आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Divya Education: नवीन पाठ्यक्रम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वयंरोजगार असो की चांगले पॅकेज किंवा जास्त जबाबदारीची नोकरी, विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गरजेनुसार कोर्स अस्तित्वात आहे. यातील ब-याच कोर्सेसची माहिती नसल्यामुळे त्यातील काही कोर्सेसमध्ये सहज प्रवेश मिळतो. हे कोर्स केल्यानंतर चांगले उत्पन्न आणि सुरक्षित करिअरची शक्यता जास्त राहते. डिप्लोमा इन न्यूट्रिशन कोर्स लहान शहरांच्या विद्यार्थ्यांच्या उद्योगशीलतेसाठी, तर ई-एमबीए विमा कोर्स हे क्षेत्र सतत विस्तारत असल्यामुळे चांगल्या पॅकेजची संधी देते. मास्टर इन पब्लिक हेल्थ कोर्स करणारे विद्यार्थी-डिसिजन सिस्टिमचा भाग बनू शकतात. हे करिअरच्या पारंपरिक शाखेपेक्षा वेगळे आहे. आज यातील काही कोर्सेसविषयी चर्चा करू...
मास्टर इन वाइल्डलाइफ सायन्सेस
शुल्क : 8 हजार रुपये प्रति सेमिस्टर
मुदत : दोन वर्षे
ग्लोबल वॉर्मिंगमुळे नैसर्गिक जैविक साखळी आणि वन्यजीवांच्या जीवन पद्धतीत बदल होत आहे. यामुळे देशाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम ठरलेला आहे. इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्चच्या एका अहवालात दिलेल्या माहितीनुसार, ग्लोबल वॉर्मिंगवर नियंत्रणाचे उपाय न केल्यास आगामी वर्षात देशाच्या जीडीपीत 9 टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. यासाठी वने आणि वन्यप्राण्यांच्या संरक्षणाच्या नव्या पद्धती शोधाव्या लागतील. वाइल्डलाइफ सायन्सेसच्या मास्टर कोर्समध्ये विद्यार्थ्यांना फील्ड स्टडीबरोबर अ‍ॅनिमल सायकॉलॉजी आणि मॅनेजमेंटबाबतही माहिती दिली जाते. जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, कृषी, जैव रसायनशास्त्र, मायक्रोबॉयोलॉजी, फारेस्ट्रीमध्ये पदवीप्राप्त विद्यार्थी यात प्रवेश घेऊ शकतात.
संस्था
कोटा युनिव्हर्सिटी
ई-एमबीए
इन्शुरन्स
शुल्क : 9 लाख रुपये
मुदत : दोन वर्षे
विमा व्यवसायाच्या स्वरूपातील बदलाबरोबर त्याच्या शिक्षणाच्या पद्धतीतही सतत बदलत आहेत. उद्दिष्टापेक्षा जास्त सर्व्हिस ओरिएंटेड झाल्यामुळे विमा क्षेत्र वेगात विस्तारत आहे. ग्राहकांची समस्या ऑनलाइन सोडवू शकणा-या व्यावसायिकांना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. विम्याचा ई-एमबीए कोर्स याच उद्देशाने सुरू केला आहे. यासाठी टेक्निकल कंटेंट लंडनच्या चार्टर्ड इन्शुरन्स इन्स्टिट्यूटने तयार केला आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर यामध्ये प्रवेश घेऊ शकतो.
संस्था : एमईटी इन्स्टिट्यूट
पॅकेज : रु. 5-6 लाख वार्षिक
सुरुवातीचे पॅकेज
3-4 रुपये लाख वार्षिक
डिप्लोमा इन न्यूट्रिशन/ब्यूटी
शुल्क : 80 हजार रुपये
मुदत : 1 वर्ष/ सहा महिने
देशाच्या ब्यूटी इंडस्ट्रीने 1500 कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे आणि यामध्ये दरवर्षी जवळपास 25 टक्के वाढ होत आहे. व्हीएलसीसी आणि इग्नू यांच्याकडून चालवले जाणारे कोर्स उद्योगशीलतेला चालना देण्यासाठी तयार केले आहेत. लहान शहर किंवा गावात स्वयंरोजगाराची संधी शोधणा-यांसाठी याचा जास्त उपयोग होतो. डिप्लोमा इन न्यूट्रिशनमध्ये बारावी, सर्टिफिकेट कोर्स इन ब्यूटीमध्ये दहावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेश करू शकतात.
