आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Divya Education: त्याच्या घरातील गरिबी चित्रपटात बघितली तेव्हा आतून हादरून गेलो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरीरावर कपडे नाहीत, खाण्यासाठी अन्न नाही, खिशात पैसे नाहीत. परंतु आलोकचा आत्मविश्वास या समस्यांहून मोठा होता. वाईट रँकिंगमुळे आयआयटीऐवजी एनआयटीमध्ये प्रवेश घ्यावा लागला, त्या वेळीही त्याचा आत्मविश्वास डगमगला नव्हता. आज तो एक मोठा अधिकारी बनला आहे.
सुपर 30 चे रोपटे तयार होण्याचा तो काळ होता. मुले आयआयटीमध्ये प्रवेश घेत होती. यशाची चर्चा होऊ लागली होती. 2005 ची गोष्ट. लंडनच्या किन्ही मिशेल क्रिस्तोफरचा फोन आला. ते डिस्कव्हरी चॅनलसाठी एक माहितीपट तयार करणार होते. त्यांना एका बॅचची संपूर्ण माहिती हवी होती. विद्यार्थ्यांच्या निवडीपासून आयआयटीच्या निकालापर्यंत. ही एक चांगली कल्पना होती. त्या वर्षी निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी एका साध्यासुध्या विद्यार्थ्याकडे क्रिस्तोफर यांचे लक्ष वेधले गेले. क्रिस्तोफरने गोष्टीची सुरुवात त्याच्या गावी जाऊन त्याच्यापासूनच केली.
माहितीपट पाहिल्यानंतरच मला आलोकच्या दारिद्रय़ाची कल्पना आली. एके दिवशी आलोकला सुपर 30 विषयी कुठेतरी वाचायला मिळाले. तो माझ्याकडे आला. चाचणी झाली. त्या बॅचमध्ये तो सहभागी झाला. तो खूप घाबरलेला होता. हिंदी माध्यमातून शिकला होता. इंग्रजीतून अभ्यास पाहिल्यानंतर त्याचा आत्मविश्वास क्षणभरासाठी डगमगला होता. तो परतण्याचादेखील विचार करू लागला. मी इशारा दिला, अशी चूक कदापिही करू नको. ही त्रुटी असली तरी हा दोष दूर करता येऊ शकतो. घरी परतलास तर ज्यावर तुझा अधिकार आहे, ते सर्वकाही गमवून बसशील. त्यानंतर आलोकचा आत्मविश्वास पुन्हा दिसू लागला म्हणून तो गावी परतला नाही. शिक्षणामध्ये स्वत:ला झोकून दिले. पाच महिने झाले. लंडनहून पुन्हा क्रिस्तोफर आले. आलोकला भेटले आणि पुन्हा एकदा त्याच्या गावी गेले. माहितीपटात आलोकची आई गोवर्‍या थापताना दिसून आली. नैराश्यात बुडालेली एक आई. मुलाला भेटण्यासाठी पाटण्याला जाता का, असा सवाल त्यांनी केला होता. खिन्न नजरेने त्यांनी उत्तर दिले, आम्ही इतके गरीब आहोत, की अशा अवस्थेत गेल्यानंतर आलोकला खूप वाईट वाटू शकते.
त्याच वेळी आकाशातून एक विमान उडताना दिसले. उमा यांचे डोळे चमकले. खुश होऊन म्हणाल्या, साहेब, तुम्ही बघाच, एक दिवस माझा आलोक यामध्ये बसून येईल आणि आता 2007. परीक्षेचा निकाल आला. आलोकचा चेहरा चमकदार नव्हता. तो आयआयटीच्या गुणवत्ता यादीत नव्हता. परंतु आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून त्याचा आत्मविश्वास डगमगला नव्हता. त्याने एनआयटी वरंगलमध्ये प्रवेश घेतला. प्रचंड पर्शिम घेतले. तिथेच शिक्षण घेत राहिला. प्रत्येक वर्षी अव्वल आला. गोल्ड मेडल मिळवले. पूजेच्या प्रसादाप्रमाणे त्याने प्रत्येक मेडल माझ्या हातावर ठेवले होते. डोळे पाणावलेले होते. मी प्रश्न केला, तू आईचे स्वप्न साकार केलेस की नाही ? चकित होऊन त्याने विचारले, कोणते स्वप्न ? मी आठवण करून दिली, विसरलास. ते विमान प्रवासाचे. खुश होऊन तो म्हणाला, सर, अनेक वेळा. आता तर मी त्या दोघांनाही विमानातून घेऊन जाणार आहे. आलोकचे गोल्ड मेडल सूर्याच्या प्रकाशात चमकत होते. माझे हात मात्र थरथरत होते.
आनंदकुमार
संस्थापक ‘सुपर 30’ पाटणा
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा education@dainikbhashargroup.com ई-मेल करा