आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Education Latest News Career In Statistic Department

सांख्यिकी क्षेत्रात करिअर: आगामी तीन वर्षांत तीन लाख संधी, परंतु नोकरीसाठी अनुभव अनिवार्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूएस ब्युरो ऑफ लेबर स्टॅटेस्टिक्सनुसार संशोधन आणि विश्लेषणाच्या क्षेत्रात सन 2020 पर्यंत नोकरीच्या संधीमध्ये 41 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. भारतात विश्लेषण तज्ज्ञांसाठी रोजगाराच्या संधीमध्ये दरवर्षी 80 टक्के वाढ होत आहे, असे एका मासिकाच्या ताज्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.यातील मोठा वाटा सांख्यिकी प्रोफेशनल्ससाठी आहे. खासगी आणि सरकारी दोन्ही क्षेत्रामध्ये सांख्यिकी तज्ज्ञांची गरज असते.आकडेवारीचे अचूक विश्लेषणाच्या मदतीने बिझनेस प्लॅनिंग, मार्केटिंग, स्ट्रॅटेजी, ऑपरेशन्स आदींमध्ये हे तज्ज्ञ अत्यंत महत्त्वाची भूमिका अदा करतात.परंतु नोकरीच्या
सरकारी व खासगी क्षेत्रातील संधी
सांख्यिकी व्यावसायिकांसाठी सरकारी आणि खासगी क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी आहेत. अर्थशास्त्र,वैद्यकीय, सार्वजनिक आरोग्य, क्रीडा, उद्योग क्षेत्रात विविध कामांसाठी त्याची गरज असते. सरकारी खात्यांसाठी यूपीएससी तर्फे दरवर्षी भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा आयोजित केली जाते. खासगी क्षेत्रात सर्वेक्षण, डाटा अँनालिसिस, बँकिंग, सॉफ्टवेअर डेव्हलमेंट, अँक्युचरी आदी विभागातीला कामांसाठी सांख्यिकी तज्ज्ञांची गरज असते.
संधी अनुभवी लोकांना अधिक आहे.
वेतनामध्ये सरासरीपेक्षा अधिक वाढ
परदेशातही भारतीय प्रोफेशनल्सना अधिक मागणी राहील. सांख्यिकी सोबतच माहिती-तंत्रज्ञान,व्यवस्थापन अथवा विमा क्षेत्रातील पदवी असलेल्या प्रोफेशनल्ससाठी अधिक संधी आहे.
गेल्या दहा वर्षांत इतर क्षेत्रापेक्षा विश्लेषकांच्या क्षेत्रात वेतनाच्या पॅकेजमध्ये अधिक वेगाने वाढ झाली आहे.यावर्षीही दहा ते 20 टक्के वाढीचा अंदाज आहे.
मॅकेन्सीच्या एका अहवालानुसार आगामी तीन वर्षांत भारतात तीन लाख डेटा अँनालिसिसची गरज पडणार आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात यासाठी सर्वाधिक मागणी असेल.
बारावीनंतर प्रवेश, अव्वल संस्थांमध्ये प्रत्येक जागेसाठी 100 इच्छुक
देशभरातील संस्थांमध्ये सांख्यिकीमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत. यामध्ये बीएचयू,वनस्थली विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठाचा समावेश आहे. बहुतांश संस्थामध्ये प्रवेश परीक्षा घेतली जाते.भारतीय सांख्यिकी संस्था,कोलकाता हे सांख्यिकी पदवीसाठी देशात अव्वल संस्था समजली जाते. इथे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रत्येक जागेसाठी शंभरावर अधिक इच्छुक उमेदवार असतात. सांख्यिकीची पदव्युत्तर पदवी आयआयटी संस्थांमध्येही उपलब्ध आहेत.यामध्ये एमएससीच्या सामायिक प्रवेश परिक्षा देऊन प्रवेश घेता येऊ शकतो.

3 लाख रुपये सुरुवातीचे पॅकेज, पदवी, अनुभव असेल तर नोकरीची उत्तम संधी
सांख्यिकी क्षेत्रात सुरुवातीला सरासरी दोन ते तीन लाख रुपये वार्षिक वेतन मिळू शकते.तर आयएसआय,कोलकातच्या विद्यार्थ्यांना 10 ते 12 लाख रुपये पर्यंत वार्षिक वेतनाचे पॅकेज मिळते.खासगी क्षेत्रात सुमारे 53 टक्के नोकर्‍या अनुभवी प्रोफेशनल्ससाठी असतात.म्हणजे उमेदवारीच्या काळात तीव्र स्पर्धा असते. केवळ दहा ते पंधरा टक्के लोकांनाच सुरुवातीला गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळू शकते.

न्यूज : आयआयटी खरगपूरची परदेशी संस्थांसोबत भागीदारीची तयारी
देशातील पहिली आयआयटी संस्था खरगपूरची आयआयटी आता परदेशी संस्थेसोबत एक्सचेंज प्रोग्राम सुरू करणार आहे.अमेरिका,युरोप आणि ऑस्ट्रेलियातील अव्वल दर्जाच्या 29 तंत्रशिक्षण संस्थासोबत भागीदारीला अंतिम स्वरूप देत आहे.यामध्ये एमआयटी आणि केंब्रिज विद्यापीठाचाही समावेश आहे.