आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरएएस-2013: राजस्थान लोकसेवा आयोगाची भरती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थान लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवेतील रिक्त पदांसाठी भरतीचे अर्ज मागवण्यात आले आहेत. आयोगाने अद्याप परीक्षेची तारीख जाहीर केलेली नाही, परंतु 31 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

स्पर्धा
723 एकूण जागा

5 लाख अर्जदार

यातील 233 जागा राज्य सेवा आणि 490 जागा अखत्यारीतील सेवा पदांसाठी.


पात्रता
कोणत्याही विषयातील पदवीधर.पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थीही अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा : 1 जानेवारी 2014 ला अर्जदाराचे वय किमान 21 व कमाल 35 वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षणातील अर्जदारांसाठी वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

निवड प्रक्रिया


अर्ज करणारे विद्यार्थी पहिल्यांदा पूर्वपरीक्षेत सहभागी होतील. रिक्त पदांसाठी एकूण संख्येच्या 15 टक्के विद्यार्थी पूर्वपरीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी निवडले जातात. परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यात निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी बोलावले जाते.


परीक्षा पद्धती

पूर्वपरीक्षेत 200 गुणांचा पेपर असेल. त्यात सामान्यज्ञान, सामान्य विज्ञानाचे 150 प्रश्न असतील. परीक्षेत मायनस मार्किंग असेल आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.33 गुण कमी केले जातील. मुख्य परीक्षेत 200-200 गुणांचे चार पेपर असतील. यातील तीन पेपर सामान्यज्ञानावर तर चौथा जनरल हिंदी किंवा इंग्लिशचा असेल. मुलाखत 100 गुणांची असेल. मुख्य परीक्षा व मुलाखतीमधील गुणांवरून गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.

ज्ञान

भारतात सरकारी कर्मचार्‍यांचे प्रमाण अमेरिकेपेक्षा 5 पट कमी
सरकारी कर्मचार्‍यांची संख्या भारतीय अर्थव्यवस्थेवर बोजा समजली जाते. वास्तविक, लोकसंख्येच्या प्रमाणात भारतामध्ये सरकारी कर्मचार्‍यांचे प्रमाण खूपच कमी आहे. अमेरिकेच्या तुलनेत ते 5 पट कमी आहे. भारतात 1 लाख लोकांच्या मागे 1622.8 सरकारी कर्मचारी आहेत, तर अमेरिकेत हाच आकडा 7 हजार 681 एवढा आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार भारतात ‘क’ वर्गाचे कर्मचारी 56.69 आणि ‘ड’ वर्गाचे कर्मचारी 29.37 टक्के आहेत. विशेष म्हणजे, ज्या राज्यांमध्ये समस्या आहेत त्या ठिकाणी सरकारी कर्मचार्‍यांचे प्रमाण जास्त आहे. अथवा ज्या राज्यांच्या सरहद्दी दुसर्‍या देशांना जोडलेल्या आहेत, तिथे सरकारी कर्मचार्‍यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळेच मिझोराममध्ये प्रति 1 लाख लोकसंख्येमागे 3950.27, नागालँडमध्ये 3920.62, जम्मू-काश्मीरात 3585.96 आहे. सिक्कीममध्ये दर लाखामागे सर्वाधिक 6394.89 एवढे सरकारी कर्मचारी आहेत. मागासलेल्या राज्यांमध्ये कर्मचार्‍यांचे प्रमाण कमी आहे. बिहारमध्ये 1 लाख लोकसंख्येमागे 457.60, उत्तर प्रदेशात 801.67, मध्य प्रदेशात 826.47 आणि ओडिशात 1191.97 सरकारी कर्मचारी
आहेत. आर्श्चयाची बाब म्हणजे, गुजरात आणि पंजाबसारख्या विकसित राज्यांमध्ये सरकारी कर्मचार्‍यांची संख्या राष्टÑीय सरासरीपेक्षा कमी अहे. गुजरातमध्ये प्रति 1 लाख लोकसंख्येमागे 826.47 , तर पंजाबमध्ये 1263.34 सरकारी कर्मचारी आहेत.

रंजक

कार्डियाक अरेस्ट व हार्ट अ‍ॅटॅक वेगळे
हार्ट अ‍ॅटॅक आणि कार्डियाक अरेस्ट हे सर्वसाधारणपणे सारखेच समजले जाते. वास्तविक, या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. कार्डियाक अरेस्ट म्हणजे हृदयाकडून शरीरात होणारा रक्तपुरवठा (ब्लड पंपिंग) बंद झाला आहे. तर हार्ट अ‍ॅटॅक म्हणजे हृदयातील विशिष्ट भागाचा रक्तपुरवठा बंद होणे. दोन्ही विकारांमध्ये जिवाला धोका असतोच; मात्र कार्डियाक अरेस्टच्या तुलनेत हृदयविकाराचा झटका आलेला रुग्ण बचावण्याची शक्यता अधिक असते.

इंटरेस्टिंग कोट
"One repays a teacher badly if one always remains nothing but a pupil."
― Friedrich Nietzsche.
एखादा शिष्य कोणतेही कर्तृत्व न गाजवता केवळ शिष्यच राहिला ही शिक्षकासाठी मिळालेली सर्वात वाईट गुरुदक्षिणा आहे.