आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून सुरू होतेय दहावीची पुरवणी परीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची पुरवणी परीक्षा दि. २१ जुलैपासून सुरू होत आहे. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यंदापासून जुलैमध्येच पुरवणी परीक्षा घेऊन ऑगस्टमध्ये निकाल लावण्यात येईल, असे जाहीर केले होते. प्रवेश प्रक्रियाही त्वरित राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार, दहावीची पुरवणी परीक्षा यंदापासून जुलैमध्ये होत आहे. या परीक्षेसाठी औरंगाबादमधून १९ केंद्रांवर हजार ४९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर विभागातून ५३ परीक्षा केंद्रांवर १६ हजार ७६१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.