाणार असून ते दवाखान्यात सादर केल्यानंतर कोणतेही पैसे भरता उपचार घेता येईल, अशी माहिती शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी दिली.

पुढे वाचा... साडेसात लाख शिक्षकांना फायदा मिळणार