आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडील वीटभट्टी कामगार, मुलगा आयआयटी दिल्लीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरजवंत विद्यार्थ्यांना आयआयटीसाठी तयार करून देश-विदेशात त्यांना जास्तीत जास्त कौतुक मिळवून देण्यात ‘सुपर 30 ’चे मोठे योगदान आहे. संस्थापक आनंदकुमार यांच्याकडून वाचकांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळेल. विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबाच्या संघर्षाची ही कहाणी. पहिली कहाणी सुरेशची...

वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. बिहारच्या एका दुर्गम गावात घामाघूम झालेले छतरराम वीटभट्टीत कोळसा टाकण्याचे काम करत होते. घरी पत्नी आजारी होती. मुले भुकेने व्याकूळ झालेली होती. उदरनिर्वाहाचे एकच साधन होते. वैशाखी उन्हात पैशांच्या अपेक्षेने ते वीटभट्टीवर कामात मग्न होते. वीटभट्टीच्या दम कोंडणार्‍या धुरात पाण्यासाठी त्यांचा जीव व्याकूळ झालेला. त्यातच घाम पुसत त्यांचे हात सुरू होते. त्याच वेळी पळत आलेल्या सुरेशने आई राहिली नाही, असे सांगितले.

योग्य उपचाराअभावी तिला मृत्यू आला होता. छतरराम पहिल्यांदाच स्वत:ला असमर्थ समजू लागले. त्यांना जगण्याची आशाच संपल्यासारखे वाटले. परंतु ही हताश स्थिती फार काळ राहिली नाही. स्वत: अशिक्षित असलेल्या छतरराम यांनी मुलाला खूप शिकवायचे ठरवले, तो मजुरी करणार नाही, असा निर्धार केला. केवळ चांगले शिक्षणच जीवनाला सुधारू शकते. चांगला मार्ग दाखवू शकते. त्याशिवाय अन्य पर्याय नाही. नंतर सुरेश सरकारी शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण घेतो. छतररामच्या सर्व आशा आता सुरेशवर केंद्रित होतात. परंतु ते पाटण्यात पोहोचतात. तेव्हा त्यांना पुढील शिक्षण अशक्य वाटू लागते. महागड्या शाळा, त्याहून महागडे कोचिंग. एक नव्हे अनेक कोचिंग. कोठे जायचे ते समजत नाही. कुठून तरी सुपर 30 ची माहिती मिळते आणि आशेचा किरण सापडतो. येथे शिक्षण मोफतच नाही तर मुलाच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याचीही चिंता करावी लागणार नाही, हे समजल्यावर ते मोठ्या अपेक्षेने माझ्यासमोर उभे होते. त्यांनी आपली संपूर्ण कहाणी अगदी निवांतपणे सांगितली आणि आपले स्वप्न माझ्याकडे सोपवले. मला दोघा वडील-मुलाची बांधिलकी आवडली आणि जिद्दही पसंत पडली. ही एक अशी गोष्ट असते, जी तुम्हाला सर्व संकटांतून बाहेर काढून सर्वांच्या पुढे नेऊ शकते. सुरेशने दोन वर्षे कठोर परिश्रम घेतले. विषयाला सखोलपणे जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्यात दिसून आली. या प्रसंगाच्या दोन वर्षांनंतर सुरेश वीटभट्टीवर गेला आणि वडिलांना म्हणाला, माझा आयआयटीला नंबर लागला आहे. ही घटना 2005 ची. त्यानंतर सुरेश आणि छतरराम डबडबल्या डोळ्यांनी माझ्याकडे मिठाईचा डबा घेऊन आले. अखेर सुरेश दिल्ली आयआयटीमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी म्हणून प्रवेश करतो. वेळ पंख घेऊन उडते. प्रत्येक छोटे यश सुरेशला उत्साहित करणारे ठरते. इकडे परिश्रमात तो कोणतीही कसर सोडत नाही, तिकडे छतररामदेखील ऋतूंची पर्वा न करता कष्ट उपसतात.

वेळ तर बदलणारच होती. आज सुरेश एल अँड टीमध्ये कार्यरत आहे. त्याला अलीकडेच मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांच्या हस्ते गौरवण्यात आले. एका प्रतिष्ठित कुटुंबात सुरेशचा विवाह झाला. विवाहानंतर सुरेशने कष्टाळू वडिलांना वीटभट्टीत सोडले नाही. त्यांना पूर्ण सन्मान देऊन आपल्याजवळ राहण्यासाठी दिल्लीला बोलावले. जीवनातील सर्वात कठीण साकार स्वप्न पाहण्यासाठी त्याने बोलावले. आता सुरेशचे कुटुंब एसी फ्लॅटमध्ये राहते. जुन्या गोष्टींची आठवण आल्याबरोबर छतरराम भावुक होतात. जर एखाद्याने काही ठरवले तर तो प्राप्त परिस्थितीतून बाहेर येऊ शकतो. मग निसर्गदेखील त्याचे काम करतो. छतरराम आणि सुरेशच्या कहाणीचे सार हेच आहे.

ज्ञान: पॉवर ऑफ कोचिंग
2012 मध्ये आयआयटीत प्रवेश घेणारे सुमारे निम्मे विद्यार्थी कोचिंगच्या मदतीने यशस्वी झाले होते.

>7.3 गेल्या चार वर्षांत आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा अ‍ॅव्हरेज ग्रेड
>10 हजार रिसर्च फेलो दरवर्षी तयार करण्याचे लक्ष्य. आयआयटीजने 2020-25 पर्यंत. आता हा आकडा केवळ 1000 आहे.

इंटरेस्टिंग कोट
“You can never be over dressed or over educated.”
- Oscar Wilde
शिक्षणाची किंवा चांगले कपडे परिधान करण्याची कोणतीही सीमा नसते.
प्रश्न आणि सूचनांसाठी एसएमएस करा

8082005060 या क्रमांकावर किंवा मेल करा
education@dainikbhaskargroup.com