संस्था : व्हीएलसीसी- इग्नू
सुरुवातीचे पॅकेज : 1-2 लाख रुपये वार्षिक
पीजी डिप्लोमा इन फार्माकोव्हिजिलन्स
शुल्क : जवळपास 1.5 लाख रुपये मुदत : एक वर्ष
दुकानांत मिळणारी औषधे तिथे पोहोचण्याआधी अनेक चाचण्यांतून जातात. औषधाचे साइड इफेक्ट जीवघेणे नाहीत तसेच ते सुरक्षेचे सर्व निकष पूर्ण करतात याची जाणीव औषध निर्मात्यांना असणे आवश्यक आहे. त्यासाठी उत्पादन सुरक्षित असण्याची चाचणी करू शकणा-या प्रशिक्षित औषध व्यावसायिकांची आवश्यकता असते. पीजी डिप्लोमा इन फार्माकोव्हिजिलन्स कोर्स याच उद्देशाने सुरू केला आहे. यामध्ये भारत आणि विदेशांमध्ये फर्मा प्रॉडक्ट्सच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी स्वीकारली जाणारी प्रक्रिया आणि सुरक्षा मानकाबाबत सांगितले आहे. लाइफ सायन्सेसमध्ये बीएस्सी/एमएस्सी, बीफार्मा, एमफार्मा, एमबीबीएस, बीडीएससारखे कोर्स झालेले विद्यार्थी यासाठी प्रवेश घेऊ शकतात.
संस्था : इन्स्टिट्यूट ऑफ क्लिनिकल रिसर्च इंडिया
सुरुवातीचे पॅकेज : 2-3 लाख रुपये वार्षिक
मास्टर इन पब्लिक हेल्थ
शुल्क : सुमारे 1.5 लाख, कालावधी : 2 वर्षे
वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीनंतरही त्याचे फायदे ग्रामीण भागातील गरीब जनतेपर्यंत पोहोचलेले नाहीत. मकिंसीच्या एका अहवालानुसार देशात दरवर्षी 12 हजार सार्वजनिक आरोग्य व्यावसायिकांची गरज भासते. आरोग्य प्रशासनामध्ये प्रभावी व्यावसायिक तयार करणे, असा त्याचा उद्देश आहे. अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना सार्वजनिक निदान, सार्वजनिक आरोग्याला सुधारण्यासाठी रणनीती तयार करणे, धोरणातील निर्णयक्षमता आणि त्याची अंमलबजावणी इत्यादीविषयी शिकवले जाते. बीएस्सी, एमबीबीएस, बीडीएस किंवा एमएस्सी-नर्सिंग करणा-या विद्यार्थ्यांनादेखील प्रवेश मिळू शकतो.
संस्था- बिट्स, पिलानी
सुरुवातीचे पॅकेज रु. 4-5 लाख वार्षिक
=========
ज्ञान
पोगिओच्या हस्तलेखनातून आले रोमन फॉन्ट्स
लेखक, मानवतावादी, धर्मज्ञानी-फ्रेन्सस्को पोगिओ ब्रासिओलिनी यांची ही जगाला असलेली ओळख . त्यांनी व्हॅटिकनमध्ये सात पोप यांच्यासोबत काम केले होते. प्राचीन पांडुलिपी जमा करण्याचाही त्यांना छंद होता. त्यांनी युरोपच्या ग्रंथालयात पडलेल्या लॅटिन भाषेच्या काही प्राचीन पांडुलिपीचा संग्रह केला होता. हस्ताक्षर हे पोगिओ यांचे खास वैशिष्ट्य होते. लोकांनी स्तुती केल्यानंतर पोगिओ त्याला सुधारण्याच्या कामात गुंतले. त्याचकाळात त्यांनी एक शैली तयार केली. पुढे चालून हीच रोमन शैली म्हणून प्रसिद्ध झाली. रोमन फॉन्टमध्ये रूपांतरित झाली. रोमनचे सर्व फॉन्ट्स पोगिओ यांच्या हस्ताक्षरातूनच तयार झाले आहेत.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा
9200001174 या नंबरवर किंवा इ-मेल करा
education@dainikbhaskargroup.com