आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • JNV 2013 : Jawahar Navodya Vidyalaya Entrance Examination

जेएनव्ही - 2013 : जवाहर नवोदय विद्यालयांतील प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरातील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता नववीमध्ये प्रवेश घेण्यासाठी 23 जून रोजी परीक्षा होणार आहे. तसे पाहिल्यास नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी सहावीत असताना परीक्षा होते. मात्र, रिक्त जागांवर प्रवेश देण्यासाठी नववी वर्गासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. तामिळनाडू वगळता देशातील सर्व राज्ये व
केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे विद्यालय आहे.


स्पर्धा

4700जागा (जवळपास) / 60 हजार अर्जदार (जवळपास)
प्रत्येक शाळेमध्ये रिक्त जागांची संख्या वेगवेगळी असते.


पात्रता
2012-13 या शैक्षणिक वर्षात ज्या जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे त्याच जिल्ह्यातील सरकारी किंवा मान्यताप्राप्त शाळेतून इयत्ता आठवी झाली असावी.
वयोमर्यादा : विद्यार्थ्याचा जन्म 1 मे 1997 पूर्वी आणि 30 एप्रिल 2001 नंतर नसावा.
निकाल : जुलै 2013
शुल्क : नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी ते आठवी वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. नववी ते बारावीपर्यंत 200 रुपये प्रतिमहिना शुल्क द्यावे लागते. असे असले तरी एससी/एसटी, मुली आणि दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही.


परीक्षा पद्धती
तीन तासांच्या परीक्षेमध्ये मॅथ्स, जनरल सायन्स, इंग्रजी आणि हिंदीचे प्रश्न विचारले जातील. सर्व प्रश्नांचा स्तर आठव्या इयत्तेचा असेल. परीक्षेचे माध्यम इंग्रजी किंवा हिंदी असेल.


1986 मध्ये सुरुवात
1986 मध्ये नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत भारत सरकारने जवाहर नवोदय विद्यालयाची सुरुवात केली. ग्रामीण भागातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणे हा या विद्यालयाचा मुख्य उद्देश आहे. नवोदय विद्यालयांमध्ये त्रिभाषा नियम अंगीकारला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना हिंदी, इंग्रजी भाषेशिवाय एका स्थानिक भाषा शिकवली जाते. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्गत नवोदय विद्यालय समितीद्वारे विद्यालयांचे संचालन केले जाते. जेएनव्ही निवासी विद्यालये आहेत.


ज्ञान
शिक्षण हक्क कायदा कक्षाबाहेर
आहे नवोदय विद्यालय
देशभरातील नवोदय विद्यालयात शिक्षण हक्कविषयक दोन कायदे लागू होत नाहीत. या कायद्यानुसार कोणत्याही शाळेत प्रवेशाच्या वेळी चाचणी घेतली जाऊ शकत नाही. त्याचबरोबर सर्व शाळांमध्ये आर्थिक स्तरावर कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के राखीव जागा देण्याचा नियम बंधनकारक आहे, परंतु नवोदय विद्यालयात प्रवेशपूर्व परीक्षेतूनच प्रवेश दिला जातो. 2011 मध्ये याच निकषावर एका विद्यार्थ्याने नवोदय विद्यालयात प्रवेश मागितला होता, परंतु त्याला नाकारण्यात आले. प्रकरण नॅशनल कमिशन फॉर चाइल्ड प्रोटेक्शनकडे गेले आणि 2011 मध्ये होणा-या परीक्षेपूर्वी एक नोटीस जारी करण्यात आली. त्यानंतर कायदा मंत्रालयाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले. केंद्रीय विद्यालय आणि लष्करी शाळांप्रमाणेच ही विद्यालये विशेष विभागात मोडतात, असे सांगण्यात आले. नवोदय विद्यालयात शिक्षण सहावीपासून सुरू होते आणि ते ग्रामीण भागात असतात. त्याशिवाय समाजातील सर्व स्तरातील समुदायांसाठी आरक्षणाची व्यवस्थाही अगोदरपासूनच आहे.


रंजक
फोन बंद करून ग्रॅहम बेल यांना श्रद्धांजली
@ ग्रॅहम बेल यांचे निधन झाले त्या वेळी संपूर्ण अमेरिकेत टेलिफोन व्यवस्था बंद करून एक मिनिटांची श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती. टेलिफोनचा शोध लावणा-या व्यक्तीसाठी ही वेगळी पद्धत अवलंबण्यात आली होती.
@ पावसाचे थेंब सर्वाधिक वेगाने पडतात. त्यांचा वेग ताशी 18 मैल असतो.
@ पिसवा उडी मारतात तेव्हा त्याची गती विशेष अंतराळ यानापेक्षा 20 पट अधिक असते.
@ आकाशातील वीज पावसाच्या काळात पृथ्वीवर प्रत्येक सेकंदाला 100 वेळा चमकते. वीज चमकल्यानंतर ओझोन वायू तयार होतो. हा ओझोन पृथ्वीभोवतीच्या ओझोन आवरणाच्या छिद्राला भरण्याचे काम करतो.


इंटरेस्टिंग कोट
“He who opens a school door, closes a prison.”
- Victor Hugo.
जी व्यक्ती लोकांना शिक्षणाची दारे उघडून देते. ती समाजाला गुन्हेगारीपासून रोखते.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा


8082005060 यावर
किंवा मेल करा education@dainikbhaskargroup.com