आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीआयएएससी-2013 : शालेय विद्यार्थ्यांसाठी सीएसआयआर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इनोव्हेशन पुरस्कार
शालेय विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण शोध (इनोव्हेशन) व बौद्धिक संपदेविषयी जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी सीएसआयआर (कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च) कडून पुरस्कारासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. 30 सप्टेंबर 2013 पर्यंत अर्ज करता येऊ शकेल.


स्पर्धा
पुरस्कार 30अर्ज/ अनिश्चित
पुरस्कार वेग-वेगळ्या
प्रकारांसाठी असतात.


पात्रता
देशातील सर्व शाळांतील विद्यार्थी त्यात सहभागी होऊ शकतील, परंतु 31 जुलै 2013 पर्यंत 18 वर्षांहून कमी असावे. विद्यार्थ्यांचा समूह एकाचवेळीदेखील अर्ज करू शकतो.


कसा करणार अर्ज
इच्छुक विद्यार्थ्याने आपल्या इनोव्हेशनचा संपूर्ण तपशील 5 हजार शब्दांपर्यंत लेखी स्वरूपात पाठवावा. त्यासाठी 100 शब्दांपर्यंत त्याचा सारदेखील पाठवावा लागेल. स्वतंत्र कागदावर वैयक्तिक तपशील द्यावा. त्यात इनोव्हेशनचे शीर्षक, अर्जदाराचे नाव, जन्मतारीख, वर्ग, शाळा, घराचा पत्ता, ई-मेल पाठवावा. शाळेच्या माध्यमातून अर्ज करावा आणि त्यावर मुख्याध्यापकाचा शिक्का व हस्ताक्षर असावे.


निकाल : 1 जानेवारी 2014


पाच विभागात पुरस्कार
एकूण 30 पुरस्कारांमध्ये पहिले बक्षीस-1, दुसरे बक्षीस-2, तिसरे-3, चौथे-4, पाचवे-20 बक्षिसे असतील. रोख रकमेच्या स्वरूपात 1 लाख, 50 हजार, 30 हजार, 20 हजार, 10 हजार रुपयांची रक्कम दिली जाईल. त्याबरोबरच प्रमाणपत्रदेखील मिळेल, परंतु सर्व 30 पुरस्कार दिले जातील, हे निश्चित नाही. इनोव्हेशन ठरलेल्या निकषांवर उतरणे गरजेचे आहे.


कल्पना नवीन असणे गरजेचे
नवीन विचार किंवा नवीन संकल्पनेवर आधारित अर्जाचाच पुरस्कारासाठी विचार केला जाईल. त्यात विद्यमान समस्येवर उपाय सुचवलेला अपेक्षित आहे. नवीन प्रक्रिया, पद्धती व उपयोगितेवर आधारित इनोव्हेटिव्ह उत्पादन पुरस्कारासाठी योग्य ठरते. त्याची सत्यता, मॉडेलची पडताळणी झालेली असावी. इनोव्हेशनचे कार्यक्षम मॉडेल किंवा प्रोटोटाइप असेल, तर ते अर्जासोबत त्याचा फोटो किंवा व्हिडिओ पाठवता येऊ शकतो.


निवड प्रक्रिया
उच्चस्तरीय समितीमार्फत पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात येईल. शोधामध्ये कोणते शिक्षक, मार्गदर्शक किंवा पालकांची मदत घेतली किंवा नाही, हे विद्यार्थ्यांना आवेदन करतानाच स्पष्ट करावे लागेल. त्याच आधारावर उमेदवारांची छाननी केली जाईल. गरज भासल्यास शास्त्रज्ञांचा चमू दूरध्वनीवर त्यांची मुलाखतही घेऊ शकतो.


रंजक
विविध क्षेत्रांतील 100 चे महत्त्व
अंकशास्त्र
अंकशास्त्रात 100 या संख्येचा असंतुलन आणि भ्रमाशी संबंध जोडून पाहिला जातो. ही संख्या भेदभाव आणि शंका निर्माण करणारी समजली जाते.


गणित
पहिल्या दहा प्रमुख अंकांची बेरीज 100 आहे.-
1+3+5+7+11+13+15+17+19+21 = 100


विज्ञान
फरमियमची अणु संख्या 100 आहे. सेल्सिअसच्या मापनावर शुद्ध पाणी 100 अंश तापमानात उकळण्यास सुरू होते. समुद्रतळापासून 100 किलोमीटर उंचीवर करमन रेषा आहे. सामान्यपणे पृथ्वी आणि बाह्य आकाशाच्या सीमेची ती विभाजक मानली जाते.


धर्म
100 चा उपयोग बायबलमध्ये 95 वेळा आणि कुराणमध्ये 5 वेळा करण्यात आला आहे. एका यहुद्याला दिवसातून 100 वेळा प्रार्थना करावी लागते.


इतर
ग्रेट पिरॅमीडचे बांधकाम 100 वर्षांत पूर्ण झाले. जगातील बहुतांश चलनाची 100 च्या आकड्यात विभागणी करण्यात आली आहे. 100 पैशांचा 1 रुपया, 100 सेंटचा 1 युरो इत्यादी. दंतकथेची रचना- ‘द डिव्हाइन कॉमेडी’मध्ये एकूण 100 गाणी आहेत.


रोचक वाक्य
"In the first place, God made idiots. That was for practice. Then he made school boards."-Mark Twain
ईश्वराने सर्वात आधी मूर्ख माणसाची निर्मिती केली. हा केवळ प्रयत्न होता. त्याला सुधारण्यासाठी ईश्वराने शाळांची निर्मिती केली. मार्क ट्वेन


प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या क्रमांकावर किंवा इ-मेल

education@dainikbhaskargroup.com