आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DIVYA EDUCATION: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या प्रवेश सूचना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयआयएम इंदूरच्या इंटिग्रेटेड मॅनेजमेंट प्रोग्रॅमध्ये प्रवेश, 14 मे रोजी अ‍ॅप्टिट्यूड चाचणी
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंदूरच्या इंटिग्रेटेड मॅनेजमेंट प्रोग्रॅमध्ये प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी विद्यार्थी 4 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात. 14 मे रोजी होणा-या क्षमता चाचणीच्या आधारावर प्रवेश होईल. हा पाठ्यक्रम पाच वर्षांचा आहे.
पात्रता
कोणत्याही शाखेमध्ये 60 टक्के गुणांसह बारावी परीक्षा उत्तीर्ण असावे. याबरोबर दहावी बोर्ड परीक्षेतही 60 टक्के गुण असावेत. अनुसूचित जाती/जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी 55 टक्के गुण आवश्यक.
वयोमर्यादा : 31 जुलै 2014 रोजी 20 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
निवड प्रक्रिया
अ‍ॅप्टिट्यूड टेस्टच्या कामगिरीवर विद्यार्थ्यांना वैयक्तिक मुलाखतीसाठी निवडले जाईल. मुलाखत 3-6 जूनदरम्यान होईल. गुणवत्ता यादी या दोन्हींतून तयार केली जाईल.
शुल्क
आयआयएम इंदूरमध्ये आयपीएम कोर्सची एकूण ट्यूशन फीस जवळपास 19 लाख रुपये आहे. पहिल्या तीन वर्षांमध्ये 3 लाख रुपये आणि शेवटच्या दोन वर्षांमध्ये 5 लाख रुपये वार्षिक फीस विद्यार्थ्यांकडून घेतली जाईल. यामध्ये निवास व जेवणाच्या खर्चाचा समावेश नाही. सर्व आयआयएम संस्थांमध्ये मॅनेजमेंट कोर्सचे शुल्क 8 ते 17 लाख रुपयांदरम्यान आहे.
निकाल
16 जून 2014
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, अलाहाबादच्या एमबीए कोर्समध्ये प्रवेश
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, अहमदाबादच्या एमबीए (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) आणि दुहेरी पदवी (एमबीए आणि पीएचडी) कोर्समध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी 17 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. एमबीए कोर्स दोन वर्षे आणि दुहेरी पदवी कोर्स चार वर्षांचा आहे. प्रवेश कॅट/ जीमॅट स्कोअरच्या आधारावर मिळेल.
पात्रता
कोणत्याही शाखेची पदवी. या वर्षी शेवटच्या वर्षाची परीक्षा देणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. याव्यतिरिक्त कॅट किंवा जीमॅटचा व्हॅलिड स्कोअर आवश्यक.
निवड प्रक्रिया
विद्यार्थ्यांना कॅट किंवा जीमॅट स्कोअरच्या आधारे ग्रुप डिस्कशन आणि वैयक्तिक मुलाखतीसाठी निवडले जाईल. या तीन गोष्टींतून गुणवत्ता यादी तयार केली जाईल. यामध्ये 60 टक्के महत्त्व कॅट स्कोअर, 20 टक्के महत्त्व ग्रुप डिस्कशन आणि 20 टक्के वैयक्तिक मुलाखतीला मिळेल.
शुल्क
दोन्ही कोर्सचे प्रति सेमिस्टर शुल्क 35 हजार रु. एनआयएम सेंटर फॉर अ‍ॅनालिटिक्स अँड रिसर्च एक्सलन्स, फरिदाबादमध्ये एमबीए- इन्फर्मेशन मॅनेजमेंटचे प्रति सेमिस्टर शुल्क 50 हजार रुपये आहे.
दिव्य एज्युकेशनच्या अर्काइव्हसाठी लॉगऑन करा...
www.divyamarathi.